मालिका जेव्हा सुरु होतात तेव्हा त्या कधी ना कधी बंद होणार हे सर्वांनाच माहित असते. काही मालिका जरी अनेक वर्ष चालू असल्या तरी त्या बंद होणार हे माहितच असते. मधल्या काही काळापासून मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात अनेक जुन्या मालिका बंद होत असून त्याजागी नवीन मालिका सुरु होताना दिसत आहे. मालिकांचा टीआरपी घसरायला लागला किंवा प्रेक्षकांनी मालिकेला प्रतिसाद देणे कमी केले की मालिका बंद केल्या जातात.
अशातच आता सोनी मराठी वाहिनीवरील देखील एक लोकप्रिय मालिका बंद होत आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील काही मालिका बंद होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. यातच आता ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ बंद होणार असल्याचे समोर आले आहे. अभिनेता हरीश दुधाडे, रुपल नंद, अश्विनी कासार, चंद्रलेखा जोशी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
या मालिकेत पोलीस निरीक्षक विजय भोसलेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता हरीश दुधाडेने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने त्याचे अनुभव आणि त्याचा या मालिकेचा तीन वर्षांचा प्रवास व्यक्त केला आहे. सध्या हरीशची ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हरीशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “मायबाप. एक पर्व सुरू होतं , त्या प्रवासात आपण बरचं काही शिकतो ,जगतो . आणि मग ते पर्व संपतं . आज मी पोलीस निरीक्षक विजय भोसले म्हणून शेवटचा सीन केला .तुम्ही मला भरभरून प्रेम दिलतं म्हणून सर्व प्रथम तुमचे आभार . @sonymarathi आभार , तुम्ही मला ही संधी दिलीत आणि विश्वास दाखवलात .
@manava.naik मनापासून आभार “तु सौभाग्यवती हो” ” तुमची मुलगी काय करते ” “कारण गुन्ह्याला माफी नाही ” या सलग ३ मालिकांचा प्रवास आपण एकत्र केला . उत्तम निर्मात्यांशिवाय उत्तम निर्मिती कधिचं होऊ शकत नाही हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. @chinmaymandlekar दादा मनापासून आभार . विजय भोसले जन्माला घालण्या पसून तर शेवटच्या सीन पर्यंत माझा हात धरून तू मला या वाटेवर घेऊन फिरलास . ७०० हून जास्त episodes विजय भोसलेला तू प्रेमानं जपलंस आणि वाढवलंस .
======
हे देखील वाचा : “पॅडी का रडला?” विशाखा सुभेदारची ‘ती’ पोस्ट व्हायरल
======
@mugdhagodbole.ranade मनापासून आभार कारण तु आहेस ते शब्द ज्यातून विजय भोसले व्यक्त झाला . ७०० plus episodes तू तुझ्या प्रत्येक सीन मधून मला surprise केलंस. मनापासून आभार. Specifically भीम .भावा भोसले ऊभा करण्यात तुझा खूप मोलाचा वाटा आहे .पडद्या मागच्या सगळ्या खऱ्या कलाकारां शिवाय विजय भोसले कायमच अपूर्ण आहे .माझे सर्व सहकलाकार तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
आणि सर्वात महत्वाचे ते ज्यांचं आयुष्य मी गेली ३ वर्ष रोज जगलो ते म्हणजे मुंबई पोलीस @mumbaipolice तुमच्या शौर्याला , ताकदीला , रणनीतीला , कष्टांना मानाचा मुजरा . पोलीस निरीक्षक विजय भोसले साकारतांना तुम्ही कायमच माझी प्रेरणा राहिलात .निरोप घेतो .आता भेटू . नव्या भुमिकेत .आर्शिवाद असू द्या .
तुमचाच हरीष .”
या पोस्टसोबत अभिनेता हरीश दुधाडे याने त्याच्या पोलीस निरीक्षक विजय भोसलेच्या नावाच्या नेमप्लेटचा फोटो शेअर देखील केला आहे. हरीशच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी पोस्ट करत ‘मालिका खूप छान आहे बंद करू नका’ अशी विनंती देखील केली आहे. सोबतच त्यांनी हरीशचे आणि या मालिकेच्या संपूर्ण टीमचे देखील खूप कौतुक केले आहे.