Home » Keki Moos : जो ५० वर्ष घराबाहेर न पडता प्रेयसीची वाट पाहत होता.

Keki Moos : जो ५० वर्ष घराबाहेर न पडता प्रेयसीची वाट पाहत होता.

by Team Gajawaja
0 comment
Keki Moos
Share

इस उम्मीद पे रोज़ चराग़ जलाते हैं, आने वाले बरसों बाद भी आते हैं .. जेहरा निगाह यांचा हा शेर, पण हा शेर एका माणसाच्या आयुष्यावर तंतोतंत फिट बसतो. त्या माणसाबद्दल बोलण्याआधी एक प्रश्न, एखाद्या व्यक्तीची एखादा माणूस किती वेळ वाट पाहू शकतो? आजच्या काळातली नाती बघितली तर महिनाभरही खूप झालं. पण एका व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची ५० वर्ष वाट पहिली. तो व्यक्ती सामान्य माणूस नव्हता तो जागतिक दर्जाचा चित्रकार,फोटोग्राफर, शिल्पकार, लेखक सुद्धा होता. त्याच नाव होतं केकी मूस. ज्यांच्याबद्दल असं बोललं जात की ते जवळजवळ ५० वर्षे कधीही घराबाहेर पडले नाही. त्यांच्या आयुष्याबद्दल ऐकलं तर तुम्हाला वाटेल ही एक दंतकथा आहे. त्यांच्या प्रेमाबद्दल आणि कलेबद्दल जाणून घेऊ. (Keki Moos)

कैखुसरो माणेकजी मूस उर्फ केकी मूस (Keki Moos) हे एक अद्वितीय कलाकार होते. त्यांचा जन्म मुंबईतील मलबार हिल्स येथे झाला. त्यांची आई मुंबईतील एका अतिशय समृद्ध पारशी कुटुंबातील होती. वडील माणिकजी फ्रामजी मूस हे एका मध्यमवर्गीय पारसी कुटुंबातून आले होते. १९२० च्या सुमारास, हे कुटुंब जळगावमधील चाळीसगाव या छोट्या गावात स्थायिक झाले. केकी हे लहान असल्यापासूनच चित्र काढू लागले होते. पुढे केकी मूस हे कलेच्या शिक्षणासाठी परदेश आणि मुंबईला सुद्धा शिकायला गेले होते. रॉयल फोटोग्राफिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटनचा सदस्य म्हणून अमेरिका, रशिया, स्वित्झर्लंड, चीन आणि जपानचा प्रवास केला होता.

ते जेव्हा मुंबईत शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांची ओळख निलोफर मोदी नावाच्या मुलीशी झाली. हळूहळू ते मित्र बनले, मग पुढे चांगले मित्र बनले आणि मग चांगल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण केकी मूस शिक्षण पूर्ण करून कायमचे चाळीसगावला परतत होते. तेव्हाच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ते तिची वाट पाहत होते. ती आली सुद्धा गाठभेट झाली, केकी मूस जेव्हा गाडी पकडून निघत होते. तेव्हा निलोफरने केकींना एक वचन दिलं, एक दिवस मी नक्की पंजाब मेलने चाळीसगावला येईन. (Keki Moos)

हे वचन घेऊन केकी मूस (Keki Moos) चाळीस गावला पोहचले, त्यांचं जेवढं निलोफरवर प्रेम होतं तेवढंच प्रेम ते कलेवर सुद्धा करायचे. केकींच्या मामांनी चाळीस रेल्वे स्टेशनच्या जवळ एक छोटासा बंगला बांधला होता त्याच नाव होतं आशीर्वाद. पुढे ते बदलून केकींनी त्या बंगल्याचं नाव आपल्या आवडत्या चित्रकार रेम्ब्राँ याच्या नावावरून ‘रेम्ब्राँज रिट्रीट’ असं ठेवलं. (Crime Story)

हा बंगला म्हणजे तीन खोल्या, मोठा हॉल आणि समोरचा लॉन. याच खोल्यांमध्ये, केकी यांनी त्यांच्या ब्रश आणि कॅमेऱ्याने एक जग निर्माण केलं. केकी जवळ जवळ ४० ते ५० वर्ष दिवसभर चित्र काढायचे किंवा फोटोग्राफी करायचे. पण पंजाब मेल ही ट्रेन यायची वेळ व्हायची ते बंगल्याची दिवभर बंद असलेली दारं खिडक्या उघडायचे. आणि तिची वाट पहायचे, ट्रेन निघून गेली आणि कुणी आलं नाही की ते पुन्हा आपल्या कामाला लागायचे. ही अशी वाट त्यांनी जवळ जवळ ५० वर्ष पाहिली. या काळात ते घरातून बाहेर सुद्धा निघाले नाहीत. असं बोललं जातं. काही ठिकाणी तर ते फक्त दोनदाच घरातून बाहेर निघालेत आणि चाळीसगावातून बाहेर निघालेत असा उल्लेख आहे. एकदा त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांना औरंगाबादला जावं लागलं होतं. दुसऱ्यांदा ते त्यांचा बंगला सोडून चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर विनोबा भावेंचा फोटो काढण्यासाठी गेले होते. पण केकींसारखेच हट्टी असलेले विनोबा भावे यांनी कॅमेऱ्यासमोर पोज देण्यास नकार दिल्याने हा फोटो कधीच काढता आला नाही. (Crime Story)

केकी इतकी वर्ष घरात राहून स्वत: आतून फक्त कलाच उपसत राहिले. ते चित्र काढायचे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, तैलचित्रे बनवण्यासाठी वापरला जाणारा कागद परदेशातून येणे बंद झालं. तेव्हा त्यांनी टिनवर चित्र काढायला सुरूवाट केली. त्यानंतर ते फोटोग्राफीकडे वळले. तुम्ही म्हणाल ते इतकी वर्ष घरातच होते, तर त्यांनी फोटो काढले कशाचे? तर त्यांनी त्या काळात टेबल-टॉप फोटोग्राफी सुरू केली होती. ते घरातल्या घरातच टेबल वेगवेगळ्या वस्तु ठेऊन त्याचे फोटो काढायचे.(Keki Moos)

जेव्हा घरातील सर्व वस्तूंचे फोटो काढून झाले, तेव्हा ते ओरिगामी कला शिकले आणि ५,००० हून अधिक कलाकृती तयार केल्या. टेबलटॉप फोटोग्राफीच्या त्यांच्या कलेमुळे त्यांनी सुमारे १३,००० फोटो काढेले. त्यांच्या बंगल्याच्या भिंती आणि कपाटांवर अजूनही १,००० हून अधिक चित्रे आणि रेखाचित्रे लटकलेली आहेत. त्यांनी लाकडी कलाकृतींमध्येही हात आजमावला आणि एक कुशल कलाकार म्हणून शेकडो कलाकृती निर्माण केल्या. छायाचित्रण आणि चित्रांसोबतच त्यांनी शिल्पे आणि काही अनोखी वाद्ये देखील तयार केली.(Crime Story)

त्यांच्या या कलेच्या प्रेमात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सुद्धा होते. एकदा जवाहरलाल नेहरू हे केकी यांना भेटण्यासाठी त्यांचा बंगल्यावर गेले होते. ते केकींना भेटून १० मिनिटात निघणार होते. पण त्यांनी त्यांची ट्रेन जवळ जवळ एक तास थांबवली. केकी फोटोस चित्र काढून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात आपल्या कलाकृती पाठवत राहिले. त्यांनी जवळपास ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. पण त्यांच्या नावाने आलेली पत्र पुरस्कार ते कधीच उघडून बघत नसत.
त्यांच्या मृत्यूनंतर न उघडलेले पत्र उघडले तेव्हा त्यांना पुरस्कारही मिळाले होते हे कळालं. (Keki Moos)

==============

हे देखील वाचा :  M.V. Sita Lakshmi : भीक मागून देवळाला लाखो दान करणारी महिला कोण ?

==============

असा हा कलाकार प्रेयसीच्या प्रेमात तिची अखेरपर्यंत वाट पाहतच राहिला. पण ती का आली नाही? त्याचं उत्तर असं आहे की, त्यांची प्रेयसी निलोफर यांचे आई वडील त्यांच्या आणि केकीच्या नात्याबद्दल फार खुश नव्हते, तरीही त्यांनी त्यांच्या लग्नाला होकार दिला होता. पण निलोफरच्या आई वडिलांना त्यांचं मुंबईसोडून चाळीसगावसारख्या ठिकाणी राहायला जाणं मान्य नव्हतं. म्हणून जेव्हा केकी मुंबईवरुन निघाले तेव्हा निलोफरने चाळीसगावला येण्याचं वचन दिलं. पण आधी सांगितल्याप्रमाणे केकींनी त्यांना आलेले पुरस्कार पत्र कधीच उघडली नाही. त्यात त्यांच्या एका मित्राने त्यांना एक पत्र लिहिलं होतं, ज्यात लिहिलं होतं की, निलोफरला तिच्या घरच्यांनी लंडनला पाठवलं आहे आणि तिकडे तिचं लग्नही करण्यात आलं आहे. (Keki Moos)

ही माहिती केकींना कधीच कळाली नाही, ३१ डिसेंबर १९८९ पंजाब मेल चाळीस गावला आली केकींनी ती येईल याची नेहमी प्रमाणे वाट पहिली हा शेवटचा दिवस होता जेव्हा त्यांनी तिची वाट पहिली. याच दिवशी त्यांचं निधन झालं. समाजात कधी कधी प्रेम दुर्लक्षितच राहतं, केकी मूस या महान कलाकाराच्या बाबतीत दुर्दैवी गोष्ट म्हणजे, त्यांचं प्रेमही दुर्लक्षित राहिलं आणि कलाकार म्हणून तेही..


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.