Home » ४० लाख फेक युजर बनवत जगातील मोठ्या बँकेला १४० कोटींना विकली कंपनी, सत्य ऐकून व्हाल हैराण

४० लाख फेक युजर बनवत जगातील मोठ्या बँकेला १४० कोटींना विकली कंपनी, सत्य ऐकून व्हाल हैराण

by Team Gajawaja
0 comment
JP Morgan
Share

आपण लहान-मोठ्या फसवणूकीबद्दल नेहमीच ऐकतो, पाहत असतो. परंतु तुम्ही कधी ऐकले आहे का एखाद्या बँकेलाच फसवले गेल्याचे? हे खरं आहे. कारण जगात नुकत्याच बड्या बँकांपैकी एक असलेली जेपी मॉर्गन (JP Morgan) सोबत एक मोठी फसवणूक झाल्याचा खुलासा झाला आहे. वर्ष २०२१ मध्ये अमेरिकेतील सर्वाधिक मोठी बँक जेपी मॉर्गनने फाइनेंशियल प्लानिंग वेबसाइट फ्रंकला १४२३ कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता असे समोर आले की, फ्रँकचे जवळजवळ ४० लाख ग्राहकांचे बनावट अकाउंट्स आहेत.

अमेरिकेतील बँक जेपी मॉर्गनने फ्रँकला सध्या बंद केले आहे. या व्यतिरिक्त कंपनीच्या फाउंडर चार्ली जेविस विरोधात खटला दाखल केला आहे. फ्रँक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्यास मदत करते.

खरंतर विक्रीवेळी केवळ ३ लाख ग्राहक
चार्ली जेविस आणि कंपनीचे चीफ ग्रोथ ऑफिसर ओलिवियर आमर यांनी कररावेळी असे म्हटले होते की, त्यांच्या वेबसाइटवर ४० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अकाउंट तयार केले आहेत. जेपी मॉर्गनने आरोप लावला आहे की, त्या दरम्यान केवळ ३ लाखच ग्राहक होते. अन्य युजर्स स्टार्टअपला विक्री करण्यासाठी तयार करण्यासाठी बनवण्यात आले होते.

ग्राहकांची माहिती शेअर करण्यासाठी नकार दिल्याचा आरोप
इंडिया टुडेच्या एका रिपोर्ट्सनुसार, जेपी मॉर्गनने (JP Morgan) आरोप लावला की जेविसने वेबसाइटच्या यशाबद्दल खोटं सांगितले. कंपनीच्या फाउंडरने युजरचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि अन्य दुसरी माहिती सुद्धा बनावट असल्याचा डेटा दिला. जेविसने प्राइव्हसेची हवाला देत सुरुवातीला ग्राहकांची माहिती शेअर करण्यास ही नकार दिला होता. बँकेच्या मते, बनावट अकाउंट बनवण्यासाठी एका डेटा साइंस प्रोफेसरची मदत घेतली गेली.

हे देखील वाचा- अमेरिका-दुबईत राहणाऱ्या भारतीयांना पेटीएम-फोनपे च्या माध्यमातून करता येणार पेमेंट

जेविसने आरोप फेटाळले
दुसऱ्या बाजूला चार्ली जेविसच्या वतीने वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. जेविसने काही दिवसांपूर्वीच बँकेच्या विरोधात खटला दाखल केला होता. तेव्हा असा आरोप लावण्यात आला होता की, जेपी मॉर्गनने त्यांना चुकीच्या पद्धतीने नोव्हेंबर २०२२ रोजी नोकरीवरुन काढले. जेणेकरुन त्यांना २२८ कोटी रुपयांचे पेमेंट करावे लागू नये.

दरम्यान, शिक्षणासाठी कर्ज देता यावे म्हणून या स्टार्टअपची सुरुवात २०१७ मध्ये करण्यात आली होती. चार्ली जेविसने या स्टार्ट अपला ‘हायर एज्युकेशनचे अमेजॉन’ असे सांगितले होते. परंतु या प्रँन्क नंतर १२ जानेवारीला वेबसाइटच बंद झाली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.