परदेशात नोकरी करण्याचे प्रत्येकाचेच स्वप्न असते. जगभरातील विविध देशातील लोक दुसऱ्या देशांमध्ये नोकरी करण्यासाठी जातात. तर बहुतांश लोक त्यांना ज्या देशात नोकरी मिळते तेथेच ते स्थायिक होतात. मात्र अशी लोक खरंच आनंदी असतात का? एका सर्वेमध्ये ही बाब समोर आली आहे की, परदेशात नोकरी करणारा एक मोठा ग्रुप आपल्या आयुष्यात नाखुश आहे. स्थालांतरांसाठी समर्पित संस्था इंटरनेशंस यांच्याकडून करण्यात आलेल्या एक्सपॅट इनसाइडर सर्वेक्षणात काही गोष्टी समोर आल्या आहेत. या सर्वेमध्ये १८१ देशात राहणारे १७७ देशातील ११,९७० लोकांचा समावेश करण्यात आला. सर्वेनुसार नोकरी करणे आणि त्यासंदर्भात कुवैत, न्युझीलंड, हॉंगकॉंग, साइप्रस आणि लक्जमबर्गमध्ये स्थलांतर करणे योग्य नाही आहे. त्यांचा एक मोठा गट असंतुष्ट आहे.(Job offer)
त्यानुसार कुवैत मध्ये नोकरीकरण्यासाठी स्थलांतरित झालेले ४६ टक्के नोकरदार वर्ग नाखुश आहे. तर ५१ टक्के लोकांची तेथील लोकांसोबत मैत्री होत नाही आणि ३१ टक्के जण आपल्या नोकरीमुळे संतुष्ट नाहीत. या व्यतिरिक्त न्युझीलंड मधील ३२ टक्के स्थलांतरिक लोक आपल्या सॅलरीमुळे नाखुश आहेत. २६ टक्के जण कामांच्या तासामुळे. मात्र तेथे राहण्याचा खर्च जागतिक स्तरावर ४० टक्के अधिक आहे.

तसेच हाँगकॉंग मध्ये सुद्धा ६८ टक्के स्थलांतरित कॉस्ट ऑफ लिविंगमुळे नाखुश आहेत. तर ४६ टक्के लोक असे मानतात की, त्यांच्या नोकरीत कोणत्याही प्रकारची क्रिएटिव्हिटी नाही आहे. दुसऱ्या बजूला ३३ टक्के स्थलांतरित हे शहरातील वातावरणामुळे असंतुष्ट आहेत. या व्यतिरिक्त साइप्रस मध्ये ३४ टक्के स्थलांतरित आपल्या नोकरीच्या ऑफरमुळे नाखुश आहेत. २८ टक्के जण आपली नोकरी आणि ३३ टक्के हे आपल्या जीवनशैलमुळे असंतुष्ट आहेत.(Job offer)
हे देखील वाचा- ऑफिसच्या पत्त्यासाठी होणाऱ्या वेरिफिकेशनच्या नियमात बदल, जाणून घ्या अधिक
लक्जमबर्गमध्ये ४२ टक्के स्थलांतरित आपल्या सोशल लाइफमुळे खुश नाहीत. २६ टक्के आपल्या नोकरीमुळे असंतुष्ट आहेत तर ३५ टक्के लोकांचे असे मानणे आहे की, त्यांना तेथे कोणताही पसर्नल सपोर्ट दिला जात नाही. महत्वाचे म्हणजे मेक्सिकोने एक्सपैट इनसाइडर रॅंकिंग २०२२ च्या यादीत वरचे स्थान मिळवले आहे. तर भारताचा यामध्ये ५२ देशांपैकी ३६ व्या स्थानावर क्रमांक लागतो. मात्र कुवैतला रँकिंगमध्ये स्थलांतरितांच्या संबंधित सर्वाधिक खबार देश असल्याचे यादीतून समोर आले आहे. त्यामुळे आता तुम्हीच विचार करा अशा ठिकाणी नोकरी करणे किंवा नोकरीसाठी स्थलांतरित होणे तुम्हाला तरी पटतंय का?