अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ राष्ट्राध्यक्ष असलेले जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. जिमी कार्टर हे मानवतेच्या सन्मानासाठी लढणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जातात. शिवाय भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील मैत्रीची सुरुवात जिमी कार्टर यांच्या कारर्किदीपासूनच झाली. याच जिमी कार्टर यांच्या निधनाची बातमी आली आणि हरियाणामधील एका गावात शोककळा पसरली. हे गाव म्हणजे, कार्टरपुरा. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या नावावरुन भारतात कार्टरपुरा हे गाव आहे. हरियाणाच्या या गावात जिमी कार्टर यांची आई समाजसेवा करण्यासाठी काही काळ वास्तव्यास होती. जिमी कार्टर जेव्हा भारतभेटीवर आले, तेव्हा त्यांना भारतातील खेडेगावातील जनजीवन बघण्याची इच्छा होती. (Jimmy Carter)
तेव्हा त्यांच्या आईनं मुक्काम केलेलं गाव त्यांच्यासाठी निवडण्यात आले. जिमीही या गावात आले आणि आपल्या आईनं केलेल्या कार्याची पाहणी केली. गावक-यांसोबत चर्चा केली. हा जिव्हाळा एवढा वाढला की चक्क गावाचे नावच कार्टरपुरा असे करण्यात आले. या कार्टरपुरा गावानं जिमी कार्टर यांच्यासोबतच स्नेह कायम जपला. जेव्हा जिमी कार्टर यांना शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला, तेव्हा याच कार्टरपुरामध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. आता जिमी कार्टर यांच्या निधनाची बातमी आली, आणि या कार्टरपुराच्या प्रत्येक घरात आपल्याच घरातील माणूस गेल्यासाररखे वातावरण आहे. (International News)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी जॉर्जिया येथील घरी निधन झाले. 1 ऑक्टोबर 1924 रोजी जन्मलेले जिमी कार्टर हे अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष होते. कार्टर यांनी ‘कार्टर सेंटर’ या संस्थेच्या माध्यमातून शेवटपर्यंत मानवतेसाठी काम केले. यासाठीच त्यांना 2002 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. जिमी कार्टर यांचे भारताबरोबर मैत्रीपूर्ण नाते होते. 1977 मध्ये आणीबाणी उठवल्यानंतर आणि जनता पक्षाच्या विजयानंतर भारताला भेट देणारे ते पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते. 3 जानेवारी 1978 रोजी भारताला जिमी कार्टर यांनी दिलेली भेट ही कायम स्मरणीय अशी ठरली. एवढी की भारताच्या एका गावाचे नावच त्यांच्या नावावरुन ठेवण्यात आले. (Jimmy Carter)
यावेळी भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई होते. कार्टर यांना या भारत दौ-यात भारातील एक गाव बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा नवी दिल्लीपासून एक तासावर असलेल्या हरियाणामधील दौलतपूर नसीराबाद गावाची निवड करण्यात आली. कारण जिमी कार्टर यांची आई, लिलियन या 1960 च्या उत्तरार्धात या गावात वास्तव्यास होत्या. लिलियन यांनी आरोग्य स्वयंसेवक म्हणून या गावात काम करुन येथील प्रत्येक घरात स्नेहसंबंध जोडले होते. आपल्या आईनं जिथे काम केले होते, त्याच गावाला कार्टर दांम्पत्यानं भेट दिली. या भेटीनं या गावातील ग्रामस्थ एवढे भारावले की या गावाचे नावच जिमी कार्टर यांच्या सन्मानार्थ कार्टरपुरी ठेवण्यात आले. यानंतर कार्टर यांनी 2 जानेवारी 1978 रोजी भारतीय संसदेत भाषण दिले, त्यावेळीही या गावाचा उल्लेख केला. 1981 मध्ये जिमी कार्टर यांचा अध्यक्षीय कार्यकाळ संपला पण कार्टर हे जनमानसात आपली लोकप्रियता टिकवून होते. कार्टर यांनी अनेक मानवाधिकार संबंधित संस्था आणि सेवाभावी संस्थांसोबत काम केले. (International News)
====================
हे देखील वाचा :
Dalai Lama : कोण आहे दलाई लामांचा उत्तराधिकारी !
Manmohan Singh : जेव्हा देशहितासाठी एकत्र आले होते ते तिघे!
====================
1982 मध्ये, त्यांनी जॉर्जिया येथील एमोरी विद्यापीठात कार्टर प्रेसिडेंशियल सेंटरची स्थापना केली. यामार्फत कार्टर लोकशाही आणि मानवी हक्कांवर कार्यरत राहिले. या सर्वात कार्टर यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. 19 नोव्हेंबर 2023 रोजी, त्यांची पत्नी रोझलिन कार्टर यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. ही घटना कार्टर यांना धक्कादायक होती. ऑक्टोबरमध्ये त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करतांना नावतवंडांच्या घे-यातील जिमी कार्टर यांचे फोटो प्रसिद्ध झाले होते. आता याच जिमी कार्टर यांचे निधन झाले आहे. एक शेंगदाणा उत्पादक म्हणून त्यांची सुरुवातीची ओळख होती. त्यानंतर अमेरिकन नौदलात लेफ्टनंट आणि 1976 ते 1980 पर्यंत अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष असा कार्टर यांचा प्रवास आहे. याच प्रवासादरम्यान कार्टर यांनी भारताबरोबर स्नेहाचे जोडलेले संबंध कायम राहणार आहेत. (Jimmy Carter)
सई बने