भारतामध्ये तीर्थयात्रा खूपच लोकप्रिय आहे. विविध धार्मिक स्थळांना भेट देणे आणि देवाचे दर्शन घेणे याला खूपच महत्त्व आहे. आता तीर्थयात्रा म्हटले की, सगळ्यांच्याच डोक्यात सर्वात आधी येते ती चारधाम यात्रा. हिंदू धर्मात सर्वात जास्त महत्त्व असलेली तीर्थयात्रा म्हणजे, ‘चारधाम’ यात्रा. चारधाम यात्रा केल्याने पापांचे क्षालन होते, आणि मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. याच चारधाम यात्रेतील सर्वात महत्त्वाचे धाम म्हणजे ‘केदारनाथ’. चारधाम मधील महत्त्वाचे धाम आणि १२ ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथ धामचे दर्शन घेण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. मात्र या धामचे दर्शन घेणे वाटते तितके सोपे नाही. (Kedarnath)
केदारनाथ मंदिर जिथे स्थित आहे तिथे जाणे सोपे नाही. बरेच किलोमीटर पायी प्रवास करत, प्रतिकूल वातावरणाशी झगडत मुख्य मंदिरापर्यंत पोहचावे लागते. मुख्य म्हणजे केदारनाथ मंदिर असलेल्या ठिकाणी हिवाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणावर बर्फवृष्टी होते. त्यामुळे हे मंदिर हिवाळ्यामध्ये दर्शनासाठी बंद केले जाते. मागच्या वर्षी २३ ऑक्टोबर रोजी हे मंदिर बंद केले गेले होते. मात्र आता लवकरच हे मंदिर पुन्हा दर्शनास्तही खुले केले जाणार आहे. सामान्यपणे एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये हे मंदिर खुले असते. नंतर बंद करण्यात येते. (Marathi)
नुकताच आपण महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा केला. भगवान शिवाला समर्पित असलेल्या या सणाच्याच दिवशी या मुहूर्तावर सर्व शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले केदारनाथ धाम हे लवकरच दर्शनासाठी खुले होणार आहे. मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जाणार असून याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. देवभूमी असणाऱ्या उत्तराखंडच्या उंच बर्फाच्या डोंगरावर बाबा केदारनाथचे पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले व आदि शंकराचार्यांनी त्याचे पुनरुज्जीवन केले असे मानले जाते. (Todays Marathi Headline)

दरवर्षी लाखो भाविक केदारनाथच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र वर्षातील सहा महिने हे मंदिर बंद असते. जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे मंदिर आणि मंदिर परिसर पूर्णपणे बंद करण्यात येतो. पण आता अखेर सर्वांची उत्सुकता समाप्त होण्याची वेळ आली आहे. बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी वाट पाहणाऱ्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आहे. २०२६ च्या केदारनाथ यात्रेचा श्रीगणेशा झाला आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात पंचांग गणना केल्यानंतर, यावर्षी २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडतील अशी घोषणा करण्यात आली. (Top Marathi Headline)
महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर केदारनाथ धामचे दरवाजे लवकरच उघडणार असल्याची घोषणा संस्थेकडून करण्यात आलेली आहे. तर महाशिवरात्री निमित्त रावल यांनी उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात विधी केल्यानंतर दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर केली. नियोजित शुभ वेळेनुसार २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता बाबा केदारनाथचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी उघडले जातील. (Social Updates)
सध्या केदारनाथ धामवर बर्फाची पांढरी चादर पसरली असून दरवाजे उघडल्यानंतर हा परिसर भाविकांनी गजबजून जाणार आहे. भाविकांनी या प्रवासाची तयारी करताना हवामान आणि सुरक्षिततेशी संबंधित सूचनांचे पालन करावे. शिवाय चारधाम यात्रेसाठी नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. या प्रवासादरम्यान उबदार कपडे, रेनकोट आणि आवश्यक औषधे सोबत ठेवण्याचे, हवामान जाणून घेऊनच प्रवास करण्याचे आणि प्रवासादरम्यान प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन संस्थानने केले आहे. (Top Trending News)
केदारनाथ धाम मंदिराची दारे उघडणे हे अत्यंत आध्यात्मिक असून याला पारंपारिक महत्त्व आहे. १८ एप्रिल रोजी बाबा भैरवनाथांच्या पूजेपासून या सोहळ्याला सुरुवात होते. या सोहळ्याच्या विविध कार्यक्रमांच्या तारखा समोर आल्या आहेत. (Latest Marathi Headline)
– १९ एप्रिल: भगवानांची पंचमुखी डोळी उखीमठ येथून निघून फाटा येथे पोहोचेल.
– २० एप्रिल: डोळी गौरीकुंड येथे रात्रीचा विसावा घेईल.
– २१ एप्रिल: डोळी पायी मार्गाने केदारनाथ धामला पोहोचेल.
– २२ एप्रिल: वृषभ लग्नाच्या शुभ मुहूर्तावर मंदिराचे दरवाजे सकाळी ८ वाजता उघडतील.
=======
Namakkal Anjaneyar: या मंदिरातील हनुमानाची मूर्ती दररोज वाढते
=======
उत्तराखंडची प्रसिद्ध चारधाम यात्रा या वर्षी अक्षय तृतीयेला सुरू होत आहे. चार धाम यात्रेच्या तारखा समोर आल्या आहेत. त्यामुळे भाविकांनी या तीर्थाटनासाठी विचार करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चार धाम यात्रेच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत. (Top Stories)
गंगोत्री आणि यमुनोत्री : १९ एप्रिल
केदारनाथ : २२ एप्रिल (सकाळी ८)
बद्रीनाथ : २३ एप्रिल (सकाळी ६:१५)
दरम्यान केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद झाल्यापासून ते ३१ जानेवारीपर्यंत, ३४ हजार १४० यात्रेकरूंनी चार धामांच्या हिवाळी तीर्थस्थळांना जसे की ओंकारेश्वर आणि पांडुकेश्वर मंदिरे भेट दिली आहे. उत्तराखंड पर्यटनासाठी हे एक नवीन ठिकाण प्रचलित झाले आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
