Home » जगातला सर्वात प्रभावी आणि वादग्रस्त फोटो ?

जगातला सर्वात प्रभावी आणि वादग्रस्त फोटो ?

by Team Gajawaja
0 comment
Kevin Carter Photography
Share

एखाद्या चांगल्या फॉटोग्राफरने काढलेला फोटो हा सुद्धा एक शब्द नसलेली गोष्टच असते. डेस्टीन स्पार्कस या फोटो ग्राफरचा एक Quote आहे. “फोटोग्राफी इज द स्टोरी आय फेल टु पूट इंटू वर्डस,” अशीच एक भयानक दुष्काळाची गोष्ट सांगणारा फोटो काढला होता केविन कार्टर या फॉटोग्राफरने, जो १९९३ च्या काळात वायरल झाला होता जेव्हा सोशल मीडिया सुद्धा नव्हतं. या फोटोने तो प्रसिद्ध झाला, पण या फोटोमुळे त्याच आयुष्य सुद्धा संपलं. एक लहान मुलं आहे, ज्याची फक्त हाड दिसतं आहेत. त्याच्या अंगावर मास फक्त नावा पुरतं आहे, आणि जे भुकेने व्याकूळ होऊन जमिनीवर पडलं आहे. त्याच्या मागे एक गिधाड त्यालाच आपलं अन्न बनवण्याच्या तयारीत उभं आहे. केविन कार्टर यांनी काढलेला हा फोटो जेवढा भीषण आहे. त्यापेक्षा जास्त त्यामागे असलेली गोष्ट आणखी भीषण आहे. काय आहे या फोटो मागची कहाणी जाणून घेऊया. (Kevin Carter Photography)

केविन कार्टर हे दक्षिण आफ्रिकेच्या एका मध्यवर्गीय कुटुंबात जन्माला आले. ते ज्या वस्तीत राहत होते ती श्वेतवर्णीय लोकांची वस्ती होती. हे सांगण्याच कारण तेव्हा दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचा काळ होता, म्हणजे माणसाच्या रंगावरून भेदाभेद होतं होता. केविन कार्टर हे ज्या वस्तीत राहत होते त्या वस्तीत कृष्णवर्णीय लोकांना राहण्यास मनाई होती. जे कृष्णवर्णीय लोक या वस्तीत बेकायदेशीर राहत होते. त्यांना हटवण्यासाठी तिथे सतत पोलिसांचे छापे पडत. हे सगळं केविन कार्टर यांनी लहानपणा पासून पाहिलं होतं. शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर दक्षिण आफ्रिकी कायद्यानुसार त्यांना लष्करामध्ये भरती व्हावं लागलं. पायदळ सैन्याची नावड असल्यामुळे ते वायुदलामध्ये भरती झाले, जिथे त्यांनी एकूण चार वर्ष कामं केलं. (Kevin Carter Photography)

लष्करात असताना एका मेसमध्ये त्यांनी गोऱ्या सैनिकांकडून त्यांना जेवण वाढणाऱ्या कृष्णवर्णीय माणसाचा अपमान होताना बघितलं, ते कृष्णवर्णीय माणसाच्या बचावासाठी पुढे आले – आणि नंतर त्यांच्याच सहकारी सैनिकांनी त्यांना मारहाण केली. 1983 मध्ये प्रिटोरियातील चर्च स्ट्रीटवर झालेला बॉम्बस्फोट पाहिल्यानंतर त्यांनी फोटोग्राफर होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी घेतला होता वर्णभेदामुळे होणाऱ्या हिंसेमुळे. वर्णभेदाची हिंसा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धोकादायक परिस्थितीत स्वत:ला झोकून देण्यास तयार असलेल्या इतर फोटोग्राफरसच्या ग्रुपमध्ये ते जॉइन झाले. त्यानंतर त्यांनी बॅंग बॅंग या ग्रुप सोबत वर्णभेदाच्या हिंसाचाराचे अनेक साहसी फोटो काढले.

१९९३ दरम्यान सुदानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने सुदानची मदत करण्यासाठी ऑपरेशन लाईफलाईन सुरू करण्यात आलं होतं. या अंतर्गत सुदानचा भीषण दुष्काळ जगासमोर आणण्यासाठी सुदानमधील परिस्थितीचे फोटो काढण्यासाठी बॅंग बॅंग या ग्रुपला विचारण्यात आलं. यावेळी सुदानमध्ये फोटो काढण्यासाठी केविन कार्टर यांनासुद्धा नेण्यात आलं. सुदानमध्ये असताना त्यांनी एका लहान मुलीचा फोटो काढला. खूप नंतर कळालं की तो मुलगा होता. केविन कार्टर यांनी जेव्हा हा फोटो काढला तेव्हा त्यांना सुद्धा माहीती नसेल की, हा फोटो फोटोजर्नालिझमच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि सर्वात वादग्रस्त फोटो ठरेल. (Kevin Carter Photography)

२६ मार्च १९९३ रोजी न्यूयॉर्क टाइम्समध्ये केविन कार्टर यांचा ‘The Vulture And The Little Girl’ या Title खाली हा फोटो प्रकाशित करण्यात आला. त्यासोबत कॅप्शन देण्यात आलं होतं की, “भुकेने कमकुवत झालेली एक चिमुकली नुकतीच एका फीडिंग सेंटरमध्ये जात असताना पोटात अन्नाचा दाना नसल्यामुळे रस्त्यात कोसळली. तिच्या मागे तेव्हाच एक गिधाड ती मरण्याची वाट पाहत होतं.” या फोटोने खूप जास्त लोकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यातील बऱ्याच लोकांनी केविन कार्टर यांना या फोटो बद्दल क्रिटीसाइज सुद्धा केलं. फोटो काढण्यापेक्षा केविन यांनी त्या मुलीच्या मदतीला धावून जायला हवं होतं, असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यांच्या या फोटोने पुलित्झर हा पुरस्कार जिंकला जो आर्ट म्युझिक आणि जर्नलिज्ममध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो. (Kevin Carter Photography)

हा पुरस्कार जिंकल्यानंतर केविन कार्टर यांना आणखी क्रिटीसीझमचा सामना करावा लागला. त्यात बँग बँग ग्रुपचा सदस्य असणारा त्यांचा जिगरी मित्र केन ओस्टरब्रोक याला ते फोटोशूट करत असणाऱ्या लोकेशनवर असताना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. त्यामुळे ते आणखी नैराशात गेले आणि अखेर जुलै १९९४ मध्ये त्यांनी स्वत:ला संपवलं. त्यांनी खूप भयानक प्रकारे आत्महत्या केली. ज्या लोकांनी त्यांना त्या फोटोसाठी क्रिटीसाइज केलं होतं त्यांना हे नव्हतं माहिती की, सुदानमध्ये असताना त्यांच्या सोबत सशस्त्र सैनिक होते ज्यांनी त्यांना सुदानच्या कोणत्याही नागरिकाची मदत करू दिली नाही किंवा त्यांच्याशी भेटू दिलं नाही. (Kevin Carter Photography)

======

हे देखील वाचा : तांत्रिकाच्या प्रेमात राजकुमारी !

======

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फोटोत असणारी मुलगी, जे नंतर कळलं की तो मुलगा आहे. ज्याच नाव कोंग न्योंग होतं. कोंग न्योंग हा त्या दुष्काळतून बचावला होता. ज्या दिवशी त्याचा फोटो काढण्यात आला त्या दिवशी तो कसाबसा आहार केंद्रात पोहोचला होता. बऱ्याच वर्षांनी २००७ मध्ये काही अज्ञात आजाराने त्याचा मृत्यू झाला. केविन कार्टर यांच्यामुळे संपूर्ण जगाला सुदानच्या दुष्काळची भीषणता कळाली होती. एकदा केविन कार्टर म्हणाले होते. हजारो मुलांसोबत जे घडत आहे त्याचे हे भयानक चित्र आहे. दक्षिण सुदान पृथ्वीवरील नरक आहे आणि तो अनुभव माझ्या कारकिर्दीतील सर्वात भयानक होता. (Kevin Carter Photography)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.