एखाद्या कंपनीचा पत्ता किंवा फोन क्रमांक जाणून घेण्यासाठी जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला एका कंपनीचे नाव जरुर दिसते. ते म्हणजे जस्ट डायल. हे एक लोकल सर्च सर्विस प्रोवाइडर असून कोणत्याही शुल्काशिवाय लोकांना लोकेशन आणि फोन क्रमांकाची माहिती देते. जस्ट डायलच्या सुरुवातीला सुद्धा कंपनीचे हेच लक्ष्य होते. मात्र नंतर सिनेमे, फूड आणि ट्रॅव्हल संबंधित माहिती सुद्धा एका क्लिकवर देण्याची सुरुवात केली गेली. १९९६ मध्ये सुरु झालेली जस्ट डायल आज २५०० कोटींची कंपनी बनली आहे. याची सुरुवात वीएसएस मणि यांनी केली होती. तर पाहूयात जस्ट डायलच्या यशाची कथा नक्की काय आहे.(Just Dial Success Story)
यलो पेज कंपनीत सुरु केले काम
जस्ट डायलचे फाउंडर वीएसएस मणि यांचा जन्म १९९६ मध्ये जमेशदपुर मध्ये झाला होता. मध्यम वर्गीय परिवारात जन्मललेले मणि उच्च शिक्षणासाठी दिल्लीत आले. कॉर्मसमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करत त्यांनी नंतर सीएची डिग्री मिळवली. दरम्यान, शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. वाढत्या आर्थिक तंगीवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी युनाइटेड डेटाबेसच्या नावाच्या एक यलो पेज कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. यलो पेज डेटाबेस ही अशी कंपनी असते जी लोकांच्या संस्था,कॉलेज आणि ऑफिसचे पत्ते आणि फोन क्रमांक उपलब्ध करुन द्यायची.
गॅरेजपासून सुरु झाली होती जस्ट डायलची सुरुवात
त्या कंपनीसोबत काम करताना मणि यांनी विचार केला की, हा डेटाबेस फोनच्या माध्यमातून अधिक सुलभ होऊ शकतो. येथूनच त्यांना जस्ट डायलची सुरुवात करण्याची कल्पना आली. त्यांनी कंपनीला ‘आस्क मी’ नावाच्या स्टार्टअपने सुरुवात करण्याची कल्पना दिली गेली. १९८९ मध्ये याची सुरुवात ही झाली. कंपनीने यावर अधिक लक्ष दिले नाही. त्यानंतर त्यांनी वेगळा स्टार्ट अप सुरु करण्याचे ठरविले.
आपल्या कल्पनेत मोठे बदल करण्यासह मणि यांनी ५० हजार रुपयांच्या भांडवलासह १९९६ मध्ये जस्ट डायल कंपनीची सुरुवात केली. कंपनीची सुरुवात प्रथम एका गॅरेजमध्ये झाली. जेथे केवळ ५ लोक काम करायचे. भाड्याचा कंप्युटर आणि फर्निचरसह कंपनीने काम करण्यास सुरुवात केली. मात्र खऱ्या रुपात कंपनीला प्रसिद्धी २००७ पासून मिळण्यास सुरुवात झाली. याच्या वेब वर्जनसह मोबाईल अॅप लॉन्च केले गेले.(Just Dial Success Story)
या स्टार्टअपची टॅगलाइन ही एनिथिंग, एनिटाइम, एनिवेअर अशी ठेवली गेली. ही कंपनी पूर्पणने एक युनिक स्टार्टअप होता. ज्याच्या एका क्लिकवर लोकांना माहिती मिळू लागली होती. त्यामुळे माहिती मिळवण्यासाठी याची मदत होत असल्याचे लोकांच्या ते पसंद पडू लागले.
हे देखील वाचा- जेव्हा लॉन्चिंग नंतर काही तासांमध्ये क्रॅश झाली होती वेबसाइट, कंपनीने असा रचला इतिहास
रिव्हूजमुळे युजर्सची संख्या वाढली
मणि यांच्या या स्टार्टअपमने लोकांना यलो पेज बुकवरील त्यांची निर्भरता कमी केली. युनिक कॉन्स्टेप्ट असल्याने वेगाने जस्ट डायलच्या युजर्समध्ये वाढ होऊ लागली. जस्ट डायल ऐवढ्या वेगाने प्रसिद्ध झाली की कंपन्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग होण्यासाठी पैसे चार्ज करु लागली. हेच कमाईचे माध्यम बनले. अशा प्रकारे काळासह कंपनी युजर्सला अधिक माहिती देत गेली आणि आपल्या रिव्हूमुळे अधिक नफा मिळवू लागली. ऐवढेच नव्हे तर, येथे रिव्हू जरी लिहिला तरी लोकांना योग्य माहिती मिळणे अधिक सोप्पे झाले. कंपनीने दावा केला आहे की, सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये जवळजवळ १६ कोटी युजर्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आले आहेत.