Home » Lifestyle : जोडलेल्या भुवयांमागे देखील आहे एक मोठे शास्त्र

Lifestyle : जोडलेल्या भुवयांमागे देखील आहे एक मोठे शास्त्र

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lifestyle
Share

आपण जेव्हा कोणत्याही व्यक्तीला भेटतो तेव्हा सर्वात आधी आपले लक्ष जाते ते तिच्या चेहऱ्याकडे. आपण त्या व्यक्तीशी बोलताना हळहळू हळूहळू त्या व्यक्तीचे पूर्ण निरीक्षण करतो. त्या चेहऱ्यातील, व्यक्तिमत्वातील बारीक बारीक गोष्टी देखील पकडतो. अनेकदा आपण पाहिले असेल की, अनेक लोकांच्या दोन्ही भुवया ह्या जोडलेल्या असतात. पण अश्या भुवयांची माणसं फार कमी प्रमाणात आपल्याला दिसतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का…की अशी दोन भुवया जोडलेल्या असणे शुभ असते की अशुभ? मान्य आहे की अशा भुवया असणे हे नैसर्गिक असते. पण तरीही आपल्या सामुद्रिक शास्त्रानुसार, भुवया केवळ सौंदर्यासाठी नाहीत, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही सांगतात. (Lifestyle)

समुद्रशास्त्रानुसार चेहऱ्यावरील विविध वैशिष्ट्यांमधून त्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य, जीवनाची दिशा ओळखता येते. भुवया या केवळ चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणाऱ्या नसून, त्या व्यक्तीच्या वृत्तीबद्दल, आर्थिक स्थितीबद्दलही खूपच माहिती देतात. समुद्र ऋषींनी सामुद्रिक शास्त्राची रचना केली होती. यामध्ये व्यक्तीच्या अवयवांबद्दल आणि त्याच्या वैशिष्ट्य ठेवणीवरून त्याबद्दल काही अंदाज, भाकितं केली आहेत. आपण बऱ्याचवेळा ऐकतो की, चेहरा पाहून भविष्य सांगणारे, डोळे पाहून भविष्य सांगणारे एकूणच काय तर भारतात मागील अनेक शतकांपासून व्यक्तीचा स्वभाव आणि भाग्य जाणून घेण्याचे शास्त्र आहे. शरीराच्या आणि चेहऱ्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही अर्थ असतो आणि या चिन्हांच्या आधारे, व्यक्तीच्या विचारसरणी, वर्तन आणि भविष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेता येतात. जर एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही भुवया जोडलेल्या असतील तर त्याचा अर्थ काय? हे शुभ आहे की अशुभ? जाणून घेऊयात. (Marathi News)

सामुद्रिक शास्त्रानुसार, भुवयांचा आकार, त्यांची जाडी, अंतर, रचना यावरून व्यक्तीच्या स्वभावाचा, विचारांचा अंदाज लावता येतो. साधारणपणे, दोन्ही भुवयांमधील थोडे अंतर चांगले मानले जाते. परंतु जेव्हा दोन्ही भुवया एकमेकांशी जोडलेल्या असतात म्हणजेच त्यामध्ये कोणतेही अंतर नसते, तेव्हा ते काही विशेष संकेत देतात. जसे की, ज्यांच्या भुवया जुळलेल्या असतात ते सहसा खूप विचारशील, खोल मनाचे असतात आणि त्यांच्या गोष्टी ते लपवून ठेवतात. (Todays Marathi Headline)

Lifestyle

ज्या लोकांच्या भुवया एकमेकांना जोडलेल्या असतात, ते अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक स्वभावाचे असतात. अशा लोकांकडे जिद्द आणि चिकाटीची कमतरता नसते. ते कोणत्याही कठीण परिस्थितीत हार मानत नाहीत आणि यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम करतात. हे लोक कोणतीही परिस्थिती लवकर समजून घेत आणि त्यानुसार विचारपूर्वक प्रतिक्रिया देतात. असे लोक त्यांच्या आतील भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत. ते आतून काय विचार करत आहेत हे जाणून घेणे कठीण असते. जोडलेल्या भुवयांच्या लोकांना त्यांचे गुपत स्वतःमध्येच ठेवायला आवडतात आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये इतरांपासून वेगळे एकटे राहणे पसंत करतात. (Latest Marathi News)

पुरुषांबद्दल सांगायचे झाले तर पुरुषांसाठी जोडलेल्या भुवया शुभ मानल्या जातात, पण महिलांसाठी मात्र त्या अशुभ असल्याचे समुद्रशास्त्र सांगितले आहे. अशा महिलांचे सतत वाद होत असतात. यामुळे त्यांना कुटुंबातील समतोल राखणे कठीण जाते. दोन्ही भुवया जुळणे कधीकधी तापट स्वभावाचे लक्षण मानले जाते. अशा लोकांचा मूड खराब झाला तर त्यांना शांत करणे थोडे कठीण होऊ शकते. तथापि, त्यांचा राग लवकर शांत होतो. (Top Trending News)

समुद्रीशास्त्रानुसार, अशा लोकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता खूप असते. हे लोक विचार करून, समजून घेऊन आणि संपूर्ण योजना आखून पावले उचलतात. कोणीही त्यांना घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाही. ज्या लोकांच्या भुवया जोडलेल्या असतात त्यांच्या प्रेमसंबंधात किंवा लग्नात कधीकधी संघर्ष उद्धभवू शकतो. कारण असे आहे की हे लोक त्यांचे विचार उघडपणे व्यक्त करत नाहीत, नात्यात मोकळेपणा कमी असतो, ज्यामुळे गैरसमज होऊ शकतात. (Top Marathi News)

========

Morpankh : श्रीकृष्णाला प्रिय असलेले मोरपीस घरात ठेवल्यास होतात मोठे फायदे

========

जोडलेल्या भुवयांची माणसं महत्वाकांक्षी आणि बुद्धिमान असतात. आपल्या बुद्धीच्या जोरावर ते यश संपादित करू शकतात, शिवाय दुसर्याकडून आपले काम देखील करून घेऊ शकतात. या लोकांचे करिअर सहसा चांगले असते, विशेषतः जेव्हा ते त्यांचे विचार योग्य दिशेने ठेवतात. तथापि, कधीकधी त्यांच्या अतिविचार करण्याच्या सवयीमुळे ते संधी गमावू शकतात. ज्या लोकांच्या भुवया एकमेंकाना जुळलेल्या असतात ते लोक खूप विचार करणारे, सर्जनशील, एखाद्याच्या मनात गोष्टी लपवून ठेवणारे असतात. (Social News)

( टीपः धर्म, ज्योतिष, या विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आम्ही कोणत्याही तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.