कायमच्या आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा नेहमीच विविध कारणांमुळे मीडियामध्ये गाजत असतो. कपिलचा शो देखील कमालीचा लोकप्रिय आहे. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व हजेरी लावताना दिसतात. आज कपिलला भारतातील टॉपचा कॉमेडियन म्हणून ओळखण्यात येते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वर येत आपले मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. स्टारडममध्ये देखील कपिल सर्वच कॉमेडीयनच्या तुलनेत वर आहे. (Marathi News)
मात्र सध्या कपिल एक वेगळ्याच कारणामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. ७ ऑगस्ट रोजी कपिलच्या कॅनेडामधील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. मात्र, सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. कॅनडाच्या सरे शहरात कॉमेडियन, अभिनेता कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, मागच्याच महिन्यात कपिलच्या याच कॅफेवर बिश्नोई गँगने हल्ला केला होता. आता परत याच गँगने हल्ला केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Entertainment News)
आधी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी देखील लॉरेन्स बिश्नोई अलायन्स म्हणजेच गोल्डी ढिल्लॉन, अंकित बंधू शेरेवाला, जितेंद्र गोगी मान ग्रुप, कला राणा, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर, शुभम लोणकर आणि साहिल दुहान पेटवाड यांनी घेतली होती. आता काळ झालेल्या हल्ल्याची जबादारी देखील याच लोकांनी घेतली आहे. कॅनडानंतर मुंबईत असा प्रकार होईल आणि जर त्याने ऐकले नाही तर त्याच्यावर देखील गोळी झाडण्यात येईल अशी धमकी त्याला देण्यात आली आहे. मात्र या दोन हल्ल्यांनंतर प्रश्न हा निर्माण होतोय की, कपिल शर्मा बिष्णोई गँगच्या टार्गेटवर का आला आहे? का बिष्णोई गॅंग त्याला सतत त्रास देत, त्याच्यावर हल्ला करण्याची धमकी देत आहे? (Todays Marathi Headline)
या गोळीबारानंतर गोल्डी ढिल्लों नावाच्या एका सोशल मीडिया अकाउंटवरील एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे. “जय श्रीराम. सतश्रीअकाल. राम राम सगळ्या भावांना. आज जो कपिल शर्माच्या कॅप्स कॅफे, सरे येथे गोळीबार झाला, त्याची जबाबदारी मी गोल्डी ढिल्लों, लॉरेन्स बिश्नोई गँग घेत आहे. त्याला आम्ही फोन केला होता, पण याने ‘रिंग’ ऐकली नाही, म्हणून ही कारवाई करावी लागली. आता सुद्धा जर त्याने रिंग ऐकली नाही तर पुढची कारवाई लवकरच मुंबईत करू.” मुंबई पोलीस धमकीचे सोशल मीडिया अकाउंट सत्य आहे का याची तपासणी करत आहेत. (Top Marathi News)
हॅरीने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, “जो कोणी सलमान खानसोबत काम करेल तो मरेल. कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये आधी गोळीबार झाला आणि तो नेटफ्लिक्सवरील ‘द कपिल शर्मा शो’च्या प्रीमियर शोमध्ये सलमान खानला आमंत्रित केल्यामुळे झाला आहे. पुढच्या वेळी, दिग्दर्शक, निर्माता, कलाकार जो कोणी असेल आम्ही त्या सर्वांना इशारा देणार नाही. आता गोळी थेट छातीत जाईल. मुंबई, सर्व कलाकार आणि निर्मात्यांना इशारा आहे. आम्ही मुंबईचे वातावरण इतके खराब करू की तुम्ही विचारही केला नसेल. लहान कलाकार असो किंवा लहान दिग्दर्शक, आम्ही कोणालाही सोडणार नाही. आम्ही त्यांना मारू. त्यांना मारण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ. जर कोणी सलमान खानसोबत काम केले तर तो स्वतःच्या मृत्यूसाठी जबाबदार असेल.” (Marathi Latest News)
=======
Dada Kondke : चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व-दादा कोंडके
=======
काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान खान लॉरेन्स टोळीचे टार्गेट बनला आहे. लॉरेन्स टोळीने सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानचे फार्म हाऊस आणि त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करून गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. सध्या कपिल शर्मा सलमान खानच्या खूप जवळचा झाला आहे. लॉरेन्स गँग आणि त्याच्या सदस्यांना हीच गोष्ट त्रास देत आहे आणि कपिल शर्माला लक्ष्य करून, लॉरेन्स गँग सलमानच्या इतर जवळच्या सहकाऱ्यांना यातून धमकी देत आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics