कानून के हात लंबे होते हैं, लेकिन कानून अंधा होता है. न्यायदेवता आंधळी असते. फिल्म इंडस्ट्रीत ऐंशी नव्वदच्या दशकात घासून घासून लिहिले हे Dialogues आहेत. या Dialogues सोबत Screen वर दाखवली जायची न्याय देवतेची ती मूर्ती, जिच्या एका हातात तलवार तर एका हातात न्यायाचा तराजू आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेली असायची. या काळ्या पट्टीमुळेच न्याय देवता आंधळी आहे असं बोललं जायचं. आता न्यायदेवतेच्याच डोळ्यांवरची ही काळ्या रंगाची पट्टी कधीच दिसणार नाही, त्या सोबत तीच्या हातातली तलवार सुद्धा दिसणार नाही. थोडक्यात, भारताची न्यायदेवता आता आंधळी राहिलेली नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये बसवण्यात आलेल्या नवीन न्याय देवतेच्या पुतळ्यामध्ये पारंपरिक पुतळ्यापेक्षा वेगळं स्वरूप दिसत आहे. ज्यामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी नाहीये आणि हातात तलवारी ऐवजी भारतीय संविधान आहे. नवी मूर्ती अशी का बनवण्यात आली आहे? आणि डोळ्यावर असणारी काळ्या रंगाची पट्टी असणारी न्याय देवता भारतात कुठून आली? हे जाणून घेऊया. (Justice Statue)
न्यायलयांमध्ये दिसणारी ही मूर्ती, जिला लेडी जस्टिस म्हटलं जातं, ती मुळची ग्रीसची देवी आहे. जिचा उल्लेख इजिप्तमध्ये सुद्धा आढळतो. ग्रीसमध्ये या देवीचं नाव थेमिस आणि डाइक आहे. तर इजिप्तमध्ये माट असं या देवीचं नाव आहे. इजिप्तमध्ये माट या देवीला सलोखा, न्याय, कायदा व सुव्यवस्थेच्या विचारधारेचं प्रतीक मानलं जातं. तर ग्रीसमध्ये थेमिस देवी सत्य, कायद्या व सुव्यवस्ठेचं प्रतीक आहे. रोमन पुराणामध्ये जस्टीसिया हीला न्यायची देवी मानलं जात. पौराणिक कथांनुसार, डाइक ही झ्यूसची मुलगी होती आणि तिने माणसांना न्याय मिळवून द्यायची, असं म्हटलं जात. झ्यूसला ग्रीक देवतांपैकी सर्वाधिक महत्त्वाचा देव मानलं जातं. याच डाइक देवीचा रोमन पुराणमध्ये जस्टिसिया देवी म्हणून उल्लेख आहे. जिच्या डोळ्यांवर पट्टी आहे, हातात तलवार आणि तराजू आहे. काही कथांनुसार, या देवीच्या डोळ्यांवर असणारी ही पट्टी समतेचं प्रतीक आहे. (National News)
न्याय देताना कोणासोबत भेदभाव होऊ नये म्हणून ही पट्टी बांधलेली असते. त्याशिवाय, न्याय करताना दोन्ही पक्षाकडून जबाब व साक्षीपुराव्यांबद्दल ऐकल्यानंतरच निष्पक्ष न्याय केला जातो. म्हणून ही पट्टी असल्याचं बोललं जातं. लेडी जस्टिसच्या एका हातात तराजू असतो. ही संकल्पना इजिप्तमधून आली आहे, कारण तराजू हा न्याय आणि समतोलाचे प्रतीक मानलं जातं, एखाद्याला न्याय देताना दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच समान न्याय किंवा प्रत्येकाच्या गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार शिक्षा किंवा न्याय मिळाला पाहिजे. असा न्यायदेवतेच्या हातातला तराजुचा अर्थ आहे. लेडी जस्टिसच्या हातातली तलवारही न्याय देण्याच्या शक्तिचं प्रतीक आहे. सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्याची ताकद सुद्धा या तलावरीतून दर्शवली जाते. ही ग्रीस, इजिप्तची ही न्याय देवी भारतात कशी आली याचा कुठलाच पूरावा उपलब्ध नाही आहे. पण ही देवीची मूर्ती ग्रीसमधून ब्रिटनमध्ये पोहचली आणि तिथून ती ब्रिटिश अधिकाऱ्यांनी १७ व्या शतकात भारतात आणली असावी असं इतिहासकारांच म्हणण आहे. (Justice Statue)
======
हे देखील वाचा : परळीत मुंडेंना पर्याय नाही?
======
भारतात असणाऱ्या या न्याय देवतेची मूर्ती आता बदलली गेली आहे. डोळ्यांवरची पट्टी हटवून आणि हातातली तलवार काढून तिथे या मूर्तीच्या हातात भारतीय संविधान देण्यात आलं आहे. या बदलावच्या बातमीमुळे काही लोकं खुश आहेत तर काही नाराज. उघड्या डोळ्यांना काय अर्थ आहे आणि न्यायाची देवी आता घटनेच्या वेळी घटनास्थळ पाहू शकणार का, असा काहींचा सवाल आहे. तर राज्यघटनेचे पुस्तक न्यायदेवीच्या हाती दिल्याने भारतात घटनेनुसार शिक्षा दिली जाते. हे या मूर्तीतून प्रतीत होत म्हणून काही लोकं खुश आहेत. तुम्हाला या बदलाबद्दल काय वाटतं? आम्हाला कोंमेंट्समध्ये नक्की सांगा. (National News)