Home » Beauty Tips : काजळ लावल्याने डोळ्यांना होतात ‘हे’ लाभ

Beauty Tips : काजळ लावल्याने डोळ्यांना होतात ‘हे’ लाभ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Beauty Tips | Top Stories
Share

डोळे म्हणजे आपल्या मनाचा आरसा असतो असे म्हटले जाते. डोळे हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. डोळे नसतील तर आपण परस्वाधीन होऊ. यासाठी आपण आपले डोळे जपणे खूपच आवश्यक आहे. डोळ्यांची निगा राखणे त्यांना कायम स्वच्छ ठेवणे आपले प्रथम कर्तव्य आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल काळात डोळ्यांच्या बऱ्याच समस्या लोकांना सतावत आहे. मोबाईल, कॉम्पुटर आणि लॅपटॉप आदी माध्यमांसोबतच प्रदूषण, धूळ, अपुरी झोप यांचा देखील डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे असते. (Beauty Tips)

डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि डोळ्यांचे सौंदर्या वाढवण्यासाठी फार पूर्वीपासून एक खास घरगुती उपाय केला जातो. आणि हा उपाय म्हणजे डोळ्यांमध्ये दररोज काजळ घालणे. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मागील अनेक शतकांपासून काजळाचा वापर केला जात आहे. काजळ घातल्यामुळे डोळे मोठे दिसण्यासोबतच निरोगी देखील होतात. लहान बाळांना देखील डोळ्यात काजळ भरण्याची मोठी परंपरा आहे. डोळ्यांमध्ये काजळ भरल्याने अनेक लाभदायी फायदे होतात. हे फायदे कोणते चला जाणून घेऊया. (Social News / Updates)

तर हे नैसर्गिक काजळ केवळ डोळ्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर डोळ्यांसाठी एक नैसर्गिक औषध देखील आहे. विशेषतः जेव्हा हे काजळ तुम्ही शुद्ध घरगुती तूप आणि बदाम यापासून बनवले जाते. हे डोळ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. बदाम डोळ्यांना आवश्यक पोषण देतात, तर तूप थंडावा आणि आराम देते. या दोघांचे मिश्रण दृष्टी सुधारण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. ते घरी कसे बनवायचे आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. (Todays Marathi News)

Beauty

डोळ्यांना काजळ घालण्याचे फायदे

> घरगुती नैसर्गिक काजळ लावल्याचे अनेक फायदे आहेत. हे काजळ उन्हाळ्यात लावल्यास डोळे थंड राहतात आणि जळजळ, खाज कमी होते.

> बदामापासून बनवलेले काळज वापरल्यास अधिक फायदे होतात. कारण बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि तुपात असलेले पोषक तत्व डोळ्यांच्या स्नायूंना ताकद मिळते आणि यामुळे दृष्टी सुधारते.

> डोळ्यांच्या कडांवर लावल्या जाणाऱ्या काजळाची थरामुळे धूळ आणि ॲलर्जी डोळ्यांत जाण्यापासून रोखले जातात.

> काजळात असलेले अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांभोवतीच्या त्वचेला पोषण देतात आणि काळी वर्तुळे हलकी करण्यास मदत करतात.

> काजळ डोळ्यांना एक आकर्षक आणि सुंदर स्वरूप देते, ज्यामुळे चेहरा अधिक खुलून दिसतो.

> काजळ डोळ्यांना थंड आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

> काजळ डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करते.

> ब्लेफेरायटिस, मोतीबिंदू, नेत्रश्लेष्मलाशोथ आदी डोळ्यांच्या समस्यांवर काजळ लावलीस काही प्रमाणात मदत होते.

> काही लोकांचा विश्वास आहे की काजळ वाईट नजर दूर करते.

काजळ लावताना काळजी:

हात स्वच्छ ठेवावे आणि काजळ लावण्यापूर्वी डोळे स्वच्छ करावे. चांगले आणि उच्च प्रतीचे काजळ वापरावे. रोज लावलेले काजळ रोज काढणे आवश्यक आहे, अन्यथा डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. (Top Marathi Headlines)

काजळाची वापराने दूर होतील दोष

* तुमच्या कुंडलीत शनीदोष असेल किंवा तुम्हाला शनीची महादशा, ढैय्येचा त्रास असेल, तर शनिवारी आरशासमोर उभे राहून ९ वेळा काजळ सरळ आणि उलट क्रमाने स्वत:वरून फिरवावे आणि अशा ठिकाणी गाडावे किंवा ठेवावे जिथे तुम्ही कधीही परत जाणार नाही. याशिवाय जर विवाहात अडथळे येत असतील तर शनिदेवाच्या मंदिरात सुरमा अर्पण केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.

* राहू ग्रहाला शांत करण्यासाठी अधिकाधिक काळे काजळ किंवा सुरमा दान करा. जर घरीच बनवलेले सुरमा दान केले तर ते अधिक चांगले. कुंडलीत मंगळ ग्रह कमकुवत असेल किंवा मंगळ दोष असतील तर डोळ्यांना काळ्या ऐवजी पांढरा सुरमा लावावा. (Latest Marathi News)

Beauty

========

हे देखील वाचा : Nails : जाणून घ्या नखांवर पडणाऱ्या पांढऱ्या डागांमधील कारण

========

नैसर्गिक काजळ घरी कसे बनवावे?

प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा घ्या, एक बदाम स्वच्छ काट्यात किंवा काठीत अडकवा आणि ते जळत्या दिव्याच्या ज्वाळेवर भाजा. जेव्हा बदाम पूर्णपणे काळे होईल आणि त्यामधून धुर यायला लागेल, तेव्हा जळत्या दिव्यावर एक स्टील प्लेट उलटी ठेवा जेणेकरून बदामाचा धूर प्लेटवर जमा होईल. त्यानंतर त्या प्लेटवर जमा झालेल्या काळ्या पावडरला एका पेपरच्या मदतीने छोट्या भांड्यामध्ये जमा करावे. त्यानंतर या पावडरमध्ये थोडेस तुप मिक्स करा, हे मिश्रण थंड झाल्यावर याचा उपयोग काजळ म्हणून करता येतो. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.