Home » केतकी चितळेचा पवारांवर हल्लाबोल

केतकी चितळेचा पवारांवर हल्लाबोल

by Team Gajawaja
0 comment
Ketaki Chitale
Share

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) कायमच तिच्या सोशल मीडियावरील कुठल्या ना कुठल्या गोष्टींमुळे चर्चेत येत असते. सोशल मीडियावरील पोस्ट्स, वादग्रस्त विधाने यांमुळे ती अनेकदा ट्रोलदेखील झाली आहे. पण सध्या ती एका भलत्याच कारणामुळे अडचणीत सापडली आहे.

तिने फेसबुकवर एक पोस्ट करून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका करत उघडपणे लक्ष्य केलं आहे. नितीन भावे नामक व्यक्तीची ही पोस्ट असल्याचे तिने नमूद केले आहे. या फेसबुक पोस्ट मध्ये लिहले आहे,

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर  मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन  फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l  तू तर लबाडांचा लबाड ll
-ॲडव्होकेट. नितीन भावे”

व्यक्ती कोणीही असो… पण एखाद्याच्या आजारपणावरून खिल्ली उडवणे किंवा टीका करणे योग्य नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.

====

हे देखील वाचा: ‘आटपाडी नाईट्स’ फेम दिग्दर्शक नितीन सुपेकर घेऊन येत आहेत ‘सरला एक कोटी’

====

अमोल कोल्हे यांनी पोस्ट विरोधात केला निषेध

“महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत आदरणीय शरद पवार साहेबांचं मोलाचं योगदान आहे!  विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी साहेबांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा!”

केतकीच्या या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्याविरोधात नौपाडा व कळवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या या वादग्रस्त पोस्ट मुळे सोशल मीडियावरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी या पोस्टरवर संताप व्यक्त केला आहे.

Ketaki Chitale Marathi Actress Photos Biography News Video Gossips

====

हे देखील वाचा: हास्याचे फवारे उडवणाऱ्या ‘भिरकीट’चा टिझर प्रदर्शित

====

केतकीने ‘आंबट गोड’ व ‘सास बिना ससुराल’ या हिंदी मालिकेतही काम केलं आहे. पण झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेमुळे केतकी ख-या अर्थाने घराघरात पोहोचली. परंतु या मालिकेनंतर मात्र ती फारशी कुठे दिसली नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.