कल्याणचा दुर्गाडी किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी आरमाराचं प्रमुख केंद्रस्थान ! कल्याणमधूनच शिवरायांनी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. यामुळे या किल्ल्याला इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हणतात की, या किल्ल्यावर असलेलं दुर्गा मातेचं मंदिर शिवरायांनीच उभारलं होतं. पण गेल्या काही वर्षांपासून किल्ल्याचा एक वाद उफाळून आला होता. मजलिस या संघटनेने दुर्गाडी किल्ला वक़्फ़ बोर्डाची प्रॉपर्टी असल्याचं क्लेम केलं आणि हा वाद कोर्टात गेला. पण १९७६ पासून सुरु असलेल्या या वादावर आता कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यावर हिंदू जनता आनंद व्यक्त करत आहे. पण दुर्गाडी किल्ल्याचा नक्की वाद काय आणि या किल्ल्याचा इतिहास काय, जाणून घेऊया. (Durgadi Fort)
कल्याण हे प्राचीन काळातलं महत्त्वाचं बंद त्याचं पूर्वीचं नाव कलीहाण सातवाहन साम्राज्याच्या काळात हा एक प्रमुख व्यापारी केंद्रसुद्धा होता. त्यामुळे कल्याण त्याकाळी फार प्रसिद्ध होतं. मुघलांच्या शासनकाळात शाहजहानने कल्याण हे शहर भुईकोट किल्ल्याच्या स्वरूपात वसवलं होतं. त्याला ११ बुरुज आणि अनेक दरवाजे होते, असेही उल्लेख आहेत. कल्याणचा हा किल्ला नंतर बिजापूरच्या आदिलशाहने आपल्या ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५४ साली कल्याण आणि भिवंडीचा महत्त्वपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. यानंतर इथेच शिवरायांनी आरमाराची पायाभरणी केली आणि याच देखरेखीसाठी एक छोटेखानी भुईकोट किल्ला बांधला तोच हा दुर्गाडी किल्ला. या किल्ल्याचं बांधकाम शिवरायांनी आबाजी महादेव यांना दिल होत. येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खंदत असताना अमाप खजिना सापडला. (Latest Updates)
त्यामुळे ही दुर्गा माताची कृपा समजून किल्ल्याचं नाव दुर्गाडी ठेवण्यात आलं. शिवरायांच्या हस्ते हे दुर्गा देवीचं मंदिर उभारण्यात आलं, असं सांगितलं जात. किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती इथेच सुरु केली होती. त्यासाठी ३४० पोर्तुगिज कारागीर राबत होते, असाही उल्लेख समकालीन कागदपत्रांमध्ये आहे. १६८२ साली मुघल सरदार हसन अली खानने कल्याण जिंकलं, पण संभाजी राजांनी हल्ला करुन कल्याण परत ताब्यात घेतलं. शिवरायांच्या नंतर पेशव्यांच्या काळात सुबेदार रामजी बिवलकर यांनी दुर्गा देवीचे मंदिर आणि किल्ल्याचा जीर्णोधार केला. आता इथपर्यंत हेच कळून येतय की, दुर्गाडी हा किल्ला शिवरायांनीच उभारला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी या मंदिरात नवरात्रोत्सवाची सुरुवात केली होती. तसेच पत्नी मीनाताई ठाकरे यांच्यासोबत त्यांनी याठिकाणी देवीची पूजा सुद्धा केली होती. याशिवाय बाळासाहेबांच्या आदेशाने शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी याठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. हे आंदोलन सुरु करण्याचं कारण म्हणजे १९७६ साली दुर्गाडी हा किल्ला वाफ्फ बोर्डाची जागा असल्याचं मजलिस या संघटनेच म्हणण होत. (Durgadi Fort)
========
हे देखील वाचा : कल्पवास म्हणजे काय ?
========
हा वाद नंतर कोर्टात गेला आणि याठिकाणी हिंदू-मुस्लिम संघर्ष उफाळून आला. मात्र आता तब्बल 48 वर्षानंतर कोर्टाने दुर्गाडी किल्ला वक़्फ़ बोर्डाची जागा नसून मजलिसचा दावा फेटाळला आहे. आणि ही जागा महाराष्ट्र शासन आणि हिंदूंची आहे असा निर्वाळा दिला. ज्यामुळे हिंदूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सध्या वक़्फ़ बोर्डाच्या चर्चा गल्लीपासून दिल्लीत आहेत. केंद्र सरकार लवकरच वक़्फ़ बोर्डबाबत महत्वपूर्ण निर्णय देण्याची तयारी करत आहे. वक़्फ़चा मुद्दा जरी वगळला, तरी कोर्टाच्या या निर्णयाने पुन्हा एकदा दुर्गाडीवर हिंदू-मुस्लीम वाद उफाळून वर येईल का? हे महत्त्वाच ठरणार आहे. (Latest Updates)