नवरात्रमध्ये होणा-या गरब्यामध्ये सर्वाधिक गाणी ही गुजरातच्या पावागड येथील कालिका मातेवर आहेत. नवरात्रीमध्ये लाखो भाविक या पावागडमध्ये मातेच्या शरणी जातात. पावागड कालिका माता मंदिर हे गुजरात राज्याच्या पंचमहल जिल्ह्यातील पावागड टेकडीवर आहे. हे कालिका माता मंदिर पवित्र शक्तीपीठ आहे. (Kalika Mata Temple)
देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या मंदिराच्या स्थानी माता सतीच्या उजव्या पायाचा भाग पडल्याची आख्यायिकाही आहे. हे मंदिर टेकडीवर आहे. आता मंदिरात जाण्यासाठी रोपवेची सुविधाही करण्यात आली आहे. त्रेतायुगात, ऋषी विश्वामित्रांनी येथे महाकालीची कठोर तपस्या करुन मातेची मूर्ती स्थापित केल्याचे सांगितले जाते. मातेचे मंदिर आहे त्या टेकडीला पावागड हे नावही खास कारणानं मिळालं आहे. हे मंदिर जिथे आहे, त्या टेकडीवर वाऱ्याचा वेग खूप जास्त आणि एकसारखा असतो त्यामुळे त्याला पावागड टेकडी असे म्हटले जाते. प्राचीन काळात या जागेला शत्रुंजय मंदिर असेही म्हटले जात असे. आता हा संपूर्ण मंदिर परिसराचे नुतनीकरण करण्यात आले असून अधिक भव्य संकुल उभाऱण्यात आले आहे. (Social News)
गुजरातमधील पावागड येथील कालिका माता मंदिरात नवरात्रौत्सवाला लाखो भाविकांची गर्दी होते. पावागड नावाच्या टेक़ीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी 250 पाय-या चढाव्या लागतात. उत्सव काळात या संपूर्ण पाय-यांवर भाविकांची रांग लागलेली असते, शिवाय मंदिरात जाण्यासाठी 1986 मध्ये रोपवेचीही सोय करण्यात आली, त्यामुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणा-या वयोवृद्ध आणि लहान मुलांची मोठी सोय झाली आहे. कालिका माता मंदिर हिंदूंसाठीचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. 10 व्या किंवा 11 व्या शतकात बांधलेल्या या मंदिरात देवीच्या तीन मूर्ती आहेत. मध्यवर्ती मूर्ती कालिका मातेची आहे, उजवीकडे काली आहे आणि डावीकडे बहुचरा माता आहे. या मंदिरात वर्षाचे सर्वच दिवस भाविकांची गर्दी असते. (Kalika Mata Temple)
मात्र चित्राष्टमीला मंदिर संकुलात एक मेळा भरतो. यासाठी देशभरातून हजारो भाविक हजेरी लावतात. पावागड मंदिराबद्दल दोन लोकप्रिय आख्यायिका आहेत. त्यातील एका आख्यायिकेनुसार एकदा नवरात्रोत्सवादरम्यान, मंदिरात गरबा नृत्य खेळण्यात येत होते. यात शेकडो भाविक देवीच्या भक्तीने नाचत होते. अशी निःस्वार्थ भक्ती पाहून, देवी महाकाली स्वतः स्थानिक महिलेच्या वेषात भक्तांमध्ये आली आणि त्यांच्यासोबत नृत्य करु लागली. याचवेळी येथील राजा पटाई जयसिंगही या नृत्यामध्ये सामिल झाला. राजाची नजर साधारण महिलेच्या रुपातील देवीमातेवर गेली. राजा तिच्या सौंदर्याने मोहित झाला. त्यावेळी राजाने मातेचे हात धरला. देवीने राजाला तीन वेळा तिचा हात सोडून माफी मागण्याचा इशारा दिला. परंतु राजाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे देवीचा कोप झाला. देवीने राजाला शाप दिला की, त्याचे राज्य नष्ट होईल. त्यानंतर मुस्लिम आक्रमक महमूद बेगडा याने राज्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या लढाईत राजा जयसिंगचा पराभव झाला. महमूद बेगडा याने त्याला मारले आणि तो राजा झाला. (Social News)
========
Sharadiya Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाची धुमधाम सुरु !
========
दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, माता सतीनं एकदा खूप जोरदार नृत्य केले. नृत्यादरम्यान, तिच्या शरीराचा एक भाग नष्ट झाला. त्यावेळी तिचा उजवा पाय येथे पडला. अशा प्रकारे, या ठिकाणी माता कालिकेची एक काळी मूर्ती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले जाते. काही आख्यायिकेनुसार ऋषी विश्वामित्रांनी मातेची मूर्ती पावागड मंदिरात स्थापन केल्याचे सांगितले जाते. पावागड येथील या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावरील गर्भगृहामध्ये भाविक तीन देवतांच्या मूर्तींची पूजा करू शकतात. मुख्य देवी माँ कालिका यांची मूर्ती लाल रंगाची आहे आणि मध्यभागी तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. मुख्य देवीच्या उजवीकडे आणि डावीकडे, महाकाली आणि बहुचरा या दोन देवी विराजमान आहेत. मंदिरासमोर बलिदानासाठी दोन वेद्या आहेत. मात्र येथे पशुबळी देण्यात येत नाही. 2022 मध्ये पावगढ मंदिराचा पुनर्विकास करण्यात आला असून मंदिर अधिक भव्य झाले आहे. नवरात्रौत्सवासाठी हा संपूर्ण परिसर फुलांनी आणि दिव्यांनी सजवला जातो. (Kalika Mata Temple)
सई बने