फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. लहान मुलं ते वयस्कर लोक सु्द्धा फळ खातात. मात्र काही व्यक्तींना सर्वच फळं खाता येत नाहीत. खासकरुन जेव्हा तुम्ही किटो डाएट करता. यावेळी नक्की कोणती फळं खायची यासाठी बंधन असतात. अशातच तुम्ही सुद्धा किटो डाएट फॉलो करत असाल तर पुढील काही फळं अजिबात खाऊ नका. (Keto Diet)
वजन कमी करण्यासाठी सध्या किटो डाएट ग्लोबली फार फॉलो केले जाते. हा एक डाएटचा असा प्रकार आहे ज्यामध्ये कार्बोहाइड्रेटचे सेवन कमी केले जाते आणि अधिक फॅटची निवड केली जाते. किटो डाएटमध्ये शरिराला ग्लुकोज ऐवजी उर्जा मिळावी म्हणून फॅट बर्न केले जातात. यामुळेच अशी फळं खाल्ली जात नाहीत ज्यामध्ये कार्बोहाइड्रेटचा स्तर अधिक असतो.
-आंबा
आपण उन्हाळ्यात आंबा खाणे फार पसंद करतो. आंबाची चव ही गोड असते. मात्र किटो डाएटवेळी तुम्ही आंबा खाऊ शकत नाही. खरंतर आंब्यात नैसर्गिक साखर आणि कार्बोहाइड्रेट अधिक असता. त्यामुळेच तो न खाण्याचा सल्ला दिला जातो. एका मध्यम आकाराच्या आंब्यात जवळजवळ ५० ग्रॅम कार्ब्स असतात.
-केळं
केळं जरी शरिराला उर्जा देते तरीही यामध्ये कार्बोहाइड्रेट आणि साखर अधिक असते. त्यामुळे किटो डाएट करताना केळं खाऊ नये असे सांगितले जाते. जर तुम्ही ते खाल्ले तर किटो डाएटमधून तुम्हाला रिजल्ट्स मिळत नाहीत. मध्यम आकाराच्या केळ्यास जवजवळ २७ ग्रॅम कार्ब्स असतात.
-सफरचंद
सफरचंद आपण सर्वजण खातो. यामुळे डॉक्टर ही दूर राहतो असे म्हटले जाते. मात्र किटो डाएटवेळी सफरचंद अगदी मर्यादित प्रमाणात खाण्यास सांगितले जाते. अथवा ते खाऊ नये. सफरचंदमध्ये फायबर असते. त्याचसोबत त्यात कार्ब्स आणि साखर ही अधिक असते. किटो डाएटवेळी तुम्ही ते न खाल्लेलेच बरे. एका मध्यम आकाराच्या सफरचंदमध्ये २५ ग्रॅम कार्ब्स असतात. (Keto Diet)
-द्राक्ष
द्राक्ष सर्वांनाच खायला आवडतात. मात्र यामध्ये कार्बोहाइड्रेट आणि साखर अधिक असते. त्यामुळेच किटो डाएटवेळी ते न खाण्यास सांगितले जातात. जरी खायचे असतील तरीही ते मर्यादित खावेत. यामधून जवळजवळ २६ ग्रॅम कार्ब्स मिळतात.
हेही वाचा- Black Apple चे फायदे माहितेयत का?
किटो डाएटवेळी तुम्ही फॅट असलेले पदार्थ खाऊ शकता. जसे की, ट्युना, मॅकरेल, सॅल्मन,पालक, ब्रोकली, अंडी, फुल फॅट डेयरी प्रोक्ट्स असे काही. तर किटो डाएटचे विविध प्रकार सुद्धा असतात. त्यामध्ये स्टँडर्ड कीटोजेनिक डाएट, साइक्लीकल कीटोजेनिक डाएट, टार्गेटेड कीटोजेनिक डाएट, हाय प्रोटीन कीटोजेनिक डाएट. खरंतर किटो डाएटमुळे वजन कमी होते. त्याचसोबत ब्लड शुगर ही नियंत्रणात राहते.