श्रावण महिना सुरु झाला की, रोजचेच सण- उत्सव आणि व्रत- वैकल्ये सुरु होतात. नागपंचमी झाल्यानंतर अनेक सणांची सुरुवात होते. भगवान महादेवांना समर्पित असणारा श्रावण अतिशय पवित्र महिना समजला जातो. या महिन्यांत नानाविध प्रकारचे सण साजरे केले जातात. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला भगवान कल्की यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा हा शुभ दिवस ३० जुलैला अर्थात आज आहे. दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि पापांचे क्षालन करण्यासाठी, धर्माची नव्याने स्थापनेसाठी भगवान कल्की कलियुगात अवतार घेतील असे पुराणात म्हटले गेले आहे. (Shravan NEws)
कल्की जयंती हा भगवान विष्णुच्या भक्तांसाठी किंबहुना सगळ्यांसाठीच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णु मंत्र आणि विष्णुसहस्त्रनामाचे पारायण केले जाते. श्रीमद् भागवत पुराण आणि कल्की पुराणानुसार, भगवान कल्कीचा अवतार कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या आधीच्या श्री हरिचा जन्म होईल. भगवान कल्कि यांना भगवान विष्णूचा १० वा आणि शेवटचा अवतार म्हणून वर्णन केले आहे. (Marathi NEws)
कल्की जयंती मुहूर्त
श्रावण महिन्यातील शुक्ल षष्ठी तिथी आज ३० जुलै रोजी सकाळी १२:४६ वाजता सुरू झाली आणि त्याची समाप्ती उद्या ३१ जुलै रोजी पहाटे २.४१ वाजता होईल. उदयतिथीनुसार किंवा उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार कल्की जयंती आणि स्कंद षष्ठीचे व्रत आज पाळले जाणार आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४.१८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत राहील. कल्की जयंती आणि स्कंद षष्ठीच्या दिवशी, सर्वार्थ सिद्धि योग, रवी योग, सिद्ध योग आणि साध्य योग तयार होतील. यावेळी सर्वार्थ सिद्धि योग आणि रवि योग सकाळी ५.४१ पासून रात्री ९.५३ पर्यंत राहील. तर सिद्ध योग ३१ जुलै रोजी पहाटे ३.४० पर्यंत राहील. त्यानंतर साध्य योग तयार होईल. (Todays Marathi HEadline)
कल्की पूजेची पद्धत
सकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. भगवान विष्णू किंवा कल्कीची प्रतिमा, चित्र/मूर्ती ठेवून त्याचे पूजन करावे. देवाला पिवळे फुल, तुपाचा दिवा, तुळस आणि चंदन वाहावे. पूजा करताना “ॐ श्रीं कल्किने नमः” या मंत्राचा जप कराव. यासोबतच विष्णुसहस्रनाम किंवा कल्कि स्तोत्र देखील वाचावे. देवाला नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी पुन्हा आरती करावी आणि सर्वांना प्रसाद वाटावा. (Social Updates)
कल्की जयंतीचे महत्त्व
आज कल्कि जयंती आहे. ही भगवान विष्णूंच्या दहाव्या अवताराचा जन्मदिवस आहे, जो कलियुगात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि पापांचा नाश करण्यासाठी होणार आहे. कलियुगाच्या शेवटी, जेव्हा धर्माचा लोप होईल, अधर्म वाढेल, आणि अराजक माजेल. तेव्हा भगवान कल्की घोड्यावर स्वार होऊन पृथ्वीवर येतील आणि अधर्माचा नाश करतील. ते पांढऱ्या घोड्यावर स्वार, हातात तलवार, आणि तेजस्वी रूपात प्रकट होतात. (Top Trending NEws)
पौराणिक ग्रंथानुसार, भगवान विष्णुने आतापर्यंत ९ अवतार घेतले आहेत. त्यात मत्स्य, कूर्मा, वराह, नरसिम्हा, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि बुद्ध. तर कल्की अवतार हा १० वा असणार आहे. त्यामुळे ही कल्की जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णु मंत्र, विष्णु चालिसाचे पारायण केले जाते. भगवान विष्णु आपल्या भक्तांला कधीच रिकाम्या हातांनी परत पाठवत नाही. आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात. सर्व पापातून मुक्ती होते. विष्णुचा कल्की अवतार हा क्रोधीत मानला जातो. कल्की जयंतीला मोक्ष प्राप्तीसाठी भगवान विष्णूची पूजा केला जाते. व्रत केलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, कल्की अवताराला देवाचं सर्वोत्तम आठ गुणांचे प्रतिक मानले जाते. (Top Marathi News)
कल्की अवताराचा मुख्य उद्देश अविश्वासू जगाची मुक्ती आहे. कलियुगात लोकांचा धर्म आणि कर्मावरचा विश्वास उडाला आहे. भौतिक लोभात ते धर्म आणि कर्म विसरत चालले आहेत. भ्रष्ट राजांचा वध केल्यावर, कल्की मानवी जगात भक्ती जागृत करेल. पुन्हा एकदा लोकांची धर्मावरील श्रद्धा जागृत होईल. यानंतर एक नवीन निर्मिती तयार केली जाईल, अशी मान्यता आहे. असे सांगितलं जातं, की कल्की जयंतीची सुरूवात सुमारे ३०० वर्षांपूर्वी राजस्थानात झाली होती. मावजी महाराज यांनी कल्की जयंती प्रथम साजरी केली होती. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला म्हणजेच सहाव्या दिवशी मावजी महाराजारांनी कल्की जयंती साजरी केली होती. (Latest Marathi NEws)
कल्की अवताराची माहिती
भगवान विष्णूचा हा अवतार ६४ कलांनी परिपूर्ण असेल. कलियुगात कलि राक्षसाचा विनाश करेल असे म्हटले गेले आहे. पुराणानुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील शंभल नावाच्या ठिकाणी विष्णुयाशा नावाच्या तपस्वी ब्राह्मणाच्या घरी भगवान कल्की पुत्राच्या रुपात जन्म घेणार आहे. कल्की देवदत्त नावाच्या घोड्यावर स्वार होऊन जगातून पापींचा नाश करुन धर्माची पुर्नस्थापना करणार आहे. त्यानंतर सत्ययुगाची सुरुवात होईल.
कल्कीचे वाहन पांढऱ्या रंगाचा घोडा असेल. हा घोडा देवदत्त म्हणून ओळखला जाईल. परमेश्वर, घोड्यावर स्वार होऊन जगातील पापी लोकांचा नाश करेल. तसेच धर्माची स्थापना करेल. (Top Stories)
श्रीमद् भागवत पुराणात भगवान विष्णू यांच्या कल्की अवताराविषयी काही ओव्या लिहिल्या गेल्या आहेत.
शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः। भवने विष्णूयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति॥ द्वादश्यां शुक्ल-पक्षस्य माधवे मासि माधवम् | जातं ददृशतुः पुत्रं पितरौ हृष्ट-मानसौ || अथासौ युगसंध्यायां दस्युप्रायेषु राजसु । जनिता विष्णूयशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः||
========
हे देखील वाचा : Grishneshwar Temple : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे महात्म्य !
Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत
=========
भगवान कल्कीच्या अवताराचे वर्णन बौद्ध आणि शीख धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये देखील आढळते. गुरु गोविंद सिंह यांनी लिहिलेल्या श्री दशम ग्रंथातही कल्की अवताराची पुष्टी झाली आहे. कल्कि पुराणातही भगवान कल्किच्या लग्नाचा उल्लेख आहे. भगवान कल्कीचा विवाह लक्ष्मीचा अवतार असलेल्या ‘पद्मा’ नावाच्या मुलीशी होणार आहे. सिंहल बेटाचा राजा बृहद्रथ यांच्या पत्नी कौमुदीच्या पोटी पद्मा नावाच्या मुलीचा जन्म होईल. ही मुलगी भगवान कल्कीची धार्मिक पत्नी बनेल. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics