हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित नेहमीच अनेक वाद समोर येत असतात. कधी कलाकारांवरून वाद, कधी चित्रपटाच्या नावावरून, कधी शब्दांवरून, कधी दिग्दर्शकांवरून तर कधी चित्रपटाच्या संगीतावरून एक ना अनेक वाद नेहमीच एका नवीन येणाऱ्या चित्रपटासोबत येत असतात. आता मीडियाला आणि बॉलीवूडला देखील याची सवय झालीच असेल. नुकताच वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित, बहुचर्चित असणाऱ्या ‘जुग जुग जियो’ सिनेमाचा दमदार ट्रेलर समोर आला आहे. मागील अनेक काळापासून हा सिनेमा सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत होता. आता या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. एकीकडे हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलरची चर्चा रंगत असतानाच दुसरीकडे या चित्रपटाच्या एका गाण्यावरून एक नवीन वाद समोर आला आहे. (jug jug jiyo)
झाले असे की, ‘जुग जुग जियो’(jug jug jiyo) चित्रपटामधील ‘नाच पंजाबन’ हे गाणे एका पाकिस्तानी गाण्याचे कॉपी वर्जन आहे असे म्हणत पाकिस्तानी गायक असणाऱ्या अबरार उल हकने सोशल मीडियावर एक ट्विट करत करण जोहरवर गाणे चोरल्याचा आरोप मोठा आरोप केला. यासोबतच त्याने करण जोहर आणि टीमवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे देखील सांगितले होते. मात्र गायक अबरार उल हकच्या या आरोपावर टि सिरीजने उत्तर दिले आहे. टि सिरीजने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करत टि सिरीजने अबरार उल हकच्या आरोपाला उत्तर देत सर्व आरोप नाकारले आहेत.
टि सिरीजने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले, “१ जानेवारी २००२ मध्ये आयट्यून्सवर रिलीज करण्यात आलेल्या ‘नाच पंजाबन’ या म्युझिक अल्बममधील ‘नाच पंजाबन’ या गाण्याचे अधिकृत हक्क आम्ही खरेदी केले आहेत. लॉलीवूड क्लासिक्स या युट्यूब चॅनलवर देखील हे गाणे उपलब्ध आहे. मुव्हीबॉक्स रेकॉर्डस् लेबलकडे या गाण्याचे सर्व अधिकार असून, जेव्हा हे गाणे प्रदर्शित केले जाईल तेव्हा सगळ्या प्लॅटफॉर्मला या गाण्याचे क्रेडिट देखील दिले जाईल. ज्या गाण्यावर सध्या बोलले जात आहे त्या गाण्याचे कॉपीराइट्सचे अधिकार मुव्हीबॉक्सकडे आहेत.”(jug jug jiyo)
=====
हे देखील वाचा – राज कुंद्रा पुन्हा अडचणीत, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात नोंदवला गुन्हा
=====
“मी माझे गाणे नाच पंजाबन कोणत्याच भारतीय चित्रपटाला विकलेले नाही. या गाण्याचे हक्क देखील माझ्याकडे आहेत. नुकसान भरपाईसाठी मी कोर्टामध्ये धाव घेईन. करण जोहरसारख्या निर्मात्यांनी तरी अशा प्रकारे गाणे कॉपी करु नये. हे माझे सहावे गाणे आहे जे कॉपी करण्यात आले आहे.” असे ट्विट पाकिस्तानी गायक अबरार उल हकने केले होते. याच ट्विटला उत्तर देताना टि सिरीजने हे सर्व आरोप नाकारले होते.(jug jug jiyo)
या गाणे चोरल्याचा आरोपानंतर लगेच करण जोहरवर जुग जुग जियो चित्रपटाची स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप देखील लावण्यात आला आहे. आता या आरोपावर करण जोहरकडून काय उत्तर येते हे पाहावे लागेल. तत्पूर्वी जुग जुग जियो मनीष पॉल, प्राजक्ता कोळी, टिस्का चोप्रा, अनिल कपूर, नितु कपूर आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या २४ जूनला प्रदर्शित होणार आहे. (jug jug jiyo)