Home » S. L. Bhyrappa : ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

S. L. Bhyrappa : ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

by Jyotsna Kulkarni
0 comment
S. L. Bhyrappa
Share

साहित्यविश्वातून एक दुःखद बातमी येत आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक एस.एल. भैरप्पा यांचे बुधवारी २४ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. एस.एल. भैरप्पा हे ९४ वर्षांचे होते. भैरप्पा यांना बेंगळुरू येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, भैरप्पा यांना दुपारी २:३८ वाजता हृदयविकाराचा झटका आला होता. भैरप्पा हे देशातील अतिशय मोठे आणि नावाजलेले साहित्यिक होते. त्यांनी विपुल लिखाण केले होते. भैरप्पा यांच्या निधनावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. (Marathi)

‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ या सर्वोच्च नागरी सन्मानांनी भैरप्पा यांना गौरवण्यात आले होते. यांनी ‘पर्व’ आणि ‘आवरण’ यांसारख्या वादग्रस्त आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. भैरप्पा हे मागील काही काळापासून म्हैसूरमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते आणि त्यांचे निवृत्त जीवन जगत होते. मात्र वृद्धापकाळामुळे ते काही काळापासून आजारी होते. कन्नड साहित्याच्या सेवेत नेहमीच अग्रेसर असलेल्या भैरप्पा यांचे लेखन वाचणाऱ्यांमध्ये नव्या पिढीतील तरुणांची संख्या जास्त होती. त्यांच्या प्रसिद्ध कृती आजही अनेक तरुणांना वाचनाची पहिली प्रेरणा देतात. (Marathi News)

कोण होते भैरप्पा?
दरम्यान संतशिवर लिंगण्णय्या भैरप्पा यांचा जन्म २६ जुलै १९३४ रोजी कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील चन्नरायपट्टण तालुक्यातील संतशिवर गावात झाला होता. भैरप्पा हे आधुनिक कन्नड साहित्यातील प्रमुख कादंबरीकारांपैकी एक होते. त्यांच्या लिखाणामध्ये तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी भावनांचा समावेश अधिक होता. त्यांची पुस्तके कन्नडमध्ये सर्वाधिक गाजली. मुख्य म्हणजे भैरप्पा यांची कन्नड भाषेतील अनेक पुस्तकांचे हिंदी, मराठी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. भैरप्पा यांची वंशवृक्ष, दाटू, तंतू, अंशू, पर्व, गृहभंग, सार्थ, मंद्रा इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. (Todays Marathi Headline)

S. L. Bhyrappa

थेशीवर लिंगन्नय्या भैरप्पा, यांना एस.एल. भैरप्पा म्हणून ओळखले जाते. ते एक प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार आणि पटकथा लेखक होते. भैरप्पा २५ वर्षांहून अधिक काळ कन्नड भाषेतील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या लेखकांपैकी एक होते. भैरप्पा यांच्या अनेक कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट देखील तयार झाले आहेत. खास बाब म्हणजे या सर्वच चित्रपटांना कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या लेखनातून अनेकदा सामाजिक आणि सांस्कृतिक वादविवाद निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांना भारतीय साहित्य क्षेत्रात एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. भैरप्पा यांची १९७९ साली आलेली ‘पर्व’ ही कादंबरी महाभारताची नवीन आवृत्ती म्हणून ओळखली जाते. (Top Marathi Headline)

भैरप्पा यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांनी म्हैसूरमधील प्रादेशिक शिक्षण संस्था आरआयई येथून प्राध्यापक म्हणून निवृत्ती स्वीकारली. भैरप्पा यांनी कन्नडमध्ये २६ कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यातल्या काही कादंबऱ्या भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या. भैरप्पा यांना त्यांच्या विपुल लिखाणासाठी असंख्य लहान मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. (Latest Marathi News)

त्यांना २०२३ साली भारत सरकारने पद्मभूषण हा सर्वोच्च आणि मोठा सन्मान देऊन सन्मानित केले होते. यासोबतच त्यांना त्यांच्या ‘मंद्रा’ कादंबरीसाठी २०१० साली सरस्वती सन्मान देखील देण्यात आला होता. तर भैरप्पा यांना यांच्या ‘दाटू’ या कादंबरीसाठी १९७५ साली केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. २०१५ साली त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप देऊन गौरवण्यात आले होते. २०१६ साली त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देखील बहाल केला होता. (Top Trending News)

=========

Navratri : गरबा, दांडिया खेळल्यानंतर पाय दुखातय? मग करा ‘हे’ सोपे उपाय

=========

कन्नड नाडहब्बा, विश्वविख्यात म्हैसूर दसरा महोत्सव २०१९ चे उद्घाटक म्हणून एस. एल. भैरप्पा यांची निवड झाली होती. त्यावेळी बोलताना, या विश्वविख्यात दसरा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला होता.  त्यांच्या पश्चात पत्नी सरस्वती, मलगे एसबी उदयशंकर आणि एसबी रविशंकर असा परिवार आहे.  (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.