अडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्स प्रकरणी कोर्टाने माजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर १.२२ लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम स्टॉर्मी डेनियल्सला दिली जाईल. आता या प्रकरणी आणखी एक नाव समोर आले आहे. कोर्ट रुममध्ये वादादरम्यान प्रॉसिक्युटरने ट्रंपवर आरोप लावत असे म्हटले की, त्यांनी आणखी एका महिलेला पेमेंट केले आणि तिचे नाव करेन मॅकडॉगल (Karen McDougal) असे आहे.
मॅकडॉगल अमेरिकेच्या प्रसिद्ध मॅगझिन प्लेबॉयची मॉडेल होती. डेनियल प्रकारे तिने सुद्धा असा दावा केला की, माजी अमेरिकन राष्ट्रपतींसोबत त्यांचे शारिरिक संबंध होते. त्यांचे अफेअर १० महिन्यांपर्यंत होते. दरम्यान, डोनाल्ड ट्रंप यांनी मॅकडॉगल यांचे आरोप फेटाळून लावत असे म्हटले की, असे कधीच झालेले नाही.
अमेरिकेच्या इंडियानामध्ये जन्मलेली मॅकडॉगल २० वर्षापासून मॉडलिंग करत होती. तिची फॅमिली मिशिगन मध्ये राहते. कमी वयातच स्विमवेअर कॉम्पिटीशनमध्ये हिस्सा घेण्यास सुरुवात केली होती. मॉडलिंगच्या फोटोंमुळे ती प्रसिद्ध झाली आणि प्लेबॉयच्या रुपात काम करणे सुरु केले. येथे काम करत त्यांनी १९९८ मध्ये प्लेमेट ऑफ द इअरचा अवॉर्ड जिंकला.
मॅकडॉगल ९० च्या दशकातील सर्वाधिक चर्चित मॉडेल होती. पामेला एंडरसननंतर मॅकडॉगल दुसऱ्या स्थानावर होती आणि तिने ९० च्या दशकात प्लेमेट म्हणून निवडले गेले. त्यानंतर त्यांनी एक फिटनेस मॉडेलच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. १९९९ मध्ये मॅकडॉगल पुरुषांच्या फिटनेस मॅगजिनच्य कवरपेजवर येणारी पहिली मॉडेल बनली. मॅकडॉगल सिनेमांमध्ये लहान-मोठ्या रोलमध्ये दिसली. तिचा सर्वाधिक फोकस मॉडलिंगवर होता.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, माजी अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून मॅकडॉगल सोबतची पहिली भेट २००६ मध्ये लॉस एंजिल्सच्या प्लेबॉय मेंन्शन मध्ये झाली. त्या दरम्यान ती द अपरेंटिसचा एपिसोड शूट करत होती. मॉडलने असा दावा केला आहे की, मी विवाहित होती, तरीही डोनाल्ड ट्रंप यांना मी आवडायची. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे. आम्ही एका महिन्यात पाच वेळा भेटलो. CNN ला दिलेल्या एका मुलाखतीत मॉडेलने असा दावा केला की, ट्रंप आणि त्यांच्यामध्ये प्रेम हे सहमतीने झाले आणि ट्रंप यांनी तिच्यासोबत कोणतीही जबरदस्ती केली नाही.(Karen McDougal)
हे देखील वाचा- एडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियलन्सने डोनाल्ड ट्रंप यांच्याबद्दल केले ‘हे’ खुलासे
२०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूकीदरम्यान मॅकडॉगलने अमेरिकन वृत्तपत्र नॅशनल एंक्वेररसोबत १.२५ कोटी रुपयांची डील साइन केली होती. या करारत त्यांनी कथित संबंधाबद्दल सार्वजनिक रुपात बोलण्यावप बंदी घातली होती. हेच कारण होते की, या संबंधित आर्टिकल कधीच प्रकाशित झाले नाही आणि त्यांनी या नात्याबद्दल गप्प राहण्यासाठी फसवले.या डीलनंतर वृत्तपत्राने ट्रंप बद्दलच्या निगेटिव्ह स्टोरीज दाबवण्यास सुरुवात केली. आपल्या अधिकृत वेबसाइटवर मॅकडॉगनने स्वत:ला मॉडेल, कॉलमिस्ट, एडवोकेट आणि स्पोक्स मॉडेल असे सांगितले. तिने स्वत:ने ब्रेस्ट इम्प्लाइटमुळे होणाऱ्या आजारांबद्दल महिलांना जागृक करते. मॅकडॉगलने २०१७ मध्येच आपले ब्रेस्ट इम्प्लांट हटवले होते. ऐवढेच नव्हे तर २०१८ मध्ये तिने आपल्या अफेअरसाठी ट्रंप यांची पत्नी मेलानियाची माफी सुद्धा मागितली. तिने असे म्हटले होते की, जेव्हा मी मागील आयुष्य पाहते तेव्हा मी चुकल्याचे वाटत राहते.