Home » जस्टिन ट्रुडो पुन्हा प्रेमात

जस्टिन ट्रुडो पुन्हा प्रेमात

by Team Gajawaja
0 comment
Justin Trudeau And Melanie Joly
Share

भारत आणि कॅनडाच्या राजनैतिक संबंधात तणावाचे ढग आहेत. भारताच्या मदतीनं खलिस्तानवाद्यांची आपल्या देशात हत्या झाल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी लावला. तर जस्टिन ट्रुडो यांच्या या वक्तव्यावर भारतानं तीव्र शब्दात आक्षेप घेत आपल्या राजनैतिक अधिका-यांना परत बोलावून जस्टिन यांचा चपराक दिली आहे. आता याच जस्टिन ट्रुडो यांनी आपल्याकडे भारतासंबंधी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगून पुन्हा घुमजाव केले आहे. कॅनडाच्या राजकारणात मुरलेला नेता म्हणून जस्टिन ट्रुडो यांना ओळखले जाते. कारण हे संपूर्ण ट्रुडो घराणे राजकारणी आहे. यापूर्वी जस्टीन यांच्या वडिलांनीही कॅनडाचे पंतप्रधानपद सांभाळले आहे. सध्या हेच जस्टीन ट्रुडो भारतविरोधी भूमिकेनं ओळखले जात आहेत. यासोबत जस्टिन ट्रुडो आणखीनही एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे, त्यांचे एक प्रेमप्रकरण. (Justin Trudeau And Melanie Joly)

जस्टिन ट्रुडो यांनी गेल्यावर्षी आपला 18 वर्षाचा संसार तोडून पत्नीला घटस्फोट दिला आहे. सध्या जस्टीन हे कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांच्यासोबत दिसत असून मेलानी यांच्यामुळेच त्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिल्याची चर्चा आहे. शिवाय मेलानी यांच्या प्रभावामुळेच त्यांनी भारताविरोधी भूमिका घेतल्याचीही चर्चा आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारतविरोधी भुमिकेमुळे ओळखले जातात. सोबतच ट्रुडो आपल्या प्रेमप्रकरणामुळेही ओळखले जातात. सध्या ट्रुडो यांच्यासोबत कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांचे नाव जोडले जात आहे. जस्टिन ट्रुडो आणि त्यांची पत्नी सोफी ग्रेगोयर ट्रूडो यांचा 2 ऑगस्ट 2023 रोजी घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटालाही मेलानी जोली कारणीभूत असल्याची माहिती आहे. वास्तविक भारत कॅनडा तणावादरम्यान याच मेलानी जोली याही चर्चेत आहेत. (International News)

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री असलेल्या मेलानी यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या तपासात भारत सहकार्य करीत नसल्याचे सांगितले होते. त्यांनी घेतलेल्या भूमिकेला जस्टिन ट्रुडो यांनीही होकार दिला आहे. कॅनडाच्या विरोधी पक्षानंही या दोघांच्या भूमिकेवर टिका केली आहे. तसेच खलिस्तानवाद्यांना कॅनडामध्ये जो मोकळा वाव मिळाला आहे, त्याला जस्टिन ट्रुडो आणि मेलानी यांची चुकीची धोरणे जबाबदार असल्याची टिका केली आहे. मेलानी यांच्यासोबत जस्टीन ट्रुडो यांचे फोटो गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक होत आहेत. त्यांच्यासोबत जस्टीन ट्रुडो यांची सलगी वाढत असल्याची बातमी आली आणि त्याचवेळी जस्टिन ट्रूडो आणि त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाला. तेव्हाच या घटस्फोटाचे कारण मेलानी जोली असल्याचे स्पष्ट झाले. जस्टिन ट्रुडो आणि त्यांची पत्नी सोफी ग्रेगोयर ट्रूडो यांच्या लग्नाला 18 वर्षे झाली होती. (Justin Trudeau And Melanie Joly)

जस्टिन यांना कॅनडाचे युवराज म्हटले जाते. कारण त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणात आहे. जस्टीन यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडिल कॅनडाचे पंतप्रधान होते. पियरे ट्रूडो आणि मार्गारेट ट्रूडो हे त्यांचे पालक आहेत. ट्रुडो यांचे आजोबाही उद्योगपती होते. तर त्यांचे काकाही मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदावर होते. वडिल पियरे यांच्यासोबत जस्टिन प्रत्येक राजकीय दौ-यावर जात असत. त्यामुळे राजकारणाचे धडे त्यांनी बालवयापासून गिरवले आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर, ट्रुडो 2000 च्या दशकात लिबरल पक्षात अधिक सामील झाले. 2006 च्या फेडरल निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर युवा नूतनीकरणाच्या कार्य दलाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. जस्टीन ट्रुडो आणि सोफी ग्रेगोअर यांचा 2005 मध्ये विवाह झाला. त्यांना झेवियर, एला-ग्रेस, आणि हॅड्रियन अशी तीन मुले आहेत. घटस्फोटानंतर या तीनही मुलांची जबाबदारी जस्टिन यांनी घेतली आहे. सोफी ग्रेगोयर ही एक प्रसिद्ध टीव्ही अँकर आहे. सोफी या फ्रेंच, इंग्रजी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये पारंगत आहेत. (International News)

======

हे देखील वाचा :  आफ्रिकेचे दोन भागात विभाजन होण्याची चिंता !

======

कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री असलेल्या मेलानी जोली या 45 वर्षांच्या आहेत. त्यांनी लंडन विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय कायद्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 2015 मध्ये, मेलानी यांनी पहिल्यांदा हाऊस ऑफ कॉमन्ससाठी निवडणूक जिंकली. मेलानी जोली यांची दोन लग्न झाली आहेत. त्यांच्या पहिल्या पतीचे नाव जीन फिलिप डुफ्रेस्ने आहे. विद्यापीठात शिकत असताना त्यांची भेट झाली. जीन फिलिप यांच्याच आग्रहामुळे मेलानी राजकारणात आल्या. मात्र मेलानी खासदार झाल्यानंतर त्यांच्याच वाद वाढू लागले. परिणामी त्यांनी घटस्फोट घेतला. मेलानी यांचे दुसरे लग्न फेलिक्स मार्गेल नावाच्या अभिनेता आणि व्यावसायिकासोबत झाले आहे. आता याच मेलानी यांचे नाव जस्टिन ट्रुडो यांच्यासोबत जोडले जात असून दोघेही आपल्या विवाहाची अधिकृत घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. (Justin Trudeau And Melanie Joly)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.