येत्या बुधवारी, म्हणजेच 16 डिसेंबर रोजी होणा-या कालभैरव जयंतीसाठी (Kalabhairav Jayanti)काशी नगरी सज्ज होत आहे. कालभैरवाचा उल्लेख काशीचा कोतवाल म्हणून केला जातो. भगवान शंकराचेच एक रुप असलेल्या कालभैरवाची पूजा अर्चना केल्याशिवाय भगवान शंकराचे दर्शन होत नाही, असे मानण्यात येते. बाबा विश्वनाथांनी कालभैरवाला काशी नगरीच्या रक्षणाची जबाबदारी सोपवल्याची मान्यता आहे. त्यामुळे कालभैरवाचा जन्मउत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. काशीतील कालभैरवाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील भाविकांची गर्दी होते. यासाठी काशीनगरी सज्ज होत आहे.
काशीचे कालभैरव मंदिर हे या देवनगरीमधील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. बाबा विश्वनाथ यांनी कालभैरववाला काशीचे क्षेत्रपाल म्हणून नियुक्त केल्याची मान्यत आहे. अनुचित प्रकार करणा-या काशीवासीयांना शिक्षा करण्याचा अधिकार कालभैरवाला आहे अशी धारणा येथील नागरिकांची आहे. काशीतील या कालभैरव मंदिरात दर रविवार आणि मंगळवारी ढोल, डमरु आणि घंटांच्या नादात आरती करण्यात येते. या आरतीला मोठी गर्दी असते. काशीत भगवान शंकराच्या दर्शनाआधी त्याच्या या रक्षकाचे दर्शन आवश्यक घेतले जाते. त्यासाठी आधी काशी कोतवालाची पूजा मग दुसरे काम अशी म्हणही या नगरीत रुढ झाली आहे. (Kalabhairav Jayanti)
बारा ज्योतिर्लिंगांपैकी मुख्य काशी विश्वनाथ मंदिर बनारसमध्ये अनादी काळापासून आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीचे वास्तव्य या पुण्यनगरीत आहे. यासोबतच कालभैरवाचेही वास्तव्य या नगरीत असल्याचे मानण्यात येते. या शहरात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी काशी कोतवाल म्हणजेच बाबा काल भैरवाची पूजा केली जाते. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन वर्षापूर्वी झाले होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आधी कालभैरवाची पूजा केली होती. भैरवबाबांच्या इच्छेशिवाय काशी नगरीत काहीही घडत नाही आणि संपूर्ण शहराची सुरक्षा त्यांच्या हातात आहे, असे मानले जाते. काशीचे लोक असेही म्हणतात की बाबा विश्वनाथाच्या मंदिराजवळ एक पोलीस ठाणे आहे, ज्याचे रक्षण स्वतः कालभैरव करतात. (Kalabhairav Jayanti)
महाभारत आणि उपनिषदांमध्येही याबाबत उल्लेख आहे. काशीमध्ये कालभैरवाची स्थापना झाल्यामागे एक पौराणिक कथा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, असे म्हटले जाते की एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात चर्चा सुरू झाली की त्यांच्यापैकी कोण मोठा आणि शक्तिशाली आहे. या वादात भगवान शिवाचीही चर्चा झाली. या चर्चेदरम्यान ब्रह्माजींच्या पाचव्या मुखाने भगवान शिवावर टीका केली. हे ऐकून बाबा भोलेनाथांना खूप राग आला. भगवान शंकराच्या या कोपामुळे कालभैरवाचा जन्म झाला. याच कारणामुळे कालभैरव देखील शिवाचा अंश मानला जातो.
========
हे देखील वाचा : लग्नात वधूला रडावेच लागते! नाहीतर उडवली जाते खिल्ली, ‘या’ गावाची आहे अचब प्रथा
========
भैरवाची दोन रूपे आहेत, एक बटुक भैरव, ज्याला शिवाचे बालस्वरूप मानले जाते. जे वाईट करतात त्यांना कालभैरवाच्या क्रोधाला सामोरे जावे लागते, परंतु ज्याच्यावर तो प्रसन्न होतो, त्याला कधीही नकारात्मक शक्ती, आजारपण, आदी समस्यांनी जाणवत नाहीत, असे मानले जाते. कालभैरव जयंती (Kalabhairav Jayanti)मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते. यामागेही कथा सांगितली जाते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदांमध्ये, जो सर्वशक्तिमान आहे, ज्यामध्ये सर्व जीव सामावलेले आहेत, ज्यामध्ये भूत, भविष्य आणि वर्तमान सामावलेले आहे, ज्याला आरंभ किंवा अंत नाही, जो अजन्मा आहे, जन्म आणि जन्म, मृत्यू, ज्याचा दुःखाशी काहीही संबंध नाही, ज्याच्या उपासनेने देव, दानव, योग सर्व पापांपासून मुक्त होतात. तो शंकर श्रेष्ठ आहे. भगवान विष्णूंनी वेदांचे म्हणणे आनंदाने स्वीकारले, परंतु ब्रह्मदेवाचा अहंकार शांत झाला नाही आणि ते स्वतःला विश्वाचा निर्माता मानत होते. तेव्हा भगवना शंकराला आलेल्या क्रोधापासून कालभैरवाची उत्पत्ती झाल्याचे मानण्यात येते.
याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी होती. काशीमध्ये ब्रह्मदेवाचे मस्तक ज्या ठिकाणी पडले त्याला कपाल तीर्थ म्हणतात. याचवेळी भगवान शिवाने कालभैरवला काशीचा कोतवाल नेमले. तेव्हापासून काल भैरवाचे वास्तव्य काशीत असून बाबा विश्वनाथाची पूजा करण्याआधी कालभैरवाची पूजा करण्यात येते. कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालणे चांगले मानले जाते. कारण कालभैरवाचे वाहन कुत्रा मानले जाते.याच कालभैरवाच्या मंदिरामध्ये होणा-या उत्सवासाठी आता तयारी करण्यात येत आहे. हा संपूर्ण आठवडा कालभैरवाचा उत्सव (Kalabhairav Jayanti)काशी नगरीत साजरा होणार आहे.
सई बने