ज्योतिराव गोविंदराव फुले हे १९ व्या दशकातील एक महान समाजसुधारक, विचारक, समाजसेवक, लेखक आणि क्रांतिकारक असल्याचे म्हटले जाते. ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या अधिकारासाठी आणि समाजातील कुप्रथा संपवण्यामागे घालवले. ज्या ज्योतिबा फुलेंना शाळेतून काढून टाकण्यात आले त्यांनीच देशातील मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांति घेऊन ते आले. २८ नोव्हेंबर १८९० मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज त्यांची पुण्यतिथी आहे. (Jyotiba Phule Death Anniversary)
११ एप्रिल १८२७ मध्ये पुण्यातील एका माळी परिवारात जन्मलेले फुले जेव्हा ७ वर्षांचे झाले तेव्हा त्यांना गावातील एका शाळेत पाठवण्यात आले. तेथे त्यांना जातिगत भेदभावाचा सामना करावा लागला. अशातच त्यांना शाळेतून काढून टाकले गेले. असे होऊन सुद्धा शिक्षणाप्रति त्यांचे जे लक्ष्य होते त्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी घरीच शिक्षण घेणे सुरु ठेवले. १८४७ मध्ये एक पादरी आणि शिक्षकांनी त्यांचा प्रवेश एका इंग्रजी माध्यमिक शाळेत करुन केला.

ज्योतिबा फुलेंना शिक्षणाचे महत्व समजले होते. त्यांना माहिती होते की, समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी शिक्षण फार महत्वाचे आहे. खासकरुन दलित आणि महिलांच्या विकासासाठी. शिक्षणाचे महत्व त्यांनी अशा पद्धतीने समजवले की,
विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
त्यांनी आपले संपूर्ण जीवन वंचित समाजाला सशक्त बनवण्यासाठी घालवले.ज्योतिबा फुलेंनी वर्श १८५४ मध्ये भारतीय महिलांना शिक्षण देण्यासाठी पहिली बालिका स्कूल सुरु केली. हा तो काळ होता जेव्हा लोक स्री ला शिक्षण देणे तर दूर घराबाहेर सुद्धा पडू देत नव्हते. त्यांना यासाठी खुप विरोध सहन करावा लागला. विरोधाच्या कारणास्तवच त्यांना महिलांना शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक सुद्धा मिळत नव्हते. त्यानंतर त्यांनी आपली पत्नी सावित्री बाई फुले यांना मिशनरीज स्कूलमध्ये ट्रेनिंग देऊन एका शिक्षकाच्या रुपात तयार केले. महिलांच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी एक प्रकारची वेगळीच क्रांती घडवून आणली.(Jyotiba Phule Death Anniversary)
हे देखील वाचा- जयप्रकाश नारायण यांची सुद्धा कोणती होती का ‘मेकिंग ऑफ लोकनायक’ ची कथा?
तर ज्योतिबा फुले यांनी बाल विवाहच्या विरोध ही आवाज उठवला. तसेच त्यांनी विधवा पुर्नविवाहसाठी सुद्धा प्रयत्न केला. त्यावेळी समाजातील विधवा महिलांची स्थिती अत्यंत बिकट होती. खासकरुन गर्भवती विधवा महिलांची. अशातच ज्योतिबा फुले यांनी एका घरात समाजातून बेदखल करण्यात आलेल्या अशा महिलांना येऊन जन्म देता येईल याची सोय केली. त्यांची समाजसेवा पाहून १८८८ मध्ये मुंबईतील एका भव्यदिव्य सभेत त्यांना महात्मा अशी उपाधि दिली गेली. त्यांच्या नावे पोस्टाची तिकिट सुद्धा जारी करण्यात आली आहेत.