न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या पत्नीचा आहे. २८ वर्षीय रामा दुवाजी या जोहरान ममदानी यांच्या पत्नी आहेत. सीरियन वंशाच्या रामा या न्यू यॉर्कमध्ये स्थायिक असून त्या प्रसिद्ध कलाकार आणि कार्यकर्त्या आहेत. जोहरान यांनी त्यांच्या निवडणुकीचे कॅपेंन अवघ्या वर्षभरापूर्वी चालू केले. या सर्वात रामा कधीही पडद्यापुढे आल्या नाहीत, तर त्या मागून या सर्व प्रचाराचे नियोजन करीत राहिल्या. ममदानी यांची भूमिका न्यू यॉर्कमधील प्रत्येक घरात पोहचवण्यासाठी जो डिजिटल मीडियाचा वापर झाला, त्याच रामा दुवाजी यांचा मोठा हातभार आहे. असे असले तरी ममदानी यांचा प्रचार सुरु झाल्यापासून रामा या कधीही लोकांसमोर आल्या नाहीत. कारण सिरियन वंशीय रामा यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्वाचा ममदानी यांच्या विजयावर परिणाम होऊ नये म्हणून त्या प्रचाराची धुरा सांभाळत मागे राहिल्या. मात्र मतदान करण्यासाठी रामा दुवाजी आणि जोहरान ममदानी पुन्हा एकत्र सर्वांसमोर आले आणि ममदानी यांच्या विजयासाठी रामा दुवाजींनी आखलेल्या रणनितीची चर्चा सुरु झाली. (Johran Mamdani)

३४ वर्षीय जोहरान ममदानी हे न्यू यॉर्कचे महापौर झाले आहेत. तर त्यांच्या पत्नी आणि सिरीयन वंशाच्या रामा दुवाजी या न्यू यॉर्कच्या प्रथम महिला झाल्या आहेत. ममदानी यांचा हा विजय सोप्पा नव्हता. अवघ्या सात वर्षापूर्वी त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. अशावेळी थेट प्रचारात उतरुन न्यू यॉर्कसारख्या मोठ्या शहराच्या महापौर पदाची जबाबदारी मिळणे, यामागे मोठी योजना होती. ही सर्व योजना आणि ममदानी यांचा प्रचार प्रमुख म्हणून भूमिका पार पाडली ती, रामा दुवाजी यांनी. जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक असलेल्या न्यू यॉर्कमध्ये भाडे कपात आणि परवडणारी वाहतूक यासारख्या अश्वासनामुळे ममदानी लोकप्रिय झाले. त्यांच्या या आश्वासनांचा डोनाल्ड ट्रम्प यांनीही विरोध केला. मात्र ममदानी यांनी हा सर्व विरोध बाजुला करत विजयाला गवसणी घातली. या सर्वांची मुळ योजना करण्यामागे रामा यांचा मोठा वाटा आहे. (International News)
रामा दुवाजी या सीरियन-अमेरिकन चित्रकार आणि अॅनिमेटर म्हणून लोकप्रिय आहेत. अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठित मासिकांसाठी त्यांनी काम केले आहे. रामा यांनी न्यू यॉर्क स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून मास्टर ऑफ फाइन आर्ट्सची पदवी घेतली आहे. रामा दुवाजीचा जन्म सीरियातील दमास्कस येथे झाला. २०२१ मध्ये रामा अमेरिकेत आली आणि न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झाली. तिने व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठातून कम्युनिकेशन डिझाइनमध्ये पदवी मिळवली. शिवाय स्वतःला सीरियन-अमेरिकन चित्रकार आणि अॅनिमेटर म्हणून स्थापित केले. रामा यांच्या द न्यू यॉर्कर, बीबीसी, वॉशिंग्टन पोस्ट, अॅपल आणि टेट मॉडर्न सारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर रामा दुवाजी यांच्या कलाकृतींचे कौतुक झाले आहे. (Johran Mamdani)

रामा यांनी बीबीसी, द न्यू यॉर्कर आणि व्होग सारख्या प्रतिष्ठित मासिकांसाठी देखील काम केले आहे. डिजिटल मीडियामध्ये त्यांची मास्टरी आहे. ममदानी आणि त्यांची भेट चार वर्षापूर्वी झाली. हिंज या डेटिंग अॅपवर हे दोघं प्रथम भेटले. या अॅपचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला तुमच्यासाठी सर्वात योग्य असलेल्या लोकांशी जोडले जाते. प्रोफाइलमधील वैशिष्ट्यावर लाईक किंवा टिप्पणी केल्याने संभाषण सुरू होते. दर तीन सेकंदांनी कोणीतरी हिंजवर डेटवर जाते. अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वात लोकप्रिय डेटिंग अँप म्हणून या हिंजचा उल्लेख होतो. त्यानंतर ममदानी आणि रामा यांनी २०२४ मध्ये न्यू यॉर्क सिटी क्लर्कच्या कार्यालयात एका नागरी समारंभात लग्न केले. डिसेंबर २०२४ मध्ये दुबईमध्ये या जोडप्याच्या लग्न समारंभाचा आणखी एक शाही सोहळा झाला. दुबईतील अलिशान इमारतीमधील या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय युगांडामधील ममदानी कुटुंबाच्या इस्टेटमध्येही या लग्नाचा तीन दिवसांचा स्वागत सोहळा पार पडला आहे. (International News)
================
हे देखील वाचा : Zohran Mamdani : ट्रम्पच्या नाकावर टिच्चून भारतीय वंशाचे जोहरान ममदानी बनले न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर
================
ममदानी यांच्या राजकीय प्रवासामागे रामा यांचा मोठा हातभार आहे. एक रॅपर असलेले ममदानी, रामा यांच्यामुळेच सक्रिय राजकारणात आले. मात्र रामा दुवाजीने स्वतःला सार्वजनिक व्यासपीठांपासून दूर ठेवले. प्रचारातही पडद्यामागे राहून त्यांनी प्रचार मोहिमेचे ब्रँडिंग आणि सोशल मीडिया प्रतिमेवर काम केले. ममदानी एका मुलाखतीत “रामा ही फक्त माझी पत्नी नाही, ती माझी प्रेरणा आहे. ती कलेच्या माध्यमातून तिच्या स्वतःच्या पद्धतीने बदल घडवून आणते.” असे सांगून रामा यांचा गौरव केला आहे. (Johran Mamdani)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
