Home » आता जस्टिन ट्रुडोचे काय होणार ?

आता जस्टिन ट्रुडोचे काय होणार ?

by Team Gajawaja
0 comment
Justin Trudeau
Share

अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या असून आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती अमेरिकेची कमान आल्याचे स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेत्रदीपक विजयात टेस्लाचे सीईओ आणि एक्सचे मालक एलोन मस्क यांची महत्त्वाची भूमिका होती. स्वतः ट्रम्प यांनीही विजयानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात मस्क यांना धन्यवाद म्हटले आहे. आता हेच एलोन मस्क आणखी एका देशातील निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. हा देश म्हणजे, कॅनडा आहे. एलोन मस्क यांनी कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुका आणि जस्टिन ट्रूडो यांचे भविष्य कसे असेल हेच जाहीर केले आहे. एलोन मस्क यांच्या मते, कॅनडामध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या निवडणुकीत जस्टिन ट्रुडो यांचा पराभव होणे निश्चित आहे. (Justin Trudeau)

कॅनडाची सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये 20 ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आधीच अल्पमतात असलेले जस्टिन ट्रुडो सरकार जनता पाडून नवा नेता कॅनडाला मिळेल, अशी भविष्यवाणी एलोन मस्क यांनी केली आहे. एलोन मस्क आणि डोनाल्ड ट्र्म्प यांनी यापूर्वीच जगात शांतता नांदली पाहिजे असे वक्तव्य केले होते. कॅनडामध्ये हिंदू मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कॅनडाच्या निवडणुकी मध्ये अमेरिकेची भूमिका आणि एलोन मस्क यांचा सोशल मिडिया यांचा परिणाम होणार हे निश्चित आहे.  कॅनडामध्ये 2013 पासून लिबरल पक्षाचे नेतृत्व करत असलेल्या जस्टिन ट्रुडो यांच्यासाठी पुढच्या वर्षी होत असलेली सार्वत्रिक निवडणूक महत्त्वाची आहे. आधीच जस्टिन ट्रुडो हे अल्पसंख्याक सरकार चालवत आहेत. त्यांना आपल्या पक्षाच्या पाठिंब्यासाठी खलिस्तानवाद्यांची मदत घ्यावी लागत आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षाला 2019 आणि 2021 मध्ये बहुमत मिळाले नाही. अन्य पक्षांच्या पाठिंब्यावर असलेल्या ट्रुडो यांना जगमीत सिंग यांनी धक्का दिला आहे. सप्टेंबरमध्ये जगमीत सिंग यांच्या एनडीपी पक्षाने ट्रुडो सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे हे सरकार कधीही पडेल अशा अवस्थेत आहे. शिवाय कॅनडामध्ये सध्या स्थानिक विरुद्ध स्थलांतरीत असा वाद वाढला आहे. कॅनडामध्ये आलेल्या स्थलांतरीना नोक-या मिळत असून त्याचा फटका स्थानिकांना बसला आहे. यामुळे ट्रूडो सरकारवर जनता नाराज आहे. याचा फटका ट्रूडोना निवडणुकीत बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. (International News)

कॅनडामध्ये महागाई आभाळाला भिडलेली आहे. घरांच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे निवारा घरांमध्ये राहण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रुडो अपयशी ठरल्याची ओरड आहे. त्यामुळेच ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाची लोकप्रियता सातत्याने घसरत आहे. कॅनडाची जनता नाराज असलेल्या ट्रुडो यांच्या काळजीत एलोन मस्क यांच्या भविष्यवाणीनं भर टाकली आहे. गेल्या काही दिवसात कॅनडामध्ये हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांनी ट्रुडो यांच्या काळजीत अधिक भर पडली आहे. यानंतर जस्टिन यांना स्वतःच्याच पक्षातून विरोध वाढू लागला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबावही टाकण्यात आला. 24 खासदारांनी ट्रूडो यांना 28 ऑक्टोबरपर्यंत राजीनामा देण्याची मुदत दिली होती. पण ट्रुडो यांनी या खासदारांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत पक्षाची कमान आपल्या हातात कामय ठेवली आहे. (Justin Trudeau)

======

हे देखील वाचा : अमेरिकेत दिवाळीनंतर कोण साजरी करणार दिवाळी !

=====

या सर्वांमुळे कॅनडाच्या भावी निवडणुकीवर जगाचे लक्ष राहणार आहे. जस्टिन ट्रुडो पुढच्या निवडणुकीतही विजयी झाले तर सलग चौथ्यांदा निवडून येणारे पंतप्रधान होतील. सध्या ट्रुडो आणि भारत सरकारचे संबंध वादाचे झाले आहेत. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या बाजुनं भूमिका घेतली आहे. भारताने कॅनडातील अतिरेकी आणि भारतविरोधी कारवायांबद्दल अनेक वेळा गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे ट्रम्प यांनीही खलिस्तानवाद्यांना आश्रय देण्यावरुन कॅनडा सरकारचे कान टोचले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत पुरावे न देता भारतावर थेट आरोप करण्यात आल्यामुळे ट्रम्प यांनीही नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पाश्वभूमीवर कॅनडाच्या निवडणुका महत्त्वाच्या असणार आहेत. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क हे ट्रुडो यांची बाजू घेतात, की त्यांच्या उमेदवारील विरोध करतात यावरच त्यांचा जय-पराजय अवलंबून असेल. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.