आजच्या स्पर्धात्मक काळात प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आपण श्रीमंत व्हावे असे वाटत असते. याच कारणास्तव कमी वयातील मुलं सुद्धा नोकरीच्या शोधात एक पाऊल पुढे टाकताना दिसून येतात. अशातच जर तुम्हाला शासकीय नोकरीसाठी अर्ज करायचा असेल पण कोणत्या ठिकाणी करावा हे कळत नसेल तर ही माहिती तुमच्या कामी येणार आहे. कारण आम्ही तुम्हाला १० वी नंतर शासकीय नोकरीसाठी कोणत्या क्षेत्रात अर्ज करुन त्यामध्ये करियर करु शकता याबद्दल अधिक सांगणार आहोत. (Job Option After 10th)
-भारतीय नौसेना
१० वी चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेनेत तुम्ही करियर करु शकता. नौसेनेत अग्निपथ योजनेअंतर्गत शेफ, ऑफिसर्स मेसमध्ये वेटर प्रमाणे जेवण वाढणे, हाउसकीपिंग, फंड अकाउंट सारखे काही स्तराच्या नोकऱ्या दिल्या जातात. १० वी पास झाल्यानंतर तुम्ही यामध्ये करियर करु शकता. नौसेनेत अग्निवीर एमआरसाठी योग्यता ही १० वी पास असते. अशातच तुमचे वय १७ ते २३ वर्ष असावे. इंडियन नेव्ही अग्निवीर एमआरसाठी तुम्ही joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि येथूनच तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

-भारतीय सैन्य
१० वी पास विद्यार्थी भारतीय सैन्यात सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर ट्रेड्समॅन सारख्या पदांवर अर्ज करु शकता. भारतीय सैन्यात प्रत्येक वर्षी ट्रेड्समॅन अंतर्गत शेफ, मॅनेजर, हाउस किपर सारख्या पदांवर योग्य उमेदवार निवडले जातात. या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १७ ते २१ वर्ष असावे. १० वी नंतर भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला फिजिकल आणि मेडिकल परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त आणि फिट ठेवावे लागते.
-बीएसएफ हेड कॉंस्टेबल
बीएसएफ मध्ये विविध पदांवर नोकर भरती केली जाते. १० वी नंतर बीएसएफमध्ये एन्ट्री घेत त्यात करियर करता येते. या क्षेत्रात करियर करण्यासाठी लक्षात ठेवावे की, तुम्हाला १० वी परिक्षेत ५५ टक्क्यांहून अधिक गुण असणे अनिवार्य आहे. त्याचसोबत उमेदवाराला फिजिकली आणि मेडिकली फिट असणे ही गरजेचे आहे. (Job Option After 10th)
हे देखील वाचा- नव्या शहरात शिफ्ट होण्यापूर्वी ‘या’ सेफ्टी टीप्स जरुर वाचा
-शिक्षण क्षेत्र
१० वी च्या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात ही करियर करु शकतात. तुम्ही खासगी ट्युशनच्या रुपात काम करु शकतात. या क्षेत्राची खास गोष्ट अशी की, या दरम्यान तुम्ही पुढचे शिक्षण सुद्धा घेऊ शकता.