अमेरिकेच्या इतिहासात असे सुद्धा एका राष्ट्राध्यक्ष राहिले होते ज्यांनी कधीच निवडणूकीत पराभव स्विकारला नाही. त्यांच्या नावे अमेरिकेतील सर्वाधिक तरुण राष्ट्राध्यक्ष असल्याचा रेकॉर्ड ही आहे. मात्र त्यांच्या हत्येने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. त्यांचे नाव होते जॉन कॅनेडी (John F Kennedy) . जॉन हे २ वर्ष, १० महिने आणि दोन दिवसांसाठी राष्ट्राध्यक्ष राहिले होते. मात्र वयाच्या ४३ व्या वर्षात ते अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष झाले होते. २२ नोव्हेंबर १९६३ रोजी अमेरिकेतील राज्य टेक्सासच्या डलास मध्ये त्यांनी हत्या झाली तेव्हा ते खुल्या कारमधून जात होते.
त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या ओसवॉल्ड याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर कॅनडी समर्थकांनी ओसवॉल्डची हत्या केली. या घटनेने संपूर्ण जगाला धक्का बसला होता. मात्र ही घटना हळूहळू एक गुपित बनत गेले आणि ते आजवर कोणाला कळले ही नाही.
कधी रशिया तर कझी क्यूबाच्या दिशेने झुकला गेला संशय
कॅनेडी यांच्या हत्येनंतर ओसवॉल्डवर खटला सुरु होण्याआधी आणि नव्या गोष्टी समोर येण्याआधीच त्याची हत्या केली गेली. ओसवॉल्डवर कॅनेडी यांची हत्या करण्याच आरोप लावण्यात आला होता. मात्र अटकेनंतर राष्ट्राध्यक्षांच्या मृत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. या हायप्रोफाइल प्रकरणी खुप तपास ही झाला. एफबीआय, वॉरेन कमीशन आणि हाउस सिलेक्ट कमेटी ऑन असोसिएशन यांच्या अधिकृत रुपात निष्कर्ष जाहीर करण्यात आला ज्यामध्ये ओसवॉल्ड हाच मारेकरी होती.
आरोप लावल्यानंतर कॅनेडी यांचे समर्थक रुबीने ओसवॉल्ड याच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. त्यानंतर काही गोष्टी समोर आल्या, काही लोकांचे असे मानणे होते की, कॅनेडी यांच्या हत्येचे कनेक्शन क्यूबाशी जोडले गेले आहे. ली हार्वी ओसवॉल्डने असे क्यूबाचे तत्कालीन पंतप्रधान फिदेस कास्त्रो यांना खुश करण्यासाठी केले होते. तर काही लोकांचे असे मानणे होते की, त्यांच्या हत्येमागे रशियाची गुप्तचर एजेंसी आहे.
कॅनेडी यांची हत्या आणि ती रहस्यम महिला
कॅनेडी यांच्या हत्येवेळी एक महिलेला सुद्धा पाहिले गेले. जिचे नाव द बबुश्का लेडी असल्याचे सांगितले गेले. आज ही त्या महिलेचे फोटो आहेत. ज्यावेळी कॅनेडी यांच्यावर गोळीबार ढाला त्यावेळी त्या महिलेच्या हातात कॅमेऱ्या प्रमाणे दिसणारी पिस्तुल होती. मात्र आजवर महिलेची वास्तविक ओळख पटलेली नाही. त्याचसोबत तिच्या हातात असेली बंदुक ही खरोखर कॅमेरा होता की खरंच बंदुक होती हे सुद्धा कळले नाही. अशा काही गोष्टी समोर आल्यानंतर कॅनेडी यांच्या हत्येचे रहस्य अधिक गुढ होऊ लागले होते. आजवर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
हे देखील वाचा- पाकिस्तानात सत्तेसाठी नेहमीच राहिला संघर्ष… इमरान ते भुट्टो यांच्यावर झालेत जीवघेणे हल्ले
हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथून शिक्षण घेतल्यानंतर नौसेत दाखल
कॅनेडी (John F Kennedy)यांचा जन्म २९ मे १९१७ रोजी अमेरिकेतील ब्रुकलिन येथे झाला होता. त्यांचे वडिल अमेरिकेतील यशस्वी व्यक्तींपैकी एक होते. फिल्ढ इंडस्ट्री ते स्टॉक मार्केट आणि बँकिंग पर्यंत त्यांचा व्यवसाय पसरला होता. १९३८ मध्ये वडील अमेरिकेतील अॅम्बेसेडर बनून ब्रिटेनला पोहचले आणि २१ वर्षीय कॅनेडी सुद्धा त्यांच्यासोबत सेक्रेटरी झाले.
कॅनेडी यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतल्यानंतर १९४१ मध्ये नौसेनेत दाखल झाले. हा तो काळ होता जेव्हा दुसरे महायसु्द्ध सुरु होते. यु्द्धात भावाचा मृत्यू झाला. १९४५ मध्ये नौसेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजकरणात एन्ट्री घेतली. १९४६ मध्ये त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. कॅनेडी यांना कधीच निवडणूकीत पराभव स्विकारावा लागला नाही.