बॉलिवूडमध्ये आतापर्यंत आणि आगामी काळात अनेक चांगल्या चित्रपटांचे सिक्वल, रिमेक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिक्वल आणि रिमेकच्या गर्दीमध्ये अनेक चित्रपटांनी लोकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘भूल भुलैया 2’. अक्षय कुमार, विद्या बालन यांचा २००७ साली आलेला भूल भुलैया (Bhool Bhulaiyaa 2) सिनेमा प्रत्येकालाच आठवत असेल. या सिनेमाने तुफान कमाई करत प्रचंड लोकप्रियता मिळवली. आजही हा सिनेमा टीव्हीवर नेहमी पाहिला जातो. याच चित्रपटाचा सिक्वल भूल भुलैया 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचे सध्या जोरदार प्रमोशन चालू आहे. याच प्रमोशन दरम्यान कार्तिक आर्यनने एका मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टींवर मनमुराद संवाद साधला.
‘भूल भुलैया २’ सिनेमा कसा मिळाला याबद्दल कार्तिक म्हणाला, “सुरुवातीपासूनच मी हा सिनेमा करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. याचे कारण म्हणजे मी पहिल्यांदाच हॉरर कॉमेडी प्रकारचा चित्रपट करत आहे. जेव्हा पहिल्यांदा अय सिनेमाचे दिग्दर्शक अनीस बज्मी माझ्याकडे हा सिनेमा घेऊन आले ते तेव्हा त्यांनी आधी या सिनेमाची कथा मला ऐकवली आणि मग सिनेमाचे नाव सांगितले. एका नवीन आणि फारशी कथेवर ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiyaa 2)सिनेमाचा सिक्वल बनवला गेला आहे. तुम्ही देखील जेव्हा बघाल तेव्हा तुम्हालाही वाटेल जग तेच आहे, मात्र कथा नवीन आहे.”
======
हे देखील वाचा- शोले आणि स्वातंत्र्य
पुढे कार्तिकने त्याचा चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला तो म्हणाला, “जेव्हा मी सिनेमाच्या सेटवर रुह बाबाच्या गेटमध्ये तयार होऊन जायचो तेव्हा मला खरंच सुपरहिरो असलेली भावना मनात यायची. मी विज्ञान विषयाचा विद्यार्थी असल्याने माझ्यासाठी नेहमीच लॉजिक जास्त महत्वाचे असते. मात्र या सिनेमात दिग्दर्शक(Bhool Bhulaiyaa 2) तुम्हाला एका अशा जगात घेऊन जातो जिथे या सर्व गोष्टी मागे पडतात.”
अक्षय कुमारसोबत कार्तिकच्या होणाऱ्या तुलनेबद्दल त्याने सांगितले की, “हे तर होणारच होते. आता जर मी तुलनेचा विचार करायला बसलो तर माझे माझ्या कामावरून लक्ष्य विचलित होईल. जेव्हा पासून हा सिनेमा माझ्याकडे आला आहे, तेव्हापासून मी या सिनेमाकडे (Bhool Bhulaiyaa 2) एक फ्रेश सिनेमा म्हणूनच बघत आहे.”
कार्तिकला पुढे विचारले गेले की, त्याला एकाच भूमिकेत अडकून टाईप कास्ट होण्याची भीती वाटत नाही का? यावर तो म्हणाला, “मला अजिबात भीती वाटत नाही. मी माझी इमेज वाईट होण्यासाठीही नाही बनवली. जर मला एकामागोमाग एक तीन रोमॅंटिक सिनेमे ऑफर झाले आणि तिघांचीही कथा उत्तम असली तर मी नक्कीच ते करेल.(Bhool Bhulaiyaa 2) प्रेक्षकांनी माझ्या रोमंटिक चित्रपटांना आणि धमाका सिनेमाला जोरदार प्रतिसाद दिला.”
=====
हे देखील वाचा- अभिनेत्री माधुरी पवार म्हणतेय ‘या बया दाजी आलं’
खऱ्या आयुष्यात कार्तिक किती अंधविश्वासू आहे याबद्दल सांगताना तो म्हणाला, “मला दुसरी कशाची नाही पण अंधाराची खूप भीती वाटते. आजही जर मी एका हॉटेलच्या मोठ्या रूममध्ये एकटा असेल तर एक तरी लाईट चालू ठेऊन झोपेल. मला एकटे झोपताना डोक्यात वेगवेगळे विचार येतात. माझा अंधविश्वासावर विश्वास नाही. मात्र हा मी चांगल्याआणि वाईट एनर्जीवर विश्वास ठेवतो.”
कियारा अडवाणी, तब्बू आणि राजपाल यादव आदी कलाकारांची देखील ‘भूल भुलैया २’ सिनेमात महत्वाच्या भूमिका असणार आहे.