Home » kalpana chawla : आपला मृत्यू होणार हे कल्पना चावला यांना आधीच माहीत होतं!

kalpana chawla : आपला मृत्यू होणार हे कल्पना चावला यांना आधीच माहीत होतं!

by Team Gajawaja
0 comment
kalpana chawla
Share

अंतराळ एक अशी गोष्ट आहे, जी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे आणि या अंतराळाचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्यांच्या ज्ञानाची तर आपण सर्वसामान्य माणसं कल्पनासुद्धा करून शकत नाही. पण याच अवकाशात भरारी घेण्याचं स्वप्न हरियाणाच्या एका मुलीने पाहिलं होतं. तिने हे स्वप्न पूर्णसुद्धा केलं आणि भारताची सर्वात पहिली महिला अंतराळवीर ठरली, त्यांचं नाव कल्पना चावला ! दोन वेळा त्यांनी अवकाश गाठलं होतं. पण २००३ साली कोलंबिया यानातून परतत असताना अचानक यानात टेक्निकल एरर झाल्यामुळे भयंकर स्फोट झाला आणि कल्पना यांच्यासह इतर सहा अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजही असं म्हटलं जातं की, या सात जणांना आपला मृत्यू होणार हे माहीत होतं. मग नासाने हे सत्य सर्वांपासून का लपवलं ? हा खरच अपघात होता की घातपात जाणून घेऊ. (kalpana chawla)

काही मुलं जमिनीवर जन्म घेतात, पण त्यांना आभाळाचं, अवकाशाचं कुतूहल असतं. अशापैकीच एक म्हणजे कल्पना चावला. लहानपणी पाहिलेलं स्वप्न मोठं होऊन पूर्ण केल आणि थेट अवकाश भरारीच घेतली. भारताच्या इतिहासात आजपर्यंत एका स्त्रीने असा पराक्रम केला नव्हता, जो कल्पना यांनी करून दाखवला. मुळात त्या नासामध्ये कार्यरत होत्या, त्यामुळे त्यांना भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर म्हटलं जात. पण मुळात आपलं संपूर्ण महत्त्वाचं शिक्षण त्यांनी भारतातच घेतलं होतं. आपली पहिली भरारी त्यांनी १९९७ साली स्पेस शटल कोलंबिया फ्लाईट एसटीएस ८७ मधून त्या ५ अंतराळवीरांसोबत अंतराळात गेल्या. यावेळी त्या मिशन स्पेशलिस्ट आणि बॅकप फ्लाईट इंजिनिअर म्हणून क्रू सोबत गेल्या होत्या. यावेळी त्याना जवळपास ३७६ तास म्हणजेच १५ दिवस आणि १६ तास अंतराळात होत्या. (Marathi News)

यानंतर दुसऱ्या मिशनसाठी त्यांची निवड करण्यात आली. त्या एसटीएस १०७ या क्रूच्या मेंबर होत्या. या फ्लाईटमध्ये २ महिला आणि ५ पुरुष अंतराळवीर होते. ते म्हणजे डेव्हिड ब्राउन, रिचर्ड हसबंड, लॉरेल क्लार्क, मायकल अँडरसन, विल्यम मॅककुल, इलॅन रेमन आणि कल्पना चावला ! पुन्हा एकदा मिशन स्पेशलिस्ट ही जबाबदारी कल्पना चावला यांच्यावर होती. १६ जानेवारी २००३ रोजी स्पेस शटल कोलंबिया अंतराळात झेपावलं. पण लॉंच होत असतानाच एक गडबड झाली. लॉंचिंगच्या वेळी स्पेस शटलच्या एक्स्टर्नल टँकचा एक इन्सुलेटिंग फोमचा तुकडा तुटला आणि ऑर्बिटर लेफ्ट विंगमधल्या थर्मल प्रोटेक्टिंग सिस्टममध्ये जाऊन अडकला. यान लॉंच होऊन अवकाशात गेल्यानंतर थोड्याच वेळात डिस्कव्हरी फ्लाईटने एक अलार्म वाजला होता, जो सर्वात जास्त धोका असल्यावर वाजतो. यावेळीच सर्व अंतराळवीरांना कळून चुकलं होतं आपला मृत्यू निश्चित आहे. पण नासाने अधिकृतरित्या तुमच्या जिवाला धोका आहे, असं एकदाही सांगितलं नाही.(kalpana chawla)

काही माध्यम असेही सांगतात की, या फ्लाईटमध्ये बिघाड झाल्यावर पुढचे १६ दिवस सर्व अंतराळवीर आपल्या मिशनचं काम करत मृत्यूच्याच छायेत राहिले होते. स्पेस शटलमध्ये नेमका काय बिघाड झाला आहे, याची त्यांना माहितीच नव्हती. पण दुसरीकडे नासाला सर्व काही माहित होतं, असं सांगितलं जातं. पण याची अपडेट मात्र नासाने कोणालाच दिली नव्हती. कोलंबिया स्पेस शटलने उड्डाण घेताच ते सुरक्षित पृथ्वीवर उतरणार नाही हे जवळपास सर्वच सातही अंतराळवीरांना माहित होत. मिशन कोलंबियाच्या एका व्यवस्थापकानेच ही माहिती नंतर उघड केली होती. १६ दिवस ते आपल्या मिशनमध्ये मनापासून गुंतले होते, ते नासाला महत्त्वाची माहिती पाठवत राहिले. पण नासाने अंतराळवीर आणि त्यांच्या कुटुंबीयांपासून हे सगळ लपवून ठेवलं होतं, असा आरोप केला जातो. पण असंही सांगितलं जात की, जर आधीच यानात काय बिघाड झाला आहे, हे अंतराळवीरांना सांगितलं असत, तर ते अजून panic झाले असते आणि ते कामही करू शकले नसते. नासाच्या वैज्ञानिकांना वाटत होत की, अंतराळवीरांनी त्यांच्या आयुष्यातले शेवटचे क्षण गुदमरून नाही तर आनंदाने जगावेत, असं वाटत होतं. (Marathi News)

====================

हे देखील वाचा : Salt : 30 हजार किलो दर असणारे मीठ असते का ?

===================

१ फेब्रुवारी २००३ रोजी यान पृथ्वीवर यायला निघालं होत. नासाच्या ऑफिसमध्ये असलेल्या कॅप्सूल कम्युनिकेटर चार्ली होबौग यांच्यासोबत त्यांचं कम्युनिकेशन सुरु होत. यानंतर मिशन कमांडर रिचर्ड हसबंड यांच्यासोबत चर्चा करत असताना लाईट कट होऊन जातात, त्यांच्याकडून शेवटचा ऐकायला आलेला शब्द होता, रॉजर…! यानंतर अनेक प्रयत्न करूनही स्पेस फ्लाईटमधल्या क्रू मेंबरसोबत कम्युनिकेशन होऊ शकलं नाही. त्या इन्सुलेटिंग फोमचा तुकड्यामुळे सिस्टम damage झाली होती. पृथ्वीवर परत येताना हे वातावरण यान झेलू शकलं नाही. परिणामी atmospheric gas शटलमध्ये शिरला आणि इंटर्नल विंग स्ट्रक्चर पूर्णपणे कोसळून गेला. ऑर्बिटर अन्स्टेबल झालं आणि मधून तुटून पडलं. यानंतर अचानक काही लोकांना ढगातून काही चकाकणाऱ्या गोष्टी पडताना दिसल्या. कोलंबिया स्पेशल शटलचा भयंकर स्फोट झाला होता आणि त्याचेच डेब्रिस आकाशातून जमिनीवर पडत होते. एकही अंतराळवीर या दुर्घटनेत वाचू शकला नाही. कल्पना चावला यांचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जॉर्ज बुश यांनी संपूर्ण जगाला या मोठ्या दुर्घटनेची माहिती दिली. (kalpana chawla)

या दुर्घटनेनंतर नासाने आणि इतर अंतराळ संस्थांनी आपल्या नियमांमध्ये आणि सुविधांमध्ये अनेक बदल केले. पुन्हा अशा दुर्घटना घडणार नाही, याचीही काळजी घेतली गेली. यापूर्वी १९८६ साली challenger स्पेस शटलची अशी दुर्घटना घडली होती आणि यामध्येही सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. या अपघातांमुळे नासावर अनेकांनी शंका घेतली होती. नासा इतकी मोठी संस्था असतानाही स्पेस शटल्समध्ये तांत्रिक बिघाड कसे होऊ शकतात, यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. हा अपघात घडून आज २२ वर्षे झाली. पण भारत थांबला नाही. कल्पना चावला यांनी अंतराळविश्वात जे पेरून ठेवलं आहे, त्यातूनच प्रेरणा घेऊन आज कित्येक मोहिमा भारत यशस्वीरित्या पार पाडत आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.