Jyotish tips for turtle ring- आपले सौंदर्य अधिक खुलून दिसावे म्हणून लोक विविध प्रकारच्या गोष्टी करतात. तर बहुतांश महिलांना कानातले, हातात रिंग किंवा डोक्याला टिकली लावतात. तर पुरुष मंडळी आपल्या हातात घड्याळ किंवा एखादी रिंग घालतात. अशातच सोने, चांदी आणि डायमंड मधील विविध ज्वेलर्सी सुद्धा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उपलब्ध आहेतच. पण काही लोक वास्तू आणि ज्योतिष शास्रानुसार काही गोष्टी घालतात. त्यापैकीच ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे लोक अंगठीमध्ये पुष्कराज किंवा अन्य प्रकारचे रत्न वापरुन ती घालतात. यामध्ये ग्रहांनुसार आपल्याला कोणती अंगठी घातली पाहिजे हे ज्योतिषांकडून सांगितले जाते. खरंतर आजकाल बहुतांश जण हे कासव असलेली अंगठी घालत असल्याचे आपण पाहिले असेल. कारण याचा थेट संबंध धनाची देवी असलेल्या लक्ष्मी सोबत आहे. वास्तुशास्र व्यतिरिक्त फेंगशुई शास्रात सुद्धा कासवाची अंगठी ही धन आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मात्र कासव असलेली अंगठी घालताना काही गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. त्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केल्यास तुमच्या एका चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. तर जाणून घेऊयात कासव असलेली रिंग घालताना कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे.
-विचारल्याशिवाय अंगठी खालू नका
प्रत्येक रत्न किंवा कासवाची अंगठी घालण्यापूर्वी ज्योतिष शास्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून त्याबद्दलची प्रथम माहिती घ्या. कुंडलीत ग्रहांची भुमिका किंवा स्थान जाणून घेतल्यानंतर कासवाची अंगठी घालावी. कोणत्याही सल्ल्या शिवाय ही अंगठी घातलीत तर त्यांना आर्थिक चणचण भासू शकते. या व्यतिरिक्त तुम्हाला आयुष्यात प्रगती करण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ज्योतिषांना विचारुनच तुम्ही कासवाची अंगठी घाला.
हे देखील वाचा- दीर्घायुष्य रहस्य… आता कासव देणार माणसाला शंभर वर्षांचं आयुष्य?
-कोणत्याही दिवशी ही अंगठी खरेदी करु नका
लोक कासवाची अंगठी घालतेवेळी नियमांचे पालन करतात पण ती कधी आणि केव्हा खरेदी केली पाहिजे याबद्दल विसरुन जातात. ज्योतिष शास्रात असे सांगितले गेले आहे की, कासव असलेली अंगठी ही खास वेळीच खरेदी करावी. शास्रानुसार कासवाची अंगठी खरेदी करण्यसाठी शुक्रवार शुभ मानला जातो. खरंतर शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा असतो. त्यामुळेच शुक्रवारच्या दिवशी कासव असलेली अंगठी खरेदी करा आणि त्या संबंधित नियमांचे सुद्धा पालन करा.(Jyotish tips for turtle ring)
-कोणत्याही पूजेशिवाय अंगठी घालू नका
आपण पाहतो की, लोक सोन्याची किंवा चांदीची अंगठी खरेदी केल्यानंतर कोणत्याही वेळी घालतात. त्याप्रमाणे कासव असलेली अंगठी घातलाना सुद्धा हिच चूक करतात. रत्नांची अंगठी घातलाना पूजा केली जाते. त्याचप्रमाणे कासवाची अंगठी घालतेवेळी योग्य वेळ, दिवस आणि मुहूर्त पहावा. तसेच पूजा करुनच ती कासवाची अंगठी घालावी. या नियमांचे पालन करुनच जर अंगठी घातल्यास धनप्राप्ती होते.