Home » जीवंत राहण्यासाठी प्यायला कासवाचं रक्त !

जीवंत राहण्यासाठी प्यायला कासवाचं रक्त !

by Team Gajawaja
0 comment
Jose Salvador Alvarenga
Share

त्याची बोट समुद्राच्या मधोमध होती. जमिनीवर उभं राहून त्याला ४०० पेक्षा जास्त दिवस झाले होते. तो जेव्हा किनाऱ्याहून होडी घेऊन निघाला होता तेव्हा त्याचा मित्र सुद्धा त्याच्यासोबत बोटीमध्ये होता. आता मात्र, तो बोटीत एकटाच होता. त्यासोबत आलेल्या मित्राने बोटीतच जीव सोडला होता, कारण ते ४०० पेक्षा जास्त दिवस समुद्रात अडकले होते. अन्न पाण्याशिवाय माणूस काहीच दिवस जीवंत राहू शकतो. पण तो ४०० दिवस होऊन सुद्धा जीवंत होता. तो एवढ्या समुद्रात अडकला कसा आणि जीवंत राहिला कसा? काय आहे जोस सॅल्वाडोर अल्वारेंगा याची मृत्यूशी झुंज देण्याची स्टोरी? जाणून घेऊया. (Jose Salvador Alvarenga)

१७ नोव्हेंबर २०१२ हीच ती तारीख जेव्हा मच्छीमार जोस अल्वारेंगा आणि त्याचा मित्र एझेकिअल कॉर्डोबा यांनी मिळून एक प्लॅन बनवला. किनाऱ्यापासून समुद्रात दहा-वीस किलोमीटर आत जाऊन ३० तासात मिळतील तेवढे मासे पकडायचे आणि परतायचं असा हा प्लॅन होता. त्यानुसार ते याच दिवशी एक रेडिओ मासे पकडण्यासाठी सामान, मासे ठेवण्यासाठी एक आइस बॉक्स हे सगळं घेऊन फायबरग्लास स्कीफ ही बोट घेऊन अटलांटिक समुद्रात निघाले. त्यांच्या प्लॅननुसार त्यांनी मासे पकडण्यास सुरुवात केली आणि बघता बघता त्यांनी ५०० किलो ताजे मासे पकडले सुद्धा होते, आता फक्त त्यांना किनाऱ्यावर जाऊन हे मासे विकले की पैसेच पैसे असे स्वप्नं ते दोघं बघत होते. पण रात्रीच्या सुमारास अचानक त्यांना एका वादळाच सामना करावा लागला. (Social News)

त्यांची छोटीशी बोट वादळासमोर टिकली नाही आणि हवेसोबत त्यांची बोट किनाऱ्यापासून १० हजार किलोमीटर लांब अटलांटिक समुद्राच्या मधोमध गेली होती. बोट पलटण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना मेहनतीने पकडलेले ५०० किलो मासे परत समुद्रात सोडावे लागले. वादळात मोटर आणि बहुतेक पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स खराब झालं. वादळ शांत झाल्यानंतर ती बोट चालवण्यासाठी कोणतीच सोय नव्हती. खाण्या पिण्याच सुद्धा कोणतच साधन त्यांच्या जवळ नव्हतं आणि आसपास होता फक्त अथांग समुद्र. दूर दूर पर्यंत जमिनीचा नामो निशाण नव्हता. अनेक दिवस त्यांनी हाताने मासे, जेली फिश, कासव आणि समुद्री पक्षी पकडून कच्चे खाले जेव्हा पावसाचं साचवलेलं पानी सुद्धा संपलं तेव्हा त्यांनी कासवाचं रक्त आणि स्वत:ची लघवी प्यायला सुरुवात केली. हे ऐकायलाच किती त्रासदायक आहे. पण अल्वारेंगा आणि कॉर्डोबा हे सगळं सहन करत होते. फक्त एकाच आशेवर कधीतरी ते किनाऱ्यावर पोहचतील, नाहीतर त्यांना मदत मिळेलं. (Jose Salvador Alvarenga)

समुद्रात असेच तीन साडे तीन महीने घालवल्यानंतर कच्चे मासे, कासव आणि पक्षी खाल्यानंतर कॉर्डोबाची तब्येत बिघडली होती. त्याने जेवढं आणि जे काही मिळतं होतं तेवढं सुद्धा खाणंपिणं सोडून दिलं. त्यांचे समुद्रात ४ महीने पूर्ण झाल्यानंतर कॉर्डोबाने भुकेने जीव सोडला. पण मरण्याआधी त्याने अल्वारेंगाकडून एक वचन घेतलं काहीही झालं तरी तू मला खाणार नाहीस. पुढे हफ्ताभर अल्वारेंगा दिवस घालवण्यासाठी कॉर्डोबाच्या मृतदेहाशी गप्पा मारता होता. पण नंतर त्याने सत्य अॅक्सेप्ट करून त्याचा मृतदेह समुद्रात सोडून दिला. अल्वारेंगाला आत्महत्येचे विचार येतं होते पण त्याने ते पाऊलं उचललं नाही. त्याने स्वत:ला देवाच्या आणि बोटीच्या भरोश्यावर सोडून दिलं होतं. तो आकाशातील चमकणारे तारे मोजत बसायचा, गाणे म्हणायचा असे दिवस जात होते. आता त्याला समुद्रात ४३८ दिवस झाले होते. (Social News)

ती तारीख होती ३० जानेवारी २०१४, त्यादिवशी त्याला बोटीतून एक डोंगर दिसला. अल्वारेंगाचं हरवलेलं हुरूप परतलं तो मार्शल बेटांवर पोहचला होता. त्याने बोटेतून उडी मारून पोहत मधलं अंतर पार केलं. किनाऱ्यावर पहिलं पाऊल ठेवल्या ठेवल्या अल्वारेंगा बेशुद्ध पडला. थोड्याच वेळात स्थानिकांनी त्याला पाहिलं आणि त्याला आपल्या घरी आणलं. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अल्वारेंगाची माहिती दिली. अल्वारेंगा त्यांना नग्न अवस्थेत बेशुद्ध सापडला होता. त्यामुळे त्यांना असं वाटतं होतं की त्याच्यावर कोणी अत्याचार केला आहे. शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा अल्वारेंगाने सर्वांना सत्य सांगितलं तर त्याचावर कोणाचाच विश्वास बसला नाही. (Jose Salvador Alvarenga)

======

हे देखील वाचा :  जगातला सर्वात प्रभावी आणि वादग्रस्त फोटो ?

======

४३८ दिवसांनी जेव्हा तो घरी परतला तेव्हा, तेव्हा सर्वात जास्त आनंदी त्याचे आई- वडील आणि त्याची १४ वर्षांची मुलगी फातिमा हिला झाला, कारण सर्वांना असं वाटत होतं की, त्याचा मृत्यू झाला आहे. जोस अल्वारेंगा घरी परतल्यावर मासेमारीचा व्यवसाय सोडला. इतक्या नरकयातना सहन केल्यानंतर त्याने एक साधारण पण सुंदर आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. आपल्याला मिळालेलं आयुष्य खूप सुंदर आहे. आपण ते आनंदात जगलं पाहिजे, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी हिंमत न हारता त्याचा सामना करता आला पाहिजे हे जोस अल्वारेंगा यांच्या या भयानक अनुभवातून कळतं. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.