आजपासून भाविकांना केदारनाथ मंदिराचे (Kedarnath Temple) दर्शन घेता येणार आहे. सकाळी वैदिक मंत्रोच्चाराने केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar singh Dhami) देखील उपस्थित होते. मंदिराला 15 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते.
केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या वेळी 10 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. केदारनाथ धाम 2 वर्षांनंतर सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. आजपासून दररोज 12 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. शुक्रवारी सकाळी 6.25 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे पूर्ण विधीपूर्वक उघडण्यात आले.
====
हे देखील वाचा: भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, नियम मोडल्यास काय होणार शिक्षा ?
====
यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी प्रामुख्याने उपस्थित होते. दरवाजे उघडण्याच्या वेळी केदारनाथ धाममध्ये सुमारे 10 हजार भाविक उपस्थित होते. संपूर्ण केदारनाथ धाम हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.
3 मे पासून चार धाम यात्रा सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. शुक्रवारी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्याने भाविक आणि यात्रेकरूंचा मोठा मुक्काम पूर्ण होणार आहे. 8 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्याने भाविकांना चार धामची यात्रा पूर्ण करता येणार आहे.
====
हे देखील वाचा: उन्हाळ्यात ताक सेवन करणे ठरेल फायदेशीर, पण वाढू शकतात ‘अशा’ लोकांच्या समस्या!
====
केदारनाथ मंदिराचे दरवाजे दोन वर्षांनंतर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होत आहेत. भाविकांच्या आगमनासाठी बाबा केदार यांचा धाम १५ क्विंटल फुलांनी सजवण्यात आला होता. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि 10 हजार भाविकांनी बाबा केदारचे दरवाजे उघडल्यानंतर त्यांची पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली.