रात्रीचा लख्ख काळोख, सर्वत्र भयाण परसलेली शांतता, दूरदूर वर एक ही दिवा नाही, वस्ती नाही, मधूनच येणारे आवाज अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता का? बहुतांश जण यावर नाहीच म्हणणार, कारण अशा ठिकाणी जाणे म्हणजे आपला जीव अर्धामेल्यासारखा आहे. ऐवढेच नव्हे तर अशावेळी अचानक कोणी समोर आले तर इकडे आड आणि तिकडे विहिर अशी पंचायत व्हायची. अशा सर्व भुताटकी (Haunted) गोष्टींवर विश्वास ठेवणारी काही लोक अद्याप ही आहेतच. पण काही ठिकाणी भुताटक्यांचा वावर ही असल्याच्या कहाण्या सुद्धा लोकांकडून सांगितल्या जातात. अशातच तुम्ही केरळात फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर पुढील काही ठिकाणी जाणे आवर्जुन टाळावे असे मी नाही तेथील लोकांनी अनुभवाने सांगितलेले आहे.
केरळ जरी सर्वाधिक सुंदर राज्य म्हणून ओळखले जाते. येथे फिरण्यासाठी प्रचंड ठिकाणं असून तेथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ दिसून येते. मात्र केरळाची सुंदरता एका बाजूला राहता त्याची दुसरी बाजू पाहिली तर केरळ हे भौगोलिक सुंदरतेव्यतिरिक्त भुताटक्यांचा वावर असणारे राज्य असल्याचे ही बोलले जाते. राज्यातील काही जंगल, रस्ते किंवा बंगले हे भुतांनी पछाडलेले आहेत. त्यामुळेच लोकांना भुताटकी (Haunted) ठिकाणांवर काही विचित्र गोष्टींचा अनुभव सुद्धा आहे. तर पहा केरळातील अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे दिवसरात्र मंतरलेला खेळ सुरु असतो.

लक्किदी गेटवे
केरळातील वायनाड जिल्ह्यात असलेल्या लक्किदी गेटवे ठामरस्सेरीला जाण्यासाठी एक लहान रस्ता आहे. मात्र हा रस्ता आपल्या रहस्यमय अनुभवांच्या कारणास्तव प्रेतांचा वावर असल्याचे मानला जातो. या रस्ता संदर्भात एक जुनी कथा आहे. असे म्हटले जाते की, वसाहतीच्या काळात एका ब्रिटिश इंजिनिअरने एका व्यक्ती करिंथंदन कडून हा मार्ग शोधण्यासाठी मदत मागितली होती. परंतु रस्ता शोधून काढल्याचे यश मिळवण्यासाठी त्याने करिंथंदन याची हत्या केली. त्यामुळेच त्याचा आत्मा अद्याप ही या ठिकाणी वावरत असतो. येथून जाणाऱ्या बहुतांश पर्यटकांना काही असामान्य गोष्टींचा सामना करावा लागला आहे.
बोनाकाउड बंगला
जर तुम्ही भूत-प्रेतांसंबंधित गोष्टींवर विश्वास ठेवत नसाल तर येथे येऊन तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. कारण बोनाकाउड बंगला राज्यातील सर्वाधिक भुताटकी ठिकाण असल्याचे बोलले जाते. संध्याकाळ होताच येथे भुतांचा वावर सुरु होतो. असे बोलले जाते की, ब्रिटिश काळात बंगल्याच्या मालकाचा मुलगा याचा रहस्यमयी मृत्यू झाला होता. त्यानंतर बंगल्यातील परिवाराने येथून थेट लंडन गाठले होते. पण लोकांचे असे मानतात की, या बंगल्यात अद्याप ही मुलाची आत्मा आहे. विचित्र प्रकारचे ओरडण्याचे आवाज ही येतात असे ही सांगितले जाते.
हे देखील वाचा- हॉरर शो पाहण्याचे साईड इफेक्टस, ब्रिटनमध्ये अचानक वाढले मानसिक रोगी
त्रिचूर वन
केरळ आपल्या भौगोलिक सुंदरतेसह ट्रेंकिंग, कॅम्पिंग आणि जंगल सफारी सारख्या एका आव्हानात्मक गोष्टींसाठी सुद्धा ओळखला जातो. मात्र केरळातील त्रिचुर वनात अशा काही घटना, अनुभव ऐकायला मिळतात की, हे वन फक्त सुंदरच नव्हे तर सर्वाधिक भुतांचे भटकण्याचे ठिकाण असल्याचे मानले जाते. काही जणांनी येथे ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग केलेय त्यांनी त्रिचुरच्या वनात काही असामान्य गोष्टींचा सामना केला आहे. येथे एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने त्याची आत्मा भटकत असल्याचे बोलले जाते. मात्र मुलाची आत्मा कोणालाही त्रास देत नाही.

करियावोट्टम
करियावोट्टम कॅम्पस रोड सुद्धा केरळातील भयंकर भुताटकी (Haunted) ठिकाणी असल्याचे सांगितले जाते. येथे एक तलाव असून त्यात एका मुलीने आत्महत्या केली होती. त्याच मुलीच्या नावाने या तलावाचे नाव हैमावती असे ठेवले गेले. काही जणांनी असे म्हटले की, येथील रस्त्यावर एक प्रेत फिरत असल्याचे पाहिले आहे. त्याची लांबी ही एखाद्या सामान्य व्यक्तीपेक्षा ही दुप्पट असेल. रात्रीच्या वेळेस रस्ता एकदम निपचित व्यक्ती पडल्यासारखा शांत असतो. मात्र ज्यांना या ठिकाणची स्थिती माहितेय ते येथे संध्याकाळनंतर जाणे तर दुर विचार ही करत नाही. कारण काही वेळेस एका अज्ञात व्यक्तीच्या जाळ्यात आपण अडकलो जाते असे ही बोलले जाते.
पेरंडूर नहर
स्थानिक लोकांचे या ठिकाणाबद्दल असे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी वधुथला मथाई नावाच्या महिलोसोबत दुर्व्यवहार करण्यात आला होता. त्यामुळे भगवान राजा एडापल्लीने मथाईला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतरच येथे असामान्य गोष्टी घडू लागल्या. लोक या पेरंडूर नहरच्या जवळून जाण्यासाठी सुद्धा घाबरतात.
केरळ आणि भुताटक्यांचा वावर असणाऱ्या राज्यातील अशा काही ठिकाणी जाण्याचा तुम्ही सुद्धा विचार करु नका. कारण आपल्याला ज्या गोष्टींची माहिती नसते तेथेच आपण एखादी गोष्ट करण्यास गेलो तर ते आपल्याच अंगलट येण्याची फार शक्यता असते. अशातच भुताटकी ठिकाणींवर तर चुकूनही तुम्ही मजा म्हणून अजिबात फिरण्यास जाऊ नका.