Home » ‘विक्रम’च्या कमाईतून कमल हसन फेडणार सर्व कर्ज सोबतच ज्याला जे पाहिजे ते देणार 

‘विक्रम’च्या कमाईतून कमल हसन फेडणार सर्व कर्ज सोबतच ज्याला जे पाहिजे ते देणार 

by Team Gajawaja
0 comment
Kamal Haasan
Share

मनोरंजनविश्वात असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांचे सिनेमे हिट होण्यासाठी त्यांचे फक्त ‘बस नाम ही काफी है’ असे म्हणू शकतो. याच विभागातील एक दिग्गज आणि सुपरस्टार अभिनेते म्हणजे कमल हसन. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेते अशी ओळख असलेल्या कमल हसन यांनी बॉलिवूडमध्ये देखील कमालीचे उत्तम काम केले आहे. अतिशय प्रतिभावान अभिनेत्यांच्या यादीमध्ये कमल हसन यांचे नाव नेहमीच अव्वल असते. कमल हसन यांच्या सिनेमाची प्रतीक्षा संपूर्ण देशाला नेहमीच असते. ‘विक्रम’च्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी कमल हसन त्यांचा एक धमाकेदार सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.(Kamal Haasan)

सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. कमल हसन यांचे कमबॅक असणाऱ्या या सिनेमाकडे संपूर्ण सिनेप्रेमींचे लक्ष लागले होते. सिनेमाच्या ट्रेलरने तर कमल हसन यांच्या या सिनेमाबद्दल अधिकच उत्सुकता वाढवली. जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला त्यानंतर त्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन रेकॉर्ड होण्यास सुरुवात झाली. या चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांमध्ये संपूर्ण जगात ३२२ कोटींहून अधिकची कमाई केली असून, या चित्रपटाने भारतात २२० कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय केला आहे. यासोबतच कमल हासन यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. ‘विक्रम’ सिनेमाच्या यशानंतर कमल हसन यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शकाला एक आलिशान कार भेट म्हणून दिली असून, १३ सहायक दिग्दर्शकांना बाईक भेट दिली आहे. या सिनेमाच्या यशानंतर कमल हसन यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, आता या सिनेमातून मिळालेला पैसा ते कुठे कुठे खर्च करणार आहे. (Kamal Haasan)

=====

हे देखील वाचा – सलमान खानची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या एका चित्रपटासाठी किती पैसे घेतो अभिनेता

=====

कमल हसन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “जर सर्वांनाच यश मिळवायचे असेल तर तुम्हाला एक असे नेतृत्व लागेल जो कधीही पैशाची चिंता करणार नाही. जेव्हा मी सांगितले की मी एका झट्क्यातच ३०० कोटी कमावू शकतो तेव्हा कोणालाच हे समजले नाही. लोकांना वाटले मी माझी छाती पिटत आहे, राग काढत आहे. मात्र तुम्ही आता परिणाम पाहू शकता. विक्रमचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सर्वांसमोर आहे.”(Kamal Haasan)

पुढे कमल हसन म्हणले की, “आता मी माझे सर्व कर्ज फेडू शकेन. मी माझ्या आवडीच्या गोष्टींवर काम करणार आहे. मला जे काही हवे आहे ते मी माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना देऊ शकतो. जर माझ्याकडे भविष्यात काहीच उरले नाही, तर मी म्हणेन की माझ्याकडे देण्यासारखे आणखी काही नाही. मला दुसऱ्याचे पैसे घेऊन इतरांना मदत करण्याचे नाटक करण्याची गरज नाही. माझ्याकडे कोणतेही ग्रँड टायटल नाही. मला फक्त एक चांगली व्यक्ती व्हायचे आहे,” (Kamal Haasan)

तत्पूर्वी ‘विक्रम’ हा सिनेमा कमल हसन यांच्या बॅनर अंतर्गत निर्मित केले गेला असून, या सिनेमाचे बजेट १५० कोटी होते. सिनेमासाठी कमल हसन यांनी ५० कोटी फी घेतल्याचे सांगितले जात आहे. ‘विक्रम’ हा सिनेमा १९८६ साली आलेल्या ‘विक्रम’ नावाच्या सिनेमाचा सिक्वल आहे. ज्यात कमल हसनच मुख्य भूमिकेत होते. या अॅक्शन ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे. कमल हासन व्यतिरिक्त या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फाजील, कालिदास जयराम, नारायण, अँटनी वर्गीस आणि अर्जुन दास यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात सुर्याचाही एक कॅमिओ आहे.(Kamal Haasan)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.