नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रोड शो साठी तुफान गर्दी झाली आणि ७ जणांचा त्या मध्ये मृत्यू झाला. या रोड शो दरम्यान काही लोक जखमी ही झाल्याचे सांगितले गेले आहे. माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या पक्षाच्या अभियानाअंतर्गत जिल्ह्याचा दौरा करत होत. त्याचवेळी हजारो समर्थक हे कंदुकुरमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी एकत्रित आले होते. (Kandukur Stampede)
चंद्रबाबू नायडू यांनी रोड शो अर्धवट सोडून जे जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यासाठी घेऊन गेले. टीडीपी नेता एन चंद्रबाबू नायडू यांनी मृतांच्या परिवाराला १०-१० लाखांची आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचसोबत त्यांच्या मुलांना एनटीआर ट्रस्ट शैक्षणिक संस्थेत शिक्षण दिले जाईल असे ही म्हटले आहे.
७ लोकांचा झाला मृत्यू
पोलिसांनी असे म्हटले की, नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर मध्ये टीडीपी नेता एन चंद्रबाबू नायडू यांच्याकडून आयोजिक एका जनसभे दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या झटापटीत टीडीपीचे सात कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. नायडू यांचे भाषण सुरु होण्यापूर्वी समर्थक गाड्यांवर चढले होते. नायडू त्यांना उतरण्यासाठी सांगत होते. तेव्हाच लोक खाली पडले. तर काही लोक नाल्यात पडले आणि काही जण बाईकवर पडले. तसेच जखमी झालेले एकमेकांवर दाबल्याने जखमी झाले आहेत.
भाजप नेत्यांनी व्यक्त केले दु:ख
भाजप नेता विष्णु वर्धन रेड्डीने या दुर्घटनेवर ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले की, कंदुकुर, आंध्र प्रदेशातील टीडीपीच्या रॅलीत चेंगराचेंगरीत ७ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यूसह जखमी झाले आहेत. मी राज्य सरकारला विनंती करतो की, लवकरात लवकर आपत्कालीन वैद्यकीय मदत द्यावी. जखमी आणि पीडियात परिवाराच्या प्रति माझ्या संवेदना आहेत.(Kandukur Stampede)
हे देखील वाचा- वीडियोकॉन: दिवाळी ते दिवाळं
पोलिसांनी काय म्हटले?
सुरुवातीच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी दावा केला की, रोड शो वेळी गर्दी आणि काही धक्का-मुक्कीमुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान, आंध्र प्रदेशातील भाजप-राज्या महासचिव विष्णु वर्धन रेड्डी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी असे म्हटले की, आंध्र प्रदेशातील कंदुकुरु मध्ये टीडीपीच्या सार्वजनिक रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याने ७ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.