Home » Morpankh : श्रीकृष्णाला प्रिय असलेले मोरपीस घरात ठेवल्यास होतात मोठे फायदे

Morpankh : श्रीकृष्णाला प्रिय असलेले मोरपीस घरात ठेवल्यास होतात मोठे फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Morpankh
Share

भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आता आपण साजरा करणार आहोत. द्वापारयुगात भगवान विष्णूनी खास कारणासाठी कृष्ण अवतार घेतला. या अवतारात त्यांनी अनेक दृष्टांचा नाश केला आणि पुन्हा सत्याची विजयी पताका फडकावली. या अवतारात विष्णूंनी आपल्या बाल लीलांनी सगळ्यांनाच मोहित केले होते. आजही कृष्णाच्या बाल लीला प्रसिद्ध आहेत.

कृष्ण म्हटले की डोळ्यासमोर एक मोहक, निरागस अशी छबी उभी राहते. ओठांवर कायम हसू, हातात बासरी, बोलके डोळे, आकर्षक रूप आणि डोक्यावर मोरपीस. मोरपीस ही कृष्णाची मोठी ओळख आहे. आपल्या संपूर्ण अवतार काळात कृष्णाने सदैव मोरपीस धारण केले होते. श्रीकृष्णाला मोरपीस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात. त्यामुळेच या मोरपिसाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. नुसते मोरपीस पाहिले तरी कृष्णच डोळ्यासमोर येतो. अशा या मोरपिसाला वास्तुशास्त्राच्या दृष्टीने देखील मोठे महत्व आहे. मोरपीस घरात ठेवल्याने अनेक फायदे होतात. (Top Trending News)

मोरपंख घरात ठेवल्याने धनाची कमतरता होत नाही, प्रगती होते. अनेक घरांमध्ये लोक मोराच्या पिसांची पुष्पगुच्छ करूनही ठेवतात. मात्र घराच्या कोणत्या दिशेला, कोणत्या कोपऱ्यात मोराची पिसे ठेवणे शुभ असते, याविषयी अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया मोरपीस कुठे ठेवल्याने कोणते फायदे होतात. (Marathi News)

घरात सकारात्मक येते
मोरपंख घरात ठेवल्याने घरातील वातावरण शुद्ध होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते. ज्यामुळे घरात आनंदी आणि शांत वातावरण कायम राहते. रोज घरात सगळ्या कोपऱ्यांमध्ये मोरपीस फिरवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल. फेंगशुईनुसार घराच्या किंवा ऑफिसच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपंख ठेवल्याने समृद्धी आणि यश मिळण्याची शक्यता असते. (Todays Marathi Headline)

आर्थिक लाभ
वास्तुशास्त्रानुसार घरात जर मोरपीस योग्य ठिकाणी ठेवले तर आपल्याला आर्थिक लाभ होतो. कपाटातील पैशांच्या तिजोरीत तुम्ही मोरपीस ठेवू शकता. तसेच घरात ज्याठिकाणी तुम्ही तुमचे पैसे आणि दागिने ठेवता अशा ठिकाणी सुद्धा एक मोरपीस ठेवल्याने आर्थिक लाभ होऊ शकते.

Morpankh

राहु दोष जातो
राहू दोष असणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला देखील कुंडलीत राहुदोष असेल तर वास्तुशास्त्रानुसार राहू दोष निवारण्यासाठी मोरपीस फायदेशीर आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत राहु दोष असेल त्यांनी आपल्या घरातील उत्तर-पश्चिम दिशेला मोरपीस लावल्याने फायदा होतो असे सांगितले जाते. (Shrikrushna Janmashtami)

कालसर्प दोष
पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णानेही कालसर्प योगापासून मुक्तीसाठी मोरपीस आपल्या मुकुटात धारण केले होते. मोराचे आणि सापाचे वैर आहे. जर तुम्ही ७ मोरपिसे एका उशीच्या खोळीमध्ये टाकून त्या उशीवर झोपल्यास कालसर्पावर फायदा होऊ शकतो.

ग्रह शांती
ज्या ग्रहाचा अशुभ प्रभाव आहे त्या ग्रहाचा मंत्र २१ वेळा म्हणावा. हा जप झाल्यानंतर मोरपिसावर पाणी शिंपडावे. यानंतर हे मोरपीस पूजेच्या ठिकाणी ठेवा. याचा नक्की तुम्हाला फायदा होईल.  (Top Marathi News)

नजरदोष
मुलांना कुणाचीही नजर लागते. लहान मुलांना यापासून दूर ठेवायचं असेल तर एका चांदीच्या ताबीजमध्ये मोरपीस मुलांच्या डोक्यापाशी ठेवा. यामुळे मुलांना भीती वाटणार नाही.

धनसंपत्तीचा योग
दिशांमध्ये आग्नेय दिशा अतिशय शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेचे स्वामी सूर्यदेव आणि इंद्रदेव आहेत. यामुळे घराच्या पूर्व दिशेला मोरपंख ठेवणे शुभ असते. हवे असल्यास आपण वायव्य दिशेलादेखील ठेवू शकता. या दिशेला मोराची पिसे ठेवल्याने अपार संपत्ती निर्माण होते, असे मानले जाते. (Marathi Latest News)

वास्तू दोष दूर होतात
घरामध्ये मोराची पिसे लावणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार ८ मोराची पिसे बांधून ईशान्य दिशेला भिंतीला लावावित, असे केल्याने वास्तुदोष संपतो. लक्षात ठेवा की पिसांचा गुच्छ प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणी ठेवावा. यामुळे घरात सकारात्मकता राहते.

========

Narsimha : ज्या खांबातून नरसिंह प्रकटले, तो आहे चक्क पाकिस्तानात !

========

अभ्यासाच्या टेबलावर
वास्तुशास्त्रानुसार विद्यार्थी वर्गाने आपल्या वहीत किंवा अभ्यासाच्या टेबलावर मोरपंख ठेवावे. यामुळे मन अभ्यासात गुंतलेले राहते, असे मानले जाते.

एकाग्रता वाढवण्यासाठी
मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा. श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे. ज्या ठिकाणी बसून मुले अभ्यास करतात त्याठिकाणी मोरपीस जरूर लावावे. असे केल्यास मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी त्यांना कायम लक्षात राहतात. (Social News)

(टीप – वरील बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.