कालभैरव हे भगवान शंकराचे उग्र आणि शक्तिशाली रूप आहे. यालाच काळाचा स्वामी आणि रक्षक मानले जाते. त्याला ‘दंडपाणी’ म्हणजेच काठी धरणारा आणि ‘श्वस्व’ म्हणजेच ज्याचे वाहन कुत्रा आहे असेही म्हणतात. कालभैरव आपल्या भक्तांना शत्रू, संकटे आणि नकारात्मक शक्तींपासून वाचवतो आणि त्यांना अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करतो अशी धारणा आहे. काल भैरवचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीला झाला होता, म्हणून दरवर्षी या दिशी काल भैरव जयंती साजरी केली जाते. यावेळी, काल भैरव जयंतीला दोन शुभ योग तयार असल्याने या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (Kalabhairav)

यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती सर्वत्र साजरी होणार आहे. विशेष म्हणजे, काशी येथील कालभैरव मंदिरात हा उत्सव आतापासून सुरुही झाला आहे. काशीमध्ये कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणून ओळखले जाते. काशीचे रक्षण करणा-या या कालभैरवाच्या दर्शनासाठी येथे मोठी गर्दी झाली आहे. देवदिवाळीनंतर काशीमध्ये कालभैरवाच्या चरणी लाखो भाविक येत आहेत. भगवान शंकराचे उग्र रूप असलेल्या काल भैरवाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला झाला. म्हणून, दरवर्षी या तिथीला काल भैरव जयंती साजरी केली जाते. बाबा कालभैरवाची उपासना केल्याने शनि, राहू आणि केतू यांचे अशुभ प्रभाव दूर होतात, अशी मान्यता आहे. (Social News)
शिवाय काल भैरवाची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते, असेही सांगितले जाते. तंत्र आणि मंत्राच्या सिद्धीसाठी देखील काल भैरवाला पूजनीय मानले जाते. काल भैरव जयंती ही भैरव अष्टमी किंवा कालाष्टमी म्हणूनही ओळखली जाते. पंचांगानुसार, काल भैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीला ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११:०८ वाजता सुरू होते. अष्टमी तिथी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १०:५८ पर्यंत वैध असेल. म्हणून, उदयतिथीच्या आधारे, काल भैरव जयंती बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. यावर्षीचा कालभैरव जयंतीचा उत्सव अधिक खास होणार आहे. कारण काल भैरव जयंतीच्या दिवशी दोन शुभ योग तयार होत आहेत. काल भैरव जयंतीच्या दिवशी शुक्ल आणि ब्रह्म योग तयार होतील. शुक्ल योग सकाळी सुरू होईल आणि सकाळी ८:०२ पर्यंत राहील. त्यानंतर, ब्रह्म योग सुरु होऊन, रात्रभर हा योग रहाणार आहे. (Kalabhairav)

यामुळे भाविकांना दिवसभर कालभैरवाची पूजा करता येणार आहे. यातही सकाळी ६:४१ ते ९:२३ पर्यंत आहे, त्यानंतर सकाळी १०:४४ ते दुपारी १२:०५ पर्यंत शुभ वेळ आहे. काल भैरव जयंतीच्या दिवशी काही ठिकाणी निशिता पूजा केली जाते. म्हणजेच तंत्र आणि मंत्र पद्धतीने कालभैरवाची पूजा केली जाते. काल भैरव जयंतीचा निशिता मुहूर्त रात्री ११:३९ ते १२:३२ पर्यंत आहे. काल भैरव जयंतीला, ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:५६ ते ५:४९ पर्यंत असणार आहे. या सर्वात काल भैरवाची उत्पत्ती का आणि कशी झाली हेही जाणण्यासारखे आहे. याबाबत स्कंद पुराणात कथा आहे. या कथेनुसार, भगवान ब्रह्मदेवाला एकदा स्वतःचा अभिमान वाटला. त्याच अभिमानात भगवान शंकराचा त्यांनी अपमान केला. त्यानंतर भगवान शंकरांनी काल भैरव निर्माण केले. शंकराच्या आज्ञेनुसार, काल भैरवाने ब्रह्मदेवाचे चौथे डोके कापले. यामुळे ब्रह्महत्येचे पाप झाले. या पापापासून मुक्त होण्यासाठी, काळभैरव शिवनगरी काशी येथे आले. (Social News)
=========
Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी
=========
तिथे त्यांनी ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी तपश्चर्या केली. त्यानंतर, काळभैरव काशीतच राहिले. काशीचे कोतवाल म्हणून काशीमध्ये त्यांची पूजा केली जाते. त्याच्या दर्शनाशिवाय काशीची भेट अपूर्ण मानली जाते. बाबा कालभैरवाची पूजा केल्याने सर्व भीती, नकारात्मक ऊर्जा दूर होते असे सांगितले जाते. भारतात अनेक ठिकाणी कालभैरावाची मंदिरे आहेत. त्यापैकी प्रमुख मंदिरांमध्ये उज्जैन आणि वाराणसीच्या मंदिरांचा समावेश होतो. उज्जैनमधील कालभैरव मंदिर हे शिप्रा नदीच्या काठावर असून ते मंदिरही जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. येथेही उज्जैनचे संरक्षक देवता म्हणून भगवान कालभैरवाला पूजण्यात येते. या प्रमुख मंदिरांव्यतिरिक्त, दिल्लीमधील कालभैरव मंदिरही प्रसिद्ध आहे. या सर्व मंदिरांमध्ये कालभैरव जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. (Kalabhairav)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
