Home » केनडी हत्याकांडाचे गुढ आणि ट्रम्प

केनडी हत्याकांडाचे गुढ आणि ट्रम्प

by Team Gajawaja
0 comment
Kennedy Mystery And Trump
Share

22 नोव्हेंबर ही तारीख तमाम अमेरिकन नागरिकांसाठी एका दुःखद आठवणींची असते. बरोबर 22 नोव्हेंबर 1963 रोजी अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष जॉन केनेडी यांची हत्या करण्यात आली. आता या घटनेला 61 वर्ष होत आहेत, तरीही ही जखम अमेरिकन नागरिकांच्या मनावरुन पुसली गेली नाही. आता अमेरिकेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या जखमेवरील खपली काढली आहे. त्यांनी एका कार्यक्रमात त्यांचे सरकार जॉन केनेडी यांच्या हत्येतील गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण जॉन केनेडी यांची हत्या कोणी केली याचा शोध अद्यापही घेता आला नाही. हे गुढ उलकण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, मात्र त्यामागे मोठी राजकीय आणि आर्थिक शक्ती असल्याचे सिद्ध होत, तपास अर्धवट राहिला. आता ट्रम्प यांच्या नव्या सरकारमध्ये केनेडी यांचा भाचा महत्त्वाचा पदावर आहे. अशावेळी ट्रम्प यांनी केनेडी हत्याकांडातील सरकारी तपास जगजाहीर करणार असे सूचित केले आहे. असे झाल्यास अमेरिकेच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे कारण केनेडी यांच्या हत्येबाबत कटाचे अनेक दावे करण्यात येतात. (Kennedy Mystery And Trump)

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेएफएफ हत्येमधील माहिती सार्वजनिक करण्याचे जाहीर केले आणि अमेरिकेत पुन्हा जॉन केनेडी हत्याकांड आणि त्यासंबंधातील गुढाची चर्चा सुरु झाली आहे. जॉन एफ. केनेडी यांची गणना अमेरिकेच्या महान राष्ट्राध्यक्षांमध्ये केली जाते. 1960 मध्ये त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. अमेरिकेतील नागरी हक्कांच्या प्रगतीसाठी केनेडीच्या कार्याने त्यांना लिंकन आणि वॉशिंग्टन या दोन्ही लोकप्रिय राष्ट्राध्यक्षांच्या जवळ आणले होते. 22 नोव्हेंबर 1963 रोजी त्यांची हत्या झाली. केनेडी हे त्यांची पत्नी जॅकलिन केनेडी सोबत एका कारमध्ये बसले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. केनेडी एका राजकीय रॅलीत सहभागी होण्यासाठी जात असतांना ही घटना झाली. यामुळे अमेरिकेतच नाही तर जगभर खळबळ उडाली होती. आता 61 वर्षानंतर याच जॉन केनेडींच्या हत्याकांडाची चर्चा नव्यानं सुरु झाली आहे. (International News)

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन एफ केनेडी यांच्या हत्येशी संबंधित गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करणार असल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प हे पहिल्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदावर बसले तेव्हाही त्यांनी या घटनेचा उल्लेख केला होता. 2016 मध्ये ट्रम्प यांनी ही घोषणा केली, परंतु त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाही. तत्कालीन सचिवांनी असे केले तर अमेरिकेतील काही व्यक्तींच्या सुरक्षेतेला हानी पोहचले असे कारण त्यांनी सांगितले होते. मात्र आता पुन्हा ट्रम्प यांनी केनेडी हत्याकांडाचा उल्लेख करत कागदपत्र जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. केनेडी यांच्या हत्येशी संबंधित बहुतेक गोपनीय दस्तऐवज सार्वजनिक झाले असले तरी काही खास कागदपत्रे अजूनही अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांच्या ताब्यात आहेत. केनेडी यांच्या हत्येमागे राजकीय कारस्थान असल्याची शंका आहे, या कागदपत्रांत यासंबंधाचा पुरावा असल्याची चर्चा आहे. यावेळी ट्रम्प यांच्या सरकारमध्ये जॉन एफ. केनेडी यांचा पुतण्या रॉबर्ट एफ. केनेडी यांचाही समावेश आहे. रॉबर्ट एफ. केनेडी यांनीही ट्रम्प यांच्याकडे ही गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली होती, आणि त्याला ट्रम्प यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे. (Kennedy Mystery And Trump)

=====

हे देखील वाचा :  ठाण्यात नेमकी कोणती गणितं चालणार?

========

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात चर्चित हत्येमधील एक आहे. 22 नोव्हेंबर 1963 रोजी केनेडी यांची टेक्सासमधील डॅलस येथे एका मोटारगाडीत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. केनेडी हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी जॅकलीन केनेडीही होती. हे जोडपं जगातील सर्वात सुंदर जोडपं म्हणून ओळखलं जात असे. गोळ्या झाडल्या तेव्हा केनेडी हे एक ओपन कारमध्ये बसत होते. केनेडी यांना दोन गोळ्या लागल्या. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी ली हार्वे ओसवाल्ड नावाच्या एका आरोपीला पकडण्यात आले. मात्र ली ला अटक झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांना त्याला गोळ्या घालून ठार कऱण्यात आले. यामुळे केनेडी यांच्या हत्येमागे नेमकं कोण आहे, हे गुढ पडद्यामागेच राहिले आहे. आता हे गुढ ट्रम्प सार्वजनिक करणार का, हे नव्या वर्षात स्पष्ट होणार आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.