गेल्याच आठवड्यात पाऊस पडल्यानंतर वातावरणात बदल झाला आणि अचनाक उन्हाळा ही वाढला गेला. भारतीय हवामान खात्याने असा अनुमान लावला की, भीषण उन्हाच्या गरम वाऱ्यामुळे जनावरे आणि जंगलांवर वाईट परिणाम होणार आहे. यामुळे पर्यावरणाचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आयएमडीसह वर्ल्ड बंकेने सुद्धा उन्हाळ्याबद्दल एक गंभीर इशारा दिला आहे. (Job loss)
वर्ल्ड बँकेने असे म्हटले आङे की, तापमान सातत्याने वाढत आहे. याचा परिणाम याच वर्षी नव्हे तर काही वर्षांपर्यंत सामान्य जनजीवनावर खुप वाईट परिणाम टाकेल. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात काही प्रकारची संकट येऊ शकतात. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमध्ये क्लाइमेंट इवेंस्टमेंट अपॉर्च्युनिटी इन इंडियाज कुलिंग सेक्टरध्ये असे म्हटले आहे की, वाढते तापमान आणि हवामानात होणाऱ्या बदलावामुळे मानवी जीवनावर दुहेरी संकट ओढवणार आहे.
हवामान खात्याच्या वैज्ञानिकांची मार्च २०२२ मध्येच असा इशारा दिला होता की, यंदाच्या वर्षात देशात प्रचंड उष्णतेची लाट येमार आहे. असेच झाले आहे आणि संपूर्ण देशात भीषण उन्हामुळे लोक हैराण होत आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये सुद्धा अचानक वातावरणात बदल झाला आणि लोकांना हलक्या थंडाव्याच्या वातावरणात जुन-जुलैचा अनुभव आला. हवामान खात्याने असे सांगितले की, गेल्या १७ वर्षांमध्ये यंदा फेब्रुवारी महिन्यात अधिक उष्णतेचा होता. आता हवामान खात्याने पुन्हा असा अनुमान लावला आहे की, यंदाच्या वर्षी ही गरम हवेमुळे लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे. (Job loss)
वर्ल्ड बँकेने आपल्या रिपोर्टमध्ये एका बाजूला असे म्हटले आहे की, या उष्माघातामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहेच. पण दुसऱ्या बाजूला गरम हवेमुळे उत्पादनावर ही त्याचा परिणाम होईल. उत्पादन कमी झाल्याने रोजगारावर परिणाम होणार. त्याचसोबत रिपोर्टमध्ये असे ही म्हटले आहे की, सातत्याने वाढत्या उन्हामुळे पुढील ७ वर्षात म्हणजेच २०२३० पर्यंत जगभरात ८ कोटी लोकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. हा धक्कादायक अंदाज बिघडलेल्या वातावरणामुळे लावण्यात आला असून यामधील ३ कोटी नोकऱ्या या भारतातून जाणार असतील.
हे देखील वाचा- महाराष्ट्रात सर्वाधिक गर्भपात; देशभरात १.४४ लाख प्रकरणे दाखल
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या उन्हाळ्यामुळे येणारअया वर्षाबद्दलचा लावल्या जाणाऱ्या अंदाजाबद्दल बहुतांश लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. भारतीय हवामान खात्यानुसार यंदा एप्रिल-मे महिन्यात जुन आणि जुलै सारखी गरम हवा वाहणार असल्याचा अंदाज आहे. अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, फेब्रुवारी महिन्यात याच कारणामुळे खुप गरम होत होते.