आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव आज साजरा केला जात आहे. शनि त्रयोदशीच्या या दिवशी शंकराची पूजा आराधना केली जाते. यामुळे शनि संबंधित सर्व दोष दूर होतात. तसेच या दिवशी पत्रिकेतील कालसर्प दोष (Kaal Sarp Dosha) ही दूर होऊ शकतात. हिंदू मान्यतेनुसार, जर महाशिवरात्रीच्या वेळी देशातील काही विशेष शंकरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने आणि पूजा केल्याने पत्रिकेतील कालसर्प दोष दूर होऊ शकतो.
कालसर्प दोष पत्रिकेत कसा येतो?
ज्योतिष शास्रात राहुची अधिदेवता काल आहे आणि केतुचा सर्प. पत्रिकेत जेव्हा राहु आणि केतुमध्ये सर्व ग्रह येतात तेव्हा कालसर्प दोष लागतो. हा दोष १२ प्रकारचा असतो. पत्रिकेत हा दोष लागल्यास आयुष्यात काही कठीण समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत कालसर्प दोष असतो त्याने विधिगत पूजा केल्यास तो दूर होऊ शकतो.
१२ प्रकारचे कालसर्प दोष
ज्योतिष शास्रात १२ प्रकारचे कालसर्प दोष सांगण्यात आले आहेत. त्याचे निवारण पत्रिका पाहून केले जाऊ शकते. अनंत कालसर्प दोष, कुलिक कालसर्प दोष, वासुकि कालसर्प दोष, शंखपाल कालसर्प दोष, पद्म कालसर्प दोष, महापद्म कालसर्प दोष, तक्षक कालसर्प दोष, कर्कोटक कालसर्प दोष, शंखनाद कालसर्प दोष, घातक कालसर्प दोष, विषाक्त कालसर्प दोष, शेषनाग कालसर्प दोष.
महाकालेश्वर मंदिर
मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील भगवान महाकालच्या पूजेने ही कालसर्प दोष दूर होतो असे मानले जाते. अशी मान्यता आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी येथे येऊन विधिगत पूजा केल्याने पत्रिकेतील कालसर्प दोषासंबंधित सर्व कष्ट दूर होतात.
तटकेश्वर मंदिर
उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरातील यमुनेच्या किनाऱ्यावरच तटकेश्वर मंदराबद्दल अशी मान्यता आहे की, महाशिवरात्रीच्या वेळी दर्शन किंवा पूजा केल्याने ही व्यक्तीच्या पत्रिकेतील कालसर्प दोष दूर होतो. येथे सर्पजातिचे स्वामी श्री तक्षक नाग यांचे पावन तीर्थ आहे. अशी मान्यता आहे की, शंकराच्या या मंदिरात नागांचा जोडा अर्पण आणि विधिगत पूजा केल्याने व्यक्तीच्या पत्रिकेतील कालसर्प दोष दूर होतो. तसेच शंकराच्या कृपेने भविष्यातील सर्पदंशाची भीती ही दूर होते.(Kaal Sarp Dosha)
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने व्यक्तीच्या पत्रिकेतील कालसर्प दोष दूर होतो. हेच कारण आहे की, येथे मोठ्या संख्येने लोक पत्रिकेतील कालसर्प दोष दूर करण्यासाठी येतात.
हे देखील वाचा- महाशिवरात्री साजरी करण्यामागील महत्व जाणून घ्या
ओंकारेश्वर
मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची ही विधिगत पूजा केल्याने कालसर्प दोषातून मुक्ती मिळते. येथे कालसर्प दोषाच्या शांतिसाठी १००१ पार्थिव शिवलिंग तयार करुन कालसर्प दोषाची शांती केली जाते.