दिवाळीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात येणारी ही पौर्णिमा अनेक अर्थानी खास मानली जाते. याच पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात. कार्तिक पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या विशेष मानली जाते. ही तिथी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते. हा दिवस भगवान शिव आणि विष्णू यांच्यासोबतच भगवान कार्तिकेय यांना देखील समर्पित आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान केले जाते. संध्याकाळी नद्यांना दीपदान देखील केले जाते. मान्यतेनुसार, या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व पाप दूर होत श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. (Kartik Pournima)
भगवान कार्तिकेय यांची या दिवशी पूजा केली जाते तसेच त्यांचे दर्शन घेऊन त्यांना मोरपीस देखील अर्पण करण्याची रीत आहे. कार्तिक पौर्णिमा तिथी ही कार्तिकेयला समर्पित आहे. या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला महत्त्व आहे. मान्यतेनुसार, फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच महिलांना कार्तिकेय स्वामीचे दर्शन घेता येते. त्यानंतर, वर्षभर कार्तिक स्वामी यांचे दर्शन महिलांसाठी वर्ज्य मानले जाते. या दिवशी दिवसभर कार्तिकेय स्वामी मंदिर दर्शनासाठी खुले राहतील. दिवसभारात कोणत्याही शुभ मुहूर्तावर कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेता येईल. (Lord Kartikey)
कार्तिक स्वामी यांच्याबद्दल आपण सर्वांनी कमी अधिक प्रमाणात ऐकले आहे. आपण भगवान करतीय यांच्या काही गोष्टी देखील ऐकल्या असतील. भगवान कार्तिकेय हे शिव शंकर आणि माता पार्वती यांचे जेष्ठ पुत्र आणि भगवन गणेश यांचे वडील बंधू आहेत. करतीय यांचा जन्म एका खास कारणासाठी झाला होता. खूपच कमी वयात त्यांनी मोठे कर्तृत्व गाजवले आणि थेट युद्धाची देवता म्हणून नावलौकिक कमावला. भगवान करतीय यांच्या जन्माशी संबंधित आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक आख्ययिका प्रचलित आहेत. आज आपण कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान कार्तिकेय यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. (Social Updates)

भगवान कार्तिकेय जन्मकथा
कथेनुसार, सतीच्या मृत्यूनंतर जेव्हा भगवान शिव दीर्घ तपश्चर्येत मग्न होते, तेव्हा तारकासुर या राक्षसाने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवाच्या पुत्राच्या हातून अमर होण्याच्या उद्देशाने भगवान ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले. भगवान शिव तपश्चर्येत तल्लीन राहतील असा विचार करून त्यांनी स्वतःला अमर समजले आणि तिन्ही जग जिंकून त्यांचा छळ सुरू केला. (Todays Marathi Headline)
========
Vaikuntha Chaturdashi : वैकुंठ चतुर्दशीचे महात्म्य आणि पूजा मुहूर्त
Guru Nanak Jayanti : जाणून घ्या शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव कोण होते?
========
तारकासुराला वाटले की भगवान शिव माता सतीपासून विभक्त होऊन तपश्चर्या करीत आहेत आणि ते लग्न करणार नाहीत, मग त्यांना मुलगा कसा होईल. त्याने आपला भाऊ सुरपद्म यांच्यासह तिन्ही लोकांमध्ये खूप कहर निर्माण केला आणि देवांना स्वर्गातून हाकलून दिले. परंतु स्वर्गात राज्य केल्यानंतर तारकासुराचे अत्याचार वाढू लागले आणि लोक त्याच्या आणि त्याच्या मुलाच्या दहशतीने त्रस्त होऊ लागले. (Top Marathi News)
जेव्हा देवतांनी ब्रह्मदेवाकडे मदत मागितली तेव्हा त्यांना तारकासुराच्या मृत्यूचे रहस्य कळले. तसेच, भविष्यात, शिवाला पार्वतीशी लग्न करणे अपेक्षित होते, पण भगवान शिव तपश्चर्येत होते. शिव आणि पार्वतीचा विवाह लवकर व्हावा म्हणून मग देवांनी प्रयत्न सुरू केले. यासाठी त्यांनी कामदेवांना शिवाची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले, परंतु त्याचा परिणाम असा झाला की भगवान शिवांच्या कोपामुळे कामदेव जळून राख झाला. (Marathi News)
पण त्यानंतर शिवाने पार्वतीशी विवाह केला, त्यानंतर भगवान कार्तिकेयचा जन्म झाला. भगवान कार्तिकेय युद्ध कलेत पारंगत होते आणि भाला हे त्यांचे प्रमुख शस्त्र होते. देवतांनी त्याला आपला सेनापती बनवले आणि कार्तिकेय आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन तारकासुराशी लढायला निघून गेला. असे म्हणतात की पर्वताचा एक भाग मोर बनला जो भगवान कार्तिकेयाचे वाहन बनला आणि दुसरा भाग कोंबडा बनला ज्याला त्याच्या ध्वजात स्थान मिळाले. तारकासुराच्या अंतानंतर देवतांनी भगवान कार्तिकेयाला कायमचे आपले सेनापती बनवले आणि त्यामुळे ते त्याची युद्धदेवता म्हणून पूजा करू लागले. प्राचीन काळी जेव्हा राजे युद्धाला जात, तेव्हा ते प्रथम भगवान कार्तिकेयची पूजा करायचे. (Latest Marathi Headline)

भगवान कार्तिकेय जन्मकथा २
शंकर-पार्वती यांच्या संबंधानंतर शंकराचे बीज अग्नीत पडले. परंतु ते इतके प्रखर होते की अग्नीही त्याला स्वीकारू शकले नाहीत आणि त्यांनी ते बीज “वायू’कडे सोपवले. वायूलाही ते सांभाळता आले नाही आणि त्याने ते बीज गंगा नदीत सोडले. गंगेचे शीतल पाणीही या प्रखरतेला थंड करू शकले नाही उलट गंगेचे पाणीच या बिजामुळे उकळू लागले आणि आजूबाजूचे जंगल वणव्यासारखे पेटू लागले. हे अग्नीतांडव थांबल्यानंतर गंगेच्या किनारी कमळाच्या फुलामध्ये सहा अपत्ये दिसू लागली. (Top Marathi Headline)
कृतिका नक्षत्रांमधून सहा कृतिका खाली अवतरल्या आणि त्यांनी या सहा अपत्यांना स्वीकारले. शेवटी पार्वतीने या सहाजणांना एकत्र जोडले. या मुलाला सहा तोंडे होती आणि त्याच्यात सहाजणांची शक्ती होती. त्या शक्तीवान बालकाने तारकासुराचा वध केला. दक्षिण भारतात त्याने सुरपद्मला मारले असा उल्लेख आहे. एक महान योद्धा म्हणून त्याला दक्षिण भारतात पुजले जाते. परंतु कथेत असे म्हटले गेले आहे की, शंकर आणि कार्तिकेयमध्ये मतभेद होते, ज्यामुळे कैलाश पर्वत सोडून अगस्ती ऋषीसोबत कार्तिकेय दक्षिण भारतात निघून गेला आणि म्हणूनच कार्तिकेयची पुजा आता उत्तर भारताऐवजी दक्षिणेकडे अधिक होते. (Latest Marathi News)
भगवान कार्तिकेय यांच्याबद्दल काही ठिकाणी सांगितले जाते की, मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला कार्तिकेयाचा देवसेनेशी विवाह झाला आणि त्याच दिवशी शारीरिणीश्री त्याच्या आश्रयाला आली. श्री-कार्तिकेय मीलन ज्या तिथीला झाले ती महातिथी श्रीपंचमी म्हणून प्रसिद्ध झाली. अनेक ठिकाणी कार्तिकेय यांची एक पत्नी देवसेना आणि दुसरी श्री असे सांगितले आहे. दक्षिण भारतात कार्तिकेयाच्या पत्नीचं नाव वळ्ळी असे आहे. दक्षिण भारतात कार्तिकेयाला सुब्रह्मण्य किंवा मुरुग असे म्हणतात. तो दोन स्त्रियांचा पती आहे, असे मानले जाते. (Marathi Trending Headline )
काही कथांमध्ये कार्तिकेय ब्रह्मचारी असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातील काही आख्ययिकांनुसार भगवान कार्तिकेय ब्रह्मचारी असून स्त्रीने कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर ती विधवा होते, अशी समजूत आहे. ‘ज्या स्त्रिया भगवान कार्तिकेयाचे दर्शन घेतील त्या स्त्रियांना सात जन्म वैधव्य येईल, असा कार्तिकेयाने स्त्रीजातीला शाप दिला असल्याची कथा मराठी ‘शिवलीलामृतात’ आहे. परंतु या गोष्टीला पुराणांमध्ये कुठेही आधार नाही. याउलट बंगालमध्ये कार्तिकेयाची क्षणिका (मातीची मूर्ती) करून पुत्रलाभासाठी त्याची पूजा करतात. (Top Stories)
कार्तिकेय हा दक्षिण भारताचा एक महत्त्वपूर्ण देव म्हणून ओळखला जातो. तामिळनाडूच्या पलनी शहरात उंच डोंगरावर कार्तिकेयचे भव्य मंदीर अतिशय प्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे इथे ब्रह्मचारी रुपात कार्तिकेय नसून दोन पत्नींसह त्याची मूर्ती दिसते. इंद्राची कन्या सेना ही पहिली पत्नी तर पृथ्वीची कन्या वल्ली ही दुसरी पत्नी असल्याचे मानले जाते. कार्तिकेयला दक्षिणेकडे मुरुगन म्हणूनही ओळखले जाते. अति प्राचीन तमिळ संगम साहित्यात असे उल्लेख आहेत की, उंच डोंगरावर, हातात भाला पकडणारा लाल रंगाचा एक देखणा पुरूष जो स्वर्ग आणि पृथ्वी या दोहोंचाही समन्वय साधून आहे. (Top Trending News)
=======
Kartik Purnima : जाणून घ्या त्रिपुरारी पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या दीपदानाचे महत्त्व
=======
मोरावर स्वार असलेल्या कार्तिकेयचा मंगळ ग्रहाशी संबंध जोडण्यात आला होता. युद्ध देवता आणि या देवतांचे सेनापती असलेले कार्तिकेय यांच्या अनेक मुर्त्या स्थापन केल्या जायच्या. परंतु हळूहळू राजेमहाराजांसोबत कार्तिकेयची जागा दुर्गाने घ्यायला सुरूवात केली आणि कार्तिकेयचे महत्त्व कमी झाले. अरब मध्ये यजीदी जातीचे लोकं देखील त्यांची पूजा करतात, हे त्यांचे आराध्य दैवत आहे. उत्तरी ध्रुवाजवळील प्रदेशात उत्तर कुरु विशेष क्षेत्रात त्यांनी स्कंद नावाने राज्य केले. त्यांचा नावावरच स्कंद पुराण आहे. भगवान स्कंद’ कुमार कार्तिकेय’ या नावाने देखील ओळखले जातात. (Social News)
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
