दिवाळीचा सण हा भाऊबीज झाल्यानंतर संपतो असेच अनेकांना वाटते मात्र असे अजिबातच नाहीये. भाऊबीजेनंतर देव उठनी एकादशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा हे दोन महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात. या दिवशी देखील घरासमोर पणत्या लावल्या जातात, फटाके फोडले जातात. त्रिपुरारी पौर्णिमेला दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशी मान्यता आहे. दिवाळी नंतर पंधरा दिवसांनी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी येते. कार्तिक पौर्णिमा हा पवित्र सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो. पुराण कथेतील माहितीनुसार त्रिपुरारी पौर्णिमेला, भगवान शंकर, भगवान विष्णू यांची रात्री १२ वाजता भेट होते. त्यामुळे या दिवशी शंकराला प्रिय असलेला बेल आणि भगवान विष्णूची प्रिय तुळस अर्पण करण्याची देखील रीत आहे. (Tripurari Purnima)
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची जुनी परंपरा आहे. या दिवशी दान करण्याला देखील मोठे महत्त्व दिले जाते. या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय्य पुण्य प्राप्त होते आणि मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला ‘देव दिवाळी’ असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव मिळाले. या दिवशी दीपदान करण्याचे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. (Marathi News)
यंदा कार्तिक पौर्णिमा तिथीची सुरुवात मंगळवार ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल. तर, या तिथीची समाप्ती बुधवारी ५ नोव्हेंबर रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी होणार आहे. मात्र, पौर्णिमा तिथीचा उदय ५ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार, कार्तिक पौर्णिमेचे व्रत, स्नान आणि दान ५ नोव्हेंबर २०२५ रोजी केले जाईल. यादिवशी गंगा स्नानाच ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५२ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असेल. तर पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपासून ते सकाळी ९ वाजून २० मिनिटांपर्यंत असणार आहे. (Todays Marathi Headline)
========
Tulshi Vivah : जाणून घ्या तुळशी विवाहाचे महत्त्व आणि कथा
========

कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात अर्थात उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात लावली जाते. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. याशिवाय याच दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्यरूपाने घेतलेला पहिला अवतार घेतला असल्याचे देखील सांगितले जाते. (Top Trending Headline)
यासोबतच त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंकराला समर्पित असलेला दिवस आहे. या दिवशी शिव शंकराचा विजय साजरा केला जातो. या दिवशी, भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. यामुळे, या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवाती जाळल्या जातात. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी मान्यता आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकल्याने आणि पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच, धन-संपत्तीची कमतरता भासत नाही. (Top Marathi News)
त्रिपुर राक्षसाची कथा
त्रिपुर नावाचा एक राक्षस होता. त्याने तीर्थक्षेत्री मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन ‘वर माग’ असे सांगितले, त्रिपुराने देवता, मनुष्य, निशाचर, स्त्री किंवा रोग यांच्यापासून मला मृत्यू न येऊदे आणि त्यांच्यापासून अभय मिळावे, असा वर मागितला. ब्रह्मदेवाने त्यावर ‘तथास्तु’ म्हटले. ब्रह्मदेवाच्या या वरामुळे त्रिपुरासुर भलताच माजला. त्याची तीन पुरे होती. ती आकाशसंचारी होती. (Latest Marathi Headline)

त्रिपुर त्या पुरात बसून त्रैलोक्याला त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासामुळे सर्व देव वैतागले आणि भगवान शंकराला शरण गेले. भगवान शंकरानी त्याची तीन आकाशसंचारी पुरे जाळून टाकली आणि त्रिपुरासुराला ठार मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली घडली. त्यामुळे कार्तिक पौर्णिमा प्रदोषकाली असेल त्या पौर्णिमेला ‘त्रिपुरारी’ किंवा ‘त्रिपुरी’ पौर्णिमा असे नाव मिळाले. लोक त्या दिवसापासून दर कार्तिक पौर्णिमेला प्रदोषकाली दीपोत्सव करून त्रिपुरसंहाराचा आनंद व्यक्त करू लागले. (Top Trending News)
=======
Amla Navmi : आवळा नवमीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने होईल भरभराट आणि प्रगती
Amla Navami : जाणून घ्या आवळा नवमीचे महत्त्व आणि माहिती
=======
तारकासुर राक्षसाची कथा
तारकासुर नावाच्या राक्षसाला ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे तीन पुत्र होते. मयासुराने या तीन पुत्रांसाठी तीन पुरे बनवून या तिघांना ती दिली. मयासुराने ही पुरे देतांना त्याना बजाविले की ‘ तुम्ही कधीही देवांच्या वाटेला जाऊ नका. तसेच देवांचा कधीही अनादर करू नका. परंतु, कालांतराने या तिन्ही पुराधिपतींची बुद्धी चळली. त्याना दुर्बुद्धी सुचली. ते देवांना त्रास देऊ लागले. सर्व देव भगवान शंकराला शरण गेले. शंकराने या तिन्ही राक्षसांशी युद्ध करून त्यांच्या त्रिपुरांचे दहन केले. त्यामध्येच ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या तिन्ही राक्षसांचा अंत झाला. त्यानंतर लोक आनंदाप्रीत्यर्थ दीपोत्सव करू लागले. कार्तिक पौर्णिमेचा दिवस उत्तर प्रदेशात स्कंदजयंती म्हणून मानतात. यादिवशी स्कंदमूर्तीची (कार्तिकेयाची) पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस चंद्र कृत्तिका नक्षत्रात असतांना जर स्कंदाचे (कार्तिकेयाचे) दर्शन घेतले तर ते महापुण्यकारक असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. (Social News)
( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
