प्रत्येक हिंदू लोकांच्या घरामध्ये देवघर असतेच असते. रोज सकाळी देवपूजा करून घराबाहेर पडण्याची प्रत्येक हिंदू लोकांची सवय असते. प्रत्येकाच्या देवघरामध्ये जास्त देव नसले तरी मोजके मात्र महत्वाचे देव आणि यासोबतच अजून एक गोष्ट असते आणि ती म्हणजे शंख. लहान मोठा कोणत्याही आकाराचा शंख प्रत्येक देवघरामध्ये आपले स्वतःचे स्थान घेऊन विराजमान झालेला दिसतो. मात्र आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की शंख आपण घरात आणि त्यातही देवघरात का ठेवतो. शंखाचे नक्की काय महत्व आहे? चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे. (Conch)
समुद्र मंथनातून पांचजन्य नावाचा शुभ्र शंखाची उत्त्पन झाले, विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून ‘शंख’तिचा सहोदर भाऊ होय. म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. विष्णूने आपल्या हातात शंख धारण केले. शंख हा समुद्रात सापडतो.शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे. हा शंख भगवान विष्णूला समर्पित होता. म्हणूनच लक्ष्मी-विष्णू पूजेमध्ये शंख वाजविला जातो. (Conch Story)
आपल्या घरात लहान मोठी कोणतीही पूजा असली तरी शंखाची (Conch) पूजा केली जाते. शंखाला मोठे महत्व आहे. या शंखामुळे आणि घरात केलेल्या शंखनादामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. घरात शंख ठेवणे म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहे. शिवाय घरामध्ये शंख असल्यास दैवी आशीर्वाद प्राप्त होतात. शंख हा विश्वाच्या मूलभूत ध्वनी ‘ओम’ चे प्रतीक देखील मानले जाते. (Top Marathi News)
घरामध्ये शंख ठेवताना पुढील गोष्टींची काळजी घ्या.
– शंख कधीच जमिनीवर ठेवू नका. शंख जमिनीवर ठेवल्याने त्याचा अपमान होतो. शंख नेहमी स्वच्छ कपड्यावर स्थापित करावा. किंवा शंखासाठी खास स्टॅन्ड मिळत त्यावर तो ठेवावा. शंख नेहमी पूजास्थान किंवा घराच्या उत्तर-पूर्व दिशेला (इशान दिशा) ठेवावा. शंख ठेवण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून शुद्ध करावी. (Shankh Benefits)
– शंख ठेवण्यासाठी देव्हारा हे घरातील सर्वात शुद्ध स्थान मानले जाते. मान्यतेनुसार, शंख नेहमी भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मी यांच्याजवळच ठेवावा. शंखाच्या शुद्धतेसाठी नेहमी त्याच्यावर कपडा टाकून ठेवावा.
– घरात शंख आणण्याचा सर्वात शुभ दिवस शिवरात्री, नवरात्री आणि श्रावणातील दिवस चांगला असल्याचे मानले जाते. या दिवसांत घरात शंखाची स्थापना करणे चांगले मानले जाते.
– पूजा झाल्यानंतर अनेकांकडे शंख फुंकतात मात्र त्यानंतर त्याचे पावित्र्य जपणे महत्त्वाचे मानले जाते. शंख फुंकल्यानंतर त्याची शुद्धता करण्यासाठी गंगाजलने किंवा सध्या स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने साफ करा आणि पाण्याचा थेंबही शंखावर ठेवू नका.
– घरात शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. शंख घराचा मुख्य दरवाजा, देवघर किंवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
===============
हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
– शंख घरात किंवा देव्हाऱ्यात ठेवताना शंखाचा तोंड वरच्या बाजूने ठेवा. यामुळे घरात सकारात्मकता कायम राहते व नकारात्मकता दूर होते.
– ईशान्य दिशेला शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. ईशान्य दिशेला शंख ठेवल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.
– आयुर्वेदानुसार शंख पाणी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. शंखध्वनी तणाव कमी करून मानसिक शांती प्रदान करते.
– शंखाची आणि देवी लक्षमीची पूजा केल्यामुळे तुम्हाला धन-समृद्धीचा लाभ होतो. शंख वाजवून त्यात भरलेले पाणी शिंपडल्याने घरातील वातावरण शुद्ध होते.
( टीप – या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )