हिंदू धर्मात मुख्य तीन देवता सांगण्यात आल्या आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यातलेच महेश अर्थात देवाधिदेव महादेव हे सर्वांचेच इष्ट देव आहेत. सृष्टीचा संहार करणाऱ्या महादेवांचे महात्म्य तर सर्वश्रुत आहे. याच महादेवांचे अनेक अवतार पृथ्वीवर झाल्याचे पुराणांमध्ये सांगण्यात येते. याच पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचे पाचवे अवतार समजले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार, कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते. शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते. कालभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात.(Kaal Bhairav)
कालाष्टमी दर महिन्याला कृष्ण पक्षात अष्टमी तिथीला येते. हा दिवस भगवान कालभैरवाची प्रार्थना करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. आज १० जानेवारी रोजी कालाष्टमी साजरी होत आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात आज शनिवार, १० जानेवारी रोजी सकाळी ०८.२४ वाजता सुरू होणार असून, ही तिथी रविवार, ११ जानेवारी रोजी सकाळी ११.२१ वाजता संपणार आहे. अशा वेळी नवीन वर्षातल्या पहिल्या कालष्टमीचे व्रत आज शनिवार, १० जानेवारी रोजी पाळले जाणार आहे. (Latest Marathi News)
कालाष्टमीच्या दिवशी काल भैरवाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक जण उपवास देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार भगवान कालभैरव अष्टमीच्या दिवशी प्रकट झाले. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा संपते. या दिवशी माँ दुर्गेची पूजा करण्याचाही नियम आहे. भैरवाचे काळभैरव आणि बटुक भैरव हे दोन रूप मानले जातात. त्यापैकी कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवाची उपासना करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. काळभैरवाची पूजा केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि आजार, भीती तसेच अडचणींपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. (Top Marathi Headline )
भगवान शिवाचा पाचवा अवतार भैरव याला भैरवनाथ असेही म्हणतात. नाथ समाजात त्यांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. सार्वजनिक जीवनात भगवान भैरव भैरू महाराज, भैरू बाबा, मामा भैरव, नाना भैरव इत्यादी नावांनी ओळखले जातात. पुराणानुसार अंधकासुर या राक्षसाने एकदा आपली क्षमता विसरून अहंकाराने भगवान शिवावर हल्ला केला. त्याला मारण्यासाठी शिवाच्या रक्तातून भैरवांचा जन्म झाला. कालभैरव हे शिवाचेच रूप आहे. म्हणूनच शिवपूजेपूर्वी भैरवाची पूजा करण्याची पद्धत सांगितली आहे. त्याची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. महादेवाचे रुद्र रूप कालभैरव हे तंत्राचे देवता मानले गेले आहे, म्हणून तंत्र-मंत्राची साधना सुरळीत होण्यासाठी प्रथम कालभैरवाची पूजा केली जाते. (Top Marathi News)

कालाष्टमी पूजा विधी
या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून उपवासाचा संकल्प करावा. यानंतर शिव किंवा भैरव मंदिरात जाऊन पूजा करावी. संध्याकाळी शिव पार्वती आणि भैरवजींची पूजा करा. भैरवाला तांत्रिकांचे देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची रात्रीही पूजा केली जाते. कालभैरवाच्या पूजेमध्ये दिवा, काळे तीळ, उडीद आणि मोहरीचे तेल अवश्य समाविष्ट करा. व्रत पूर्ण केल्यानंतर काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला द्या. (Latest Marathi Headline )
कालाष्टमीच्या दिवशी भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि श्रीकालभैरवष्टकम् पाठ करा. मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावाने करा. यासोबतच कालाष्टमीच्या दिवशी बेलाच्या पानांवर चंदनाने ‘ओम नमः शिवाय’ लिहून ही २१ बिल्वची पाने शिवलिंगाला अर्पण करा. असे म्हटले जाते की, कालाष्टमीच्या दिवसापासून ४० दिवस सतत कालभैरवाचे दर्शन घ्या. हा उपाय केल्याने भगवान भैरव प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. (Top Trending Headline)
=========
Makar Sankranti : वर्षातला पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीची माहिती आणि महत्त्व
=========
भगवान कालभैरव हे भगवान शिवाचे भयंकर रूप आणि काळ, न्याय आणि संरक्षणाचे अधिपती मानले जातात. असे मानले जाते की कालष्टमीच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने नकारात्मक शक्तींच्या भीतीपासून मुक्तता मिळते. याव्यतिरिक्त, शत्रूंमुळे येणारे अडथळे कमी होतात आणि कालसर्प दोष, शनि आणि राहू यांच्या दुष्परिणामांपासूनही आराम मिळतो. (Top Stories)
असितांग भैरव, रुद्र भैरव, चंद्र भैरव, क्रोध भैरव, उन्मत्त भैरव, कपाली भैरव, भीषण भैरव, संहार भैरव ही या आठ भैरवांची रूपे आहेत. या आठही भैरवांची पूजा करण्याची पद्धतही वेगळी आहे. या आठ भैरवांसोबतच आठ भैरवींचीही पूजा केली जाते ज्यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, काल भैरवाच्या पत्नीला काल भैरवी म्हणतात जी त्याच्या सारखीच रुद्र रूपात आहे. काल भैरवीला माँ कालीचा अवतार म्हणूनच पुजले जाते. (Social News)
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
