Home »  जुनैद-खुशी ‘लव्ह टुडे’ च्या रिमेकमध्ये दिसणार

 जुनैद-खुशी ‘लव्ह टुडे’ च्या रिमेकमध्ये दिसणार

by Team Gajawaja
0 comment
Love Today
Share

चित्रपट अभिनेता अमिर खान याचा मुलगा जुनैद आणि अभिनेत्री श्रीदेवी हिची धाकटी मुलगी खुशी हे लवकरच एका हिंदी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत आहेत. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी हिच्या पाठोपाठ खुशीही मोठ्या पडद्यावर येणार अशी चर्चा होती. गेल्या काही वर्षापासून जुनैदही मोठ्या पडद्यावर येण्यासाठी उत्सुक होता. आता हे दोन्हीही स्टारकीड एका तामिळ ब्लॉकबस्टर चित्रपटच्या रिमेकच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये ख-याअर्थानं पदार्पण करीत आहेत. जुनैद-खुशी तामिळ ब्लॉकबस्टर ‘लव्ह टुडे’ (Love Today) च्या रिमेकमध्ये दिसणार असून अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन  करणार आहेत.  

गेल्या काही वर्षापासून अमिर खानचा मुलगा जुनैद चर्चेत आहे. जुनैदचा बदललेला लूक पाहून लवकरच तो मोठ्या पडद्यावर येईल, अशी चर्चा होती. मात्र जुनैदला कॅमे-याच्या समोर येण्यापेक्षा कॅमे-याच्या मागे राहायला आवडते अशीही चर्चा होती.  पण आता हाच जुनैद,  श्रीदेवीच्या धाकट्या लेकीसह मोठ्या पडद्यावर येत आहे. गेल्या वर्षी आलेल्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘लव्ह टुडे’ चा हिंदी रिमेक येत असून त्यातून हे स्टारकीड बॉलिवूडमध्ये अधिकृत प्रवेश करत आहेत.  ‘सिक्रेट सुपरस्टार’ आणि ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अद्वैत चंदन या हिंदी लव्ह टुडेचे दिग्दर्शन करणार आहेत.  रोमँटिक-कॉमेडी असेलेल्या या चित्रपटाचे शुटींगही जूनमध्ये सुरु होईल अशी शक्यता आहे.  गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह टुडे’ (Love Today) या तमिळ चित्रपटात प्रदीप रंगनाथन आणि इवाना मुख्य भूमिकेत होते.  हा चित्रपट तामिळ बॉक्सऑफीसवर हिट ठरला. यातील गाणीही लोकप्रिय झाली होती.  आता त्याच्या हिंदी रिमेकमध्ये जुनैद आणि खुशी ही जोडी काय कमाल करते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.  

जुनैद आणि खुशी या दोघांचा हा दुसरा चित्रपट असेल. जुनैद आणि खुशी हे दोघेही सध्या त्यांच्या वेगवेगळ्या डेब्यू प्रोजेक्टवर काम करत आहेत.  जुनैद यशराज बॅनरच्या थ्रिलर-ड्रामा ‘महाराज’मध्ये काम करत आहे. तर खुशी झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’मधून पदार्पण करणार आहे. यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदाही त्याच्यासोबत असणार आहे. खुशीचा हा पहिला प्रोजेक्ट असला तरी तो OTT वर रिलीज होणार आहे.  जुनैद खान ज्या चित्रपटाचे काम करत आहे,  त्या चित्रपटाची कथा 1862 च्या कुप्रसिद्ध महाराजा लिबेल केसवर आधारित आहे. जुनैद खान व्यतिरिक्त या चित्रपटात शालिनी पांडे, शर्वरी वाघ आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Love Today)

लव्ह टुडे (Love Today) हा 2022 चा भारतीय तमिळ-भाषेतील रोमँटिक कॉमेडी-ड्रामा आहे.   या चित्रपटात स्वतः प्रदीप रंगनाथन, इवाना, रवीना रवी, योगी बाबू, सत्यराज आणि राधिका सरथकुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  लव्ह टुडे 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला.  या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.  रंगनाथन, इवाना, योगी बाबू आणि रवीना रवी यांच्या अभिनयाची प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही  प्रशंसा केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 150 कोटींची कमाई केली.  विशेष म्हणजे या चित्रपटाचे बजेट 5 कोटी होते.  

======

हे देखील वाचा : 2 हजारांची नोट बँकेत जमा करण्यापूर्वी ती बनावट तर नाही ना? असे तपासून पाहा

======

एक प्रेमी जोडपे,  त्यात मुलीच्या वडीलांच्या विचित्र अटी,  मग कोणाचे कोणावर प्रेम आहे, हा उडालेला गोंधळ त्यातून आलेला दुरावा, या सर्वात ख-या प्रेमाचा कसा शोध लागतो हे सर्व सांगणार लव्ह टुडे हा हलकाफुलका चित्रपट होता.  पण त्याच्या कथेची बांधणी एवढी मजबूत होती की ही चित्रपट बॉक्सऑफीसवर अपेक्षेपेक्षा यश संपादून गेला.  तामिळ ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाचे आता हिंदीत रुपांतर होत आहे. पण हे करतांना या चित्रपटाचा खरा आत्मा असलेली कथा बदलली जाते का हे पाहणे उस्तुकतेचे असेल.  त्याबरोबरच जुनैद आणि खुशी या कथेला कितपत न्याय देतील हेही लवकरच स्पष्ट होणार आहे. जूनमध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु होण्याची शक्यता असून डिसेंबर अखेर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येईल अशी आशा आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.