कट्टप्पानं बाहुबलीला का मारलं? हा प्रश्न खूप लोकप्रिय झाला. बाहुबली या लोकप्रिय चित्रपटातील बाहुबलीच्या भूमिकेइतकीच कटप्पाची भूमिका ही महत्त्वाची होती. या कटप्पाची भूमिका जशी लक्षात राहिली तसेच त्याचे कपडेही (Dress designer) लक्षवेधी ठरले. कायम लोखंडी चितलखत घालून युद्धाला तयार असलेला हा कटप्पा लक्षात राहिलाच पण त्याचा पोशाखही तेवढाच लोकप्रिय झाला. या कटप्पाचे हे कपडे कोणी तयार केले आहेत, हे जाणून घेतलं तर अधिक आश्चर्य वाटेल. हे कपडे तयार केले होते, ते उत्तरप्रदेशच्या मेरठ येथील एका डॉक्टरनं. फक्त कटप्पाच नाही तर हॉलीवूड-बॉलिवूड अॅक्शन चित्रपटांत लागतील ते कपडे आणि शस्त्रे मेरठमध्ये तयार होतात. अगदी हॉलिवूडमधील चित्रपट नार्निया ते बॉलिवूडमधील अनेक ऐतिहासिक चित्रपटातील पात्रांसाठीचे कपडे मेरठमध्ये तयार करण्यात आले आहेत. फक्त कपडेच नाही तर आवश्यक अशी शस्त्रास्त्रही मेरठमध्ये तयार होत आहेत. हे सर्व करणारा अवलीया म्हणजे, डॉक्टर रामकुमार वर्मा. पेशानं डॉक्टर असलेले राजकुमार वर्मा यांनी आपल्या छंदाला व्यवसायाचे रुप दिले आहे. आता त्यांच्या मेरठमधील कारखान्यात 200 च्या वर कामगार काम करीत आहेत. (Dress designer)

ऐतिहासिक घटनांबद्दल उत्सुकता, अभ्यासूवृत्ती यामुळे एका वेगळ्या व्यवसायाची उभारणी करुन त्याला देशविदेशात लोकप्रिय करणारे डॉ. राजकुमार वर्मा हे मेरठमध्ये चिलखतींचे बादशहा म्हणून ओळखले जातात. रामकुमार वर्मा हे मेरठचे रहिवासी आहेत. ते येथील लिसाडी गावातून 2013 पासून चिलखती कपड्यांचे उत्पादन (Dress designer) करत आहेत. त्यांचे हे चिखलती कपडे भारतासह परदेशातील चित्रपटांमध्येही मोठ्या संख्येनं वापरण्यात येत आहेत. हॉलीवूड आणि बॉलिवूड चित्रपटासाठी लागणारे हे खास कपडे आता मेरठची ओळख झाली आहे. किंग ऑफ नार्निया, किंग ऑफ गॉड, बॅटल ऑफ नेशन्स अशा हॉलीवूडच्या चित्रपटातील कपडे हे उत्तर प्रदेशमधील मेरठमधल्या साध्या गावात तयार झाले आहेत, हे वाचून आश्चर्य वाटेल. वास्तविक मेरठची ओळख स्पोर्टस सिटी अशी आहे. आता या ओळखीत आणखी एक भर पडली आहे, ती चिखलती कपड्यांची नगरी म्हणून. हॉलीवूड, बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये चिखलती कपडे आणि शस्त्रांस्त्रांची मागणी होत आहे. ही मागणी मेरठमध्ये पूर्ण करण्यात येते. 20 हून अधिक देशांमध्ये मेरठचे हे कपडे पाठवण्यात येतात हे विशेष. (Dress designer)
मेरठमधील हे कलाकार म्हणजे रामकुमार वर्मा. अॅक्शन चित्रपट, ऐतिहासीक चित्रपट, धार्मिक चित्रपट , स्वातंत्र्यलढ्यावर बनवलेले चित्रपट, नाटके, माहितीपट, नाटके आदी सर्वांसाठी लागणा-या खास कपड्यांचे बुकींग राजकुमार वर्मा यांच्याकडे करण्यात येत आहे. राजकुमार वर्मा हे पेशानं डॉक्टर आहेत. त्यांचे मेरठ येथे क्लिनिकही होते. मात्र प्रॅक्टीस करत असतांनाही त्यांना काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. त्यांना इतिहासाची मुळात आवड होती. त्यामुळे ऐतिहासिक पात्रे कशी दिसत असतील, हे जाणण्याची उत्सुकता होती. यातूनच या व्यवसायाची कल्पना आल्याचे ते सांगतात. सुरुवातीला एका मित्रासोबत त्यांनी योद्ध्यांसाठी कपडे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मात्र पुढे नेमकं काय करायचं याची कल्पना नव्हती. अशापद्धतीचे कपडे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये जास्त वापरण्यात येतात. त्यामुळे तिथे त्यांनी तयार केलेले कपडे पाठवले. तेथील स्टुडिओमधून त्यांना ऑर्डर यायला लागल्या. सहज म्हणून सुरु केलेला हा व्यवसाय करण्यासाठी मग त्यांनी डॉक्टरीची प्रॅक्टिसही सोडून दिली.(Dress designer)
======
हे देखील वाचा : मीर जाफरच्या कारणास्तव इंग्रजांनी भारतावर केले शासन, प्रियंका गांधींनी असे का म्हटले?
======
रामकुमार त्यांच्या कारखान्यात लोखंड आणि मिश्र धातूपासून चिलखत, मुखवटे, योद्ध्यांसाठी बूट बनवतात. महिला आणि पुरुषांसाठी ते वेगवेगळे कपडे तयार करतात. आता राजकुमार यांच्याकडे 200 कामगार आहेत. या कपड्यांना सर्वाधिक मागणी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये असल्याचे रामकुमार सांगतात. रामकुमार यांची किर्ती बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय सिनेमांमध्येही आहे. तेथील दिग्दर्शकही राजकुमार यांच्याकडेच कपडे तयार करुन घेतात. फारकाय बाहुबली या लोकप्रिय चित्रपटामधील कटप्पाचा चिखलती ड्रेस राजकुमार यांनीच तयार केला होता. बॉलिवूडमध्येही त्यांच्या कपड्यांना मागणी आहे. पद्मावत चित्रपटातील वेशभूषेपासून ते पानिपत चित्रपटातील अभिनेत्यांनी परिधान केलेले कपडे राजकुमार वर्मा यांनी तयार केले आहेत. अनेक मॉडेल्स, फॅशन स्टायलिस्टही त्यांच्याकडे खास कपड्यांच्या डिझाईन घेऊन येतात. परदेशातील शाळांमध्ये त्या काळातील कपडे घालूनच इतिहास शिकवला जातो, त्यामुळे तेथील शाळांमधूनही मोठी मागणी असल्याचे राजकुमार सांगतात. राजकुमार वर्मा यांनी 15 हून अधिक हॉलिवूड चित्रपटांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहे. ब्रिटिश, ज्यू, इराणी, अफगाणी, मुघल काळासाठी कपडे तयार करण्यात त्यांची खासियत आहे(Dress designer). आपल्या छंदाला वेळ देऊन त्याला व्यवसायात रुपांतरीत केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे राजकुमार वर्मा सांगतात.
सई बने