Home » कैलासाने आता अमेरिकेलाही लुटले, अशाप्रकारे नित्यानंदाचे पितळ उघडे पडले

कैलासाने आता अमेरिकेलाही लुटले, अशाप्रकारे नित्यानंदाचे पितळ उघडे पडले

by Team Gajawaja
0 comment
Kailaasa
Share

बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि फरार नित्यानंद याचा कैलासा (Kailaasa) हा एक काल्पनिक देश आहे की एक मान्यता प्राप्त राष्ट्र या संदर्भातील प्रश्नांच्या उत्तराचा शोध भारत ते अमेरिकेकडून घेतला जात आहे. अशातच आता कैलासाने आणखी एक घोटाळा करत असा दावा केला आहे की, अमेरिकेतील तीस शहरांसोबत त्यांनी एक सांस्कृतिक करार केला आहे. या दाव्यामुळे संपूर्ण अमेरिका हैराण झाला आहे.

कैलासाकडून करण्यात आलेल्या कराराची तारीख १२ जानेवारी सांगण्यात आली आहे. या अभियानाला सिस्टर सिटी करार असे नाव दिले गेले आहे. तसेच असे सांगितले गेले आहे की, नेवार्क मधील सिटी मॉलमध्ये या बद्दल एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन ही केले गेले. त्यामध्ये विविध शहरांचे प्रतिनिधी सुद्धा आले होते.

परंतु नित्यानंदाच्या शिष्यांकडून जसे हे दावे केले त्यानंतर अमेरिकन मीडियाने याबद्दल अधिक तपास करण्यास सुरुवात केली आङे. या तपासाच एक लिस्टच्या माध्यमातून ज्या शहरांची नावे दिली होती त्या शहरांच्या वास्तविक प्रतिनिधींना कैलासाचे दावे फेटाळून लावले. त्यानंतरच कैलासाचे पितळ उघडे पडले आहे.

सर्व वाद आणि दावे फेटाळून लावल्यानंतर कैलासा संदर्भात आता प्रश्न उपस्थितीत केला आहे की, हा एक काल्पनिक देश आहे की वास्तविक देश? स्वयंभू संत आणि बलात्काराच्या आरोपात फरार नित्यानंदकडून २०१९ मध्ये ही कैलासा हा एक राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले होते.

स्वत: ला धर्मगुरु सांगणारा नित्यानंद यापूर्वी सुद्धा खुपवेळा चर्चेत आला होता. जेव्हा त्याचे कथित नवे राष्ट्र रिपब्लिक ऑफ कैलासाचे प्रतिनिधी हे संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत उपस्थितीत होते. त्यानंतर भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. कैलासाचे संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधीने दावा केला आहे की, ते आपल्या हिंदू राष्ट्राबद्दल प्रचार करण्यासाठी तेथे गेले होते. दरम्यान, UNSCO च्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, नित्यानंदाच्या शिष्यांनी हे सांगितले नाही ते एका राष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. केवळ ऐवढेच सांगितले की, ते एक नॉन-शासकीय संघटनेतील आहेत.(Kailaasa)

संयुक्त राष्ट्राकडून एका राष्ट्राच्या रुपात मान्यता न मिळाली असली तरीही त्यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्याकडे व्याप खजिना, उद्योग, घर आणि मानव सेवेसहित काही शासकीय विभाग आहेत. त्याचसोबत एक झेंडा, एक संविधान, एक आर्थिक प्रणाली, एक पासपोर्ट आणि एक प्रतीक चिन्ह सुद्धा आहे.

हे देखील वाचा- नित्यानंद यांच्या बनावट देश कैलासाचे ३० पेक्षा अधिक अमेरिकन शहरांशी करार

नित्यानंदने दावा केला आहे की, कैलासा २ अरब हिंदुंची लोकसंख्या असलेला एक वास्तविक राष्ट्र आहे. तर देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावार मान्यता मिळालेली नाही. कैलासाच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांना फसवत प्रवेश मिळवला होता. असा विश्वास दिला होता की, ते एका नॉन-शासकीय संघटनेतील आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.