Home » Tripurari Purnima : त्रिपुरारी पौर्णिमेला ‘हे’ उपाय करून मिळवा सुख-समृद्धी

Tripurari Purnima : त्रिपुरारी पौर्णिमेला ‘हे’ उपाय करून मिळवा सुख-समृद्धी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tripurari Purnima
Share

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. या दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. असे म्हटले जाते की, यादिवशी भगवान शिव आणि विष्णूची भेट होते म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाला तुळशी आणि विष्णूला बेल वाहिला जातो. तिमिराकडून तेजाकडे घेवून जाणारा, प्रकाशाची वाट दाखविणारा दिवस म्हणून या दिवसाचे वर्णन केले जाते. कार्तिक पौर्णिमेचे अनेक अर्थी महत्त्व आपल्या पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे. भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. यामुळे देव आनंदाने दिवाळी साजरी करतात. या त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावून आनंद साजरा केला जातो. (Marathi)

कार्तिक पौर्णिमा तिथी ही ४ नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री १० वाजून २६ मिनिटांनी सुरु होईल. तर, या तिथीची समाप्ती ५ नोव्हेंबर बुधवारी रोजी रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी होणार आहे. उदय तिथीनुसार, कार्तिक पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान ५ नोव्हेंबर २०२५ रोजी केले जाईल. कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ गोष्टी घडल्याचे मानले जाते. यामध्ये भगवान विष्णूंनी मत्स्यरूपाने पहिला अवतार घेतला होता. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाचे पूजन केले जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. अनेक ठिकाणी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा देखील करण्याची प्रथा आहे. अशा या पवित्र दिवशी काही गोष्टी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. (Tripurari Purnima)

* महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमा हा महत्त्वाचा दिवस मनाला जातो. कार्तिक पौर्णिमेला महालक्ष्मीची विधिवत पूजा करू महालक्ष्मी स्तुतीचा पाठ करावा. असे केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात.

* कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने या दिवशी दान-पुण्य करणे शुभ मानले जाते. या दिवशी अन्न, दूध, फळे, तांदूळ, तीळ आणि आवळा दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच व्यक्तीच्या जवानातील सर्व संकट दूर होत त्याला सुखाची प्राप्ती होते. (Marathi News)

Tripurari Purnima

* कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते. त्यामुळे या दिवशी पवित्र नदी किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन दीपदान केले पाहिजे. दीपदान केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. यामुळे व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. (Todays Marathi Headline)

* कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये पहाटे स्नान करण्याला देखील मोठे महत्त्व आहे. यादिवशी पवित्र नद्या, जलाशयांमध्ये स्नान केल्याने पापांचे क्षालन होते.

* यादिवशी टिपूर अर्थात कपूर जाळण्याला देखील महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार त्रिपुरासुरावर भगवान शंकराने विजय मिळवल्याचे स्मरण म्हणून रामटेक येथील श्रीराम-लक्ष्मण मंदिरावर “टिपूर’ जाळण्यात आला होता तेव्हा पासून ही परंपरा सुरू आहे. (Marathi Headline)

* कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याला मोठे महत्त्व आहे. या दिवशी दीपदान केल्याने अकाल मृत्यू टाळता येतो, आपल्या मृतांच्या शांती मिळते, पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. शिवाय दीपदानामुळे कुंडलीतील यम, शनि, राहू आणि केतूचा प्रभाव कमी होतो. (Top Marathi News)

* त्रिपुरारी पौर्णिमेला घरात देवासमोर किंवा मंदिरात त्रिपूर वात लावली जाते. काहीजण १०५ वातींचा दिवा लावतात तर काही जण ७०० वातींंचा दिवा लावतात. एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे. कापसाचे सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास पद्धत आहे. पणतीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते. आजकाल तर बाजारामध्ये या वाती सर्रास मिळतात. शक्य असल्यास या वाती त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देवासमोर लावाव्या. (Latest Marathi Headline)

=========

Kartika Purnima : कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेची माहिती

=========

* या दिवशी विष्णूची सहस्त्र नावे घेवून बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे. इतरवेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो. अनेक घरांमध्ये विधीवत ही पूजा केली जाते. (Top Trending News)

* ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्ध्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्ध्य देण्याची सुद्धा प्रथा आहे.

* कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. (Social News)

( टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.