एकीकडे सध्या कन्नड इंडस्ट्री ‘केजीएफ २’ सिनेमाच्या यशामुळे तुफान गाजत असून, या चित्रपटातील कलाकारांची देखील तुफान चर्चा होताना दिसत आहे. ‘केजीएफ २’ सिनेमाने मिळवलेले अमाप यश सध्या सिनेरसिकांसाठी एक चर्चेचा विषयच ठरला आहे. मात्र हा आनंद हा फिका झाला असून, दुर्दैवाने या चित्रपटातील एका कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे. संपूर्ण जगात आपला बोलबाला निर्माण करणाऱ्या ‘केजीएफ चॅप्टर २’ सिनेमात काम करणारे अभिनेते मोहन जुनेजा यांचे ७ मे २०२२ रोजी निधन झाले. (mohan juneja passes away)
मागील काही काळापासून मोहन हे एका आजाराने ग्रस्त होते. याच आजारावर त्यांचे उपचार देखील सुरू होते, मात्र याच उपचारादरम्यान मोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन यांच्यावर बंगळुरूच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते तिथे त्यांचे निधन झाले. मागील अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या विनोदी भूमिकांसाठी ते खूपच लोकप्रिय होते. त्यांच्या अशा या अचानक झालेल्या एक्सिटमुळे त्यांच्या फॅन्ससोबतच कलाकारांना देखील मोठा धक्का बसला आहे. लहानपणापासूनच त्यांना अभिनेता व्हायचे होते. त्यांनी कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकांमध्ये काम करत अभिनयाला सुरुवात केली. (mohan juneja passes away)
मोहन जुनेजा यांनी आपल्या करिअरची सुरुवात विनोदी अभिनेता म्हणून केली. मोहन यांनी ‘केजीएफ चॅप्टर १’ चित्रपटात पत्रकार आनंदीच्या इनफॉर्मरची भूमिका साकारली होती. मोहन हे दाक्षिणात्य मनोरंजनविश्वातील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. यात तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आदी भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. (mohan juneja passes away)
मोहन जुनेजा यांना ‘चेलता’ या सिनेमातून मोठा ब्रेक मिळाला. त्यांच्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या मात्र या सिनेमातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. चित्रपटांसोबतच मोहन यांनी ‘वतारा’ सारख्या काही मालिकांमध्ये देखील काम केले. मोहन जुनेजा यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर सोशल मीडियावर तर त्यांच्या आठवणींना आणि त्यांच्या श्रद्धांजलीच्या संदेशांना पूर आला आहे. (mohan juneja passes away)
२०१० साली मोहन जुनेजा यांनी ‘नारद विजया’ या नाटकात देखील काम केले. मोहन जुनेजा हे नाव कन्नड चित्रपटांसाठीच ओळखले जायचे. २०१८ साली त्यांनी ‘निगुडा’ या कन्नड हॉरर सिनेमात देखील काम केले. मोहन यांनी त्यांच्या एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत सर्वच प्रकारच्या चित्रपटांमध्ये उत्तोमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. (mohan juneja passes away)