महाराष्ट्रातील सरकारने नुकत्याच पुण्यातील बेबी पाउडरची निर्मिती करणारी कंपनी जॉनसन अॅन्ड जॉनसन्स (Johnson & Johnson’s) यांचा परवाना रद्द केला आहे. राज्यातील एफडीएने रुटीन क्वालिटी इंस्पेक्शनच्या दरम्यान इंस्पेक्शन करताना त्यांना असे दिसून आले की, एक नमूना हा अतिशट वाईट गुणवत्तेचा होता.
महाराष्ट्रीतील एफडीएने एका प्रेस कॉन्फ्रेंरन्समध्ये असे म्हटले की, त्यांनी राज्यातील बेबी पाउडर बनवणाऱ्या जॉनसन अॅन्ड जॉनसन कंपनीचा परवाना तत्काळ रद्द केला आहे. त्याचसोबत कंपनीला त्या पावडरचा स्टॉक ही परत मागवण्यास सांगितला आहे. एफडीए यांनी आपल्या एका विधानात असे म्हटले की, या प्रोडक्ट्सचा वापर लहान मुलांच्या त्वचेसाठी केला जातो. परंतु अशा पद्धतीची गुणवत्ता असेल तर त्यांचा आरोग्याला हानिकारक ठरु शकते.
पुढे त्यांनी असे म्हटले की, परिक्षणासाठी तयार करण्यात आलेला नमूना IS 5339:2004 चे अनुपालन करत नाही, जो टीट pH मध्ये लहान मुलांच्या त्वचेच्या पावडरची विशिष्टता आहे.
दरम्यान, नाशिक आणि पुण्यातील नमून्यांची गुणवत्ता तपासात ते अयशस्वी झाले. त्यामुळे एफडीए विश्लेषक यांनी ड्रग्ज अॅन्ड कॉस्मेटिक्स अॅक्ट, १०४० आणि नियमाअंतर्गत कारणे दाखवा नोटीस ही जाहीर केली आहे. या नोटीसमध्ये अमेरिकेतील एफएमसीजीला असे विचारण्यात आले आहे की, उत्पादन निर्माण परवाना रद्द करणे किंवा त्याचे निलंबन करण्यासंदर्भात कोणताही कारवाई का करण्यात आली नाही.(Johnson & Johnson’s)
हे देखील वाचा- दूधाबरोबर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन; नाहीतर होऊ शकते भयंकर समस्या
कंपनीने एफडीएच्या परि७णाचे रिपोर्ट्स स्विकार केलेले नाहीत. त्यांनी याला कोर्टात आव्हान दिले आहे ज्यामध्ये याचिका दाखल केली होती. त्यात असे म्हटले होते की, नमूने रेफरल प्रयोगशाळा म्हणजेच सेंट्रल ड्ग्ज लॅबोरेटरी गर्व्हनमेंट ऑफ इंडिया, कोलकाता येथे पाठवावीत. निर्देशक सीडीएल, कोलकाता यांनी सुद्धा महाराष्ट्र एफडीएच्या रिपोर्टची पुष्टी केली आणि अंतिम निर्णयाचा रिपोर्ट जारी करत म्हटले की, pH च्या परीक्षणसंबंधित नमूना आयएस 5339: 2004 च्या अनुरुप नाही.
जॉनसन अॅन्ड जॉनसन यांनी आपल्या एका विधानात असे म्हटले की, जगभरातील वैद्यकिय तज्ञांत्या अनेक दशकांच्या स्वतंत्र वैज्ञानिक विश्लेषणाच्या मागे खंबीरपणे उभे आहे, जी पुष्टी करताना टॅल्क आधारित जॉनसन बेबी पावडर सुरक्षित आहे. त्यात एस्बेस्टोस नाही आणि कर्करोग ही होत नाही. दरम्यान, यापूर्वी सुद्धा जॉनसन अॅन्ड जॉनसनच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते.